परळी वैजनाथ Parali Vaijnath हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. येथे दरवर्षी भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. हे महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यामधील आंबेजोगाई तालुक्यात आहे. वैजनाथाचे मंदिर देवगिरीच्या यादवांचा श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले अशी मान्यता आहे. त्या मंदिराच्या अवशेषांपैकी फक्त नंदीच सुस्थितीत राहिलेला दिसतो. या मंदिराचा जीर्णोद्धार 1783 मध्ये अहिल्याबाई होळकर यांनी केला असा उल्लेख तेथील एका संस्कृत शिलालेखात आढळतो.
Parli Vaijnath परळी वैजनाथ
हरिहर, मार्कंडेय, नारायण ही तीर्थे आणि शनैश्वर, झुरळ्या गोपीनाथ यांची मंदिरे तसेच संत जगमित्र नागा यांची समाधी या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. वैजनाथ मंदिरास पश्चिम सोडून इतर तीनही दिशांना प्रवेशद्वारे आहेत. मंदिराचा सभामंडप 1904 मध्ये रामराव देशपांडे या दानशूर गृहस्थाने बांधला. सभामंडपात एक पितळी व दोन पाषाणी अशा नंदीच्या तीन मूर्ती आहेत. येथे वीरभद्राची एक मोठी पितळी मूर्ती आहे. मंदिरात मंडपाशिवाय दोन गाभारे असून त्यांचे दरवाजे कलात्मक नक्षीने सजविलेले आहेत. मुख्य ज्योतिर्लिंगाच्या सभोवताली असलेल्या बारा लिंगांमुळे बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडते.
परळी येथे रेल्वे स्टेशन असून येथे दोन लोहमार्ग आहेत. या शहरातील बाजारपेठ बरीच मोठी असून धान्य व्यापाराचे हे एक केंद्र समजले जाते. येथे वैद्यनाथ महाविद्यालय व 60 मेगावॅट क्षमतेचे मोठे औष्णिक वीज केंद्र आहे. येथे पाऊस मध्यम स्वरूपाचा पडतो. येथील प्रमुख पिके पिवळी ज्वारी, भुईमूग, कापूस ही पिके प्रामुख्याने घेतली जात असून अलीकडे उसाचेही उत्पादन केले जाते. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते. तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्यालय आहे.
Parli येथील वैद्यनाथ हे मंदिर प्रसिद्ध आहे. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत.
मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.
जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ 25 कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून 60 कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची काही कमी नाही. नेहमी वाहने उपलब्ध असतात. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.
परळी वैजनाथ या व्यतिरिक्त आणखीन एक वैजनाथ भारताच्या झारखंड राज्यातल्या संथाल परगण्यामधील देवघर गावात आणखी एक वैजनाथ मंदिर आहे. यालाही बाबा बैजनाथ किंवा वैद्यनाथ म्हटले जाते. हेही बारा ज्योतिर्लिंगांतले एक आहे, अशी मान्यता आहे.
परळी वैजनाथ धार्मिक मान्यता
परळी वैजनाथ मंदिराचा इतिहास सांगते की, रानी अहिल्याबाईंनी परळी वैजनाथ मंदिर पुन्हा 1700 च्या सुमारास पुनर्निर्मित केले. या मंदिराशी दोन लोकप्रिय प्रख्यात जोडलेले आहेत. एक पौराणिक कथा अमृत व राक्षस राजा रावण आणि शिव यांच्या स्वभावाविषयीची इतर गोष्टींबाबत बोलते.
Parli Vaijnath इतिहास
परळी वैजनाथ Parai Vaijnath हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. हे ज्योतिर्लिंग भारतातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेचे एक स्टेशनही आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जैन ते भारतातील बारा ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजते.
ब्रम्हा वेणू आणि सरस्वती यांचा त्रिवेणी संगम येथेच आपल्याला पाहायला मिळतो. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचे चिरेबंदी मंदिर घाट दगड दिपमाळ सभामंडप गर्भगृह हे व दोन नंदी यामध्ये वसलेले आहे. हे मंदिर शाळीग्राम शेळीचे आहे व एका टेकडीवर आहे. यांच्या शिखरावर प्राणी व देव यांची शिल्पे आहेत. तसेच बाजूला 11 छोटी शिवमंदिरी सुद्धा आहेत. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.
मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्म नदीच्या किनारी 300 फूट उंचावरील जिरेवाडी येथील सोमेश्वर मंदिर आहे. शिव महाशिवरात्र दसरा व श्रावणात दर सोमवारी शिव पालखी मिरवणूक काढली जाते. तेव्हा महादेव विष्णुला दिवस वाहिली जाते. आंबेजोगाई पासून परळी वैजनाथ 25 किमी अंतर आहे. तर परभणी पासून 60 किमी अंतरावर वर आहे. येथून जवळच औष्णिक विद्युत केंद्र सुद्धा आहे.
पौराणिक कथा
Parli Vaijnath परळी वैजनाथ या विषयीची एक पौराणिक कथा आहे. ती म्हणजे राक्षस रावण अभिमानी आणि अहंकारी होता. एकदा राक्षसराज रावणाने हिमालयावर स्थिर उभे राहून भगवान शिवाची घोर तपश्चर्या केली, तेव्हा त्याची तपश्चर्या खूप खडक होती. तो उन्हाळ्याच्या दिवसात पंचाग्नीच्या मध्यात बसून पंचाग्नी सेवन करीत असे. तर धुवाधार पावसात मोकळ्या मैदानावर उघड्यावरच झोपत असे आणि कडाक्याच्या थंडीच्या दिवसात गड्या पर्यतच्या पाण्यात उभे राहून साधना करीत असे.
या तीन वेगवेगळ्या प्रकाराने रावणाने महादेवाला प्रसन्न केले व भगवान महेश्वर त्याला प्रसन्न झाले नाही, तेव्हा रावणाने आपले एक शीर कापून शिवलिंगावर अर्पण करून त्याची पूजा करायला सुरुवात केली. या प्रक्रियेमध्ये त्यांनी आपली नऊ शिरे अर्पण केल्यावर दहावे शीर कापण्यासाठी जेव्हा तो उपयुक्त झाला. तोपर्यंत भगवान शंकर प्रसन्न झाले होते.
प्रकट होऊन भगवान शिव आणि रावणाची शीरे पहिली सारखी केली व रावणाला वर मागायला सांगितले रावणाने भगवान शिवाला सांगितले की, “मला शिवलिंग नेऊन लंकेत स्थापित करायची अनुमती द्या.” शिवलिंग शिवशंकरांनी नेण्यास परवानगी दिली. व जर ते लिंग नेताना जमिनीवर ठेवले गेले, तर तिथेच त्याची प्रतिष्ठापना होईल. रावण शिवलिंग घेऊन निघाला,
तेव्हा मार्गात असलेल्या चिंताभूमी मध्ये त्यांना लघुशंका करण्याची इच्छा झाली. तेव्हा त्याने लिंगाला एका सेवकाच्या हातात दिले आणि लघुशंकेसाठी गेले, तिकडे शिवलिंग जड झाल्याने त्या सेवकाने ते भूमीवर ठेवले आणि ते तिथेच अचल झाले. परत आल्यावर रावणाने खूप जोर लावून त्या शिवलिंगाला जमिनीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात असफल झाला. शेवटी तो निरास झाला आणि त्याने त्या शिवलिंगावर आपले अंगठे दाबून परत त्याला जमिनीत गाडले. आणि रिकाम्या हाताने लंकेत गेला.
तिकडे ब्रह्मा, विष्णू, इंद्र, आधी देवतांनी तिथे पोहचून त्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली. त्यांनी भगवान शिवाचे दर्शन घेतले आणि लिंगाची प्रस्थापना करून त्यानंतर सर्व देव स्वर्गलोकी निघून गेले. अशा प्रकारे रावणाच्या तपश्चर्या फलदस्वरूप श्री वैद्यनाथ ईश्वर ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली. जो मनुष्य श्रद्धापूर्वक श्री भगवान वैद्यनाथ यांना अभिषेक करतो. त्याची शारीरिक आणि मानसिक रोग अतिशीघ्र नष्ट होतात. असा समज आहे. हे ज्योतिर्लिंग अजमेरी दाबले गेल्यामुळे त्याचे वरील भागात एक खड्डा झाला आहे. तरीही या शिवलिंग मूर्तीची उंची जवळजवळ अकरा बोटे आहे.
परळी वैजनाथ दुसरी कथा
एकदा शिवशंकराने रौद्ररूप धारण करून दक्षाचे मान त्रिशूळने उडवल्यानंतर खूप मनधरणी केल्यावर बाबा वैद्यनाथ तिन्ही लोकात दक्षाचे मुंडके शोधू लागले परंतु ते मिळाले नाही. यानंतर त्यांनी एका बकर्याची मुंडके कापून दक्षाच्या धडावर प्रत्यारोपित केले. यामुळेच बकर्याच्या आवाजात दक्ष महादेवाची पूजा करत असे. गालावर असा ध्वनी करून श्रद्धालु शंकर बाबांना खूष करतात. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्याचा प्रधान श्री हेमाद्री याने बांधले आहे असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
तुम्ही Parli Vaijnath Temple परळी वैजनाथ ठिकाणाला नक्की भेट द्या व आपल्या मनातील कष्ट दूर करून घ्या. “तुम्हाला आमचा लेख परळी-वैजनाथ कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”
हे सुद्धा वाचा