Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 – कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिर ( Information About Kolhapur Mahalakshmi Temple ) हे खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराचा पुराणात उल्लेख आहे. 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. या मंदिराचे पहिले बांधकाम प्राचीन काळात झालेले आहे. महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर ( Information About Kolhapur Mahalakshmi Temple ) हे करवीर निवासिनी महालक्ष्मी, अंबाबाईचे मंदिर आहे. महालक्ष्मीचा उत्सव वर्षातून तीन वेळा साजरा केला जातो. त्यापैकी पहिला उत्सव हा चैत्र पौर्णिमेला होतो. या दिवशी महालक्ष्मीची पितळी प्रतिमा पालकी मध्ये घालून तिची मिरवणूक काढण्यात येते.Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 - कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती – Information About Kolhapur Mahalakshmi Temple 

दुसरा उत्सव म्हणजे आश्विन महिन्यातील पंचमीच्या या दिवशी कोल्हापूर पासून चार किलोमीटर असलेल्या टेंबलाईच्या मंदिरापर्यंत महालक्ष्मीच्या पालखीची मिरवणूक काढली जाते. अश्विन पौर्णिमेला ज्योती लावून विचारद केला जातो आणि देवीला महाप्रसाद अर्पण करण्यात येतो. अंबाबाई मंदिरातील उत्सव दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी मावळत्या सूर्याची किरणे देवीच्या अंगावर पडतात. याला देवीचा किरणोत्सव म्हटले जाते. हा किरण उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला जातो.

कोल्हापुर महालक्ष्मी मंदिराच्या ( Information About Kolhapur Mahalakshmi Temple ) मूर्तीच्या जवळील सिंह व शिरावरील मातुलिंग यामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबेचे रुप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलो ग्रॅम आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर नाग मुद्रा हे अकराव्या शतकातील शिला लेखात ‘लिंगशैशाघौषहरिणी’ असा देवीचा उल्लेख आहे. महालक्ष्मीच्या देवीच्या संस्कृत आरती मध्येही तीच्या मस्तका वरील नागाचे वर्णन केले जाते. करवीर महात्म्य ग्रंथात तेराव्या अध्यायातील सातवे श्लोकात असे म्हटले आहे की, पन्नागांकीत मस्त काम म्हणजे नागांनी आपला फणा देवीच्या मस्तकावर पाहिला आहे. असा उल्लेख हेमाडपंथी मंदिर प्रणालीचा प्रणिता हेमाद्री याने रचलेला आहे.

नक्की वाचा – चिखलदरा थंड पर्यटन स्थळ – Chikhaldara Information In Marathi 2021

हे मांजरी विरचित चतुर्वर्ग चिंतामणी या उत्खननात मस्तकावर नागसेवन असलेली मूर्ती करवीर निवासिनी आहे असा उल्लेख केलेले आहे. पुराणे अनेक जैन ग्रंथ ताम्रपत्रे व सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरेल ते एके काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला. तेव्हा देवीची मूर्ती पुजाराने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इसवी सन 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती व अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 - कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

See also  Crop Insurance | अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना इतक्या हजार कोटींची मदत जाहीर

कोल्हापूर मधील महालक्ष्मीचे हे मंदिर ( Information About Kolhapur Mahalakshmi Temple ) पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपारिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पितळे दार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. गेल्या दशकात मंदिराची अनेक वाद झाले. मंदिराचे चार महत्त्वाचे भाग आहेत, पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन आहे. देवीचा गाभारा येथेच आहे उत्तरेकडे महाकालीचा गाभारा तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महामंडप असे नाव अभिमानाने पडले.

नवरात्रात नऊ दिवस देवीची वाहन पूजा बांधतात. घरच्या पूजेत कलश, फुलांची माळ काळ्यामातीत केलेले धान्य वगैरे पेरण्यात येते. अष्टमीला देवीची नगरप्रदक्षिणा होते. नवसा निमित्य मंगळवारी व शुक्रवारी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा येथे आहे. आश्विन महिन्यात महालक्ष्मी व्रत करण्याची प्रथा आहे. देवीला हळदकुंकू वाहून तांब्या पितळाच्या किंवा मातीच्या घागरी विस्तवावर ऊद घालून व देवीसमोर फेर धरून फुंकरायच्या असतात. या घागरी फुंकणाऱ्या काही स्त्रियांचे अंगात प्रत्यक्ष महालक्ष्मीचा संचार होतो व त्या भविष्याबद्दलच्या प्रश्नांची उत्तरे सांगतात. इच्छा असल्यास पूर्ण होण्याचा उपाय सांगतात असा समज आहे. एकंदर कोल्हापूरच्या अंबाबाईचा देऊळवाडा आणि संबंधित उत्सव व पूजाअर्चा महाराष्ट्रीय मंदिर प्रथांचे उत्तम उदाहरण आहे.

मंदिराच्या भिंतीवर नर्तिका, वाद्ये वाजविणाऱ्या स्त्रिया, मृदंग, टाळकरी विना, वादी, आरसादेखी, यक्ष, अप्सरा, योद्धे व किन्नर कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला किरण सूर्यास्ताची किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे उत्तम जागा विना चुन्याचे जोडी दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोणाचा पाया ही मंदिराचे वस्तू वैशिष्ट्ये आहेत. देवळाच्या प्राकारात शेषशायी दत्तात्रेय, विष्णू, गणपती अशा अनेक देवतांची देवळे व काशि, मनकर्णिका कुंडे आहेत. शुक्रवार, मंगळवार हे देवीचे दिवस मानले जातात. तर शुक्रवार व आश्विन कार्तिक मार्गशीर्ष व माघ या चारही पौर्णिमेस व चैत्र वद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखीचे प्रदक्षिणा काढली जाते.

See also  चिखलदरा थंड पर्यटन स्थळ - Chikhaldara Information In Marathi 2021

महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे अजुन माहिती झालेली नाही. देवस्थान समितीच्या माहितीनुसार मंदिर कर्णदेव नावाच्या राजाने बांधले. ख्रिस्तोत्तर नवव्या शतकापूर्वीच देवीचे महात्म्य प्रस्थापित झाले होते असे दिसते. कारण राष्ट्रकूट नृपती प्रथम अमोघवर्ष याने काही सार्वजनिक आपत्तींच्या निवारणार्थ आपल्या डाव्या हाताचा अंगठा महालक्ष्मीला अर्पण केल्याचा उल्लेख त्यांचा संजान ताम्रपटात आला आहे. हे देवालय शिलाहार यापूर्वीच करहाटक येथील सिद्ध वंशी राजाने बांधले असावे. त्यापूर्वीच ते शक्तिपीठ म्हणून प्रसिद्ध झाले होते. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते.

आपणास देवीचा वरप्रसाद मिळाला असल्याचा उल्लेख त्यांच्या अनेक लेखांत येतो. तर काही विद्वानांच्या मते, हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे. त्याचे बांधकाम उत्तर चालुक्याच्या काळातील आहे असे म्हटले जाते. देवळाचा मुख्य वास्तूचे दोन मजले आहेत आणि त्याची बांधणी कोल्हापूरच्या आसमंतात मिळणाऱ्या काळया दगडात केली आहे.

नक्की वाचा – औरंगाबाद शहर – Aurangabad Information In Marathi 2021

देवळाचे शिखर आणि घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. या उलट जैन पंथियांचा असा दावा आहे, की हे देऊळ मूळचे जैन देवता पद्मावतीचे आहे आणि त्यांची शिखर आणि घुमट हे सनातन धर्मीयांच्या ताब्यात गेल्यानंतर बांधण्यात आले. मेजर ग्रॅहम यांच्या मतानुसार चौदाव्या आणि पंधराव्या शतकामध्ये मुसलमानांनी देवळांची नासधूस केली. त्यावेळी या देवळातील महालक्ष्मीची मूर्ती एका खाजगी घरात हलविण्यात आले आणि पुढे दुसरे छत्रपती संभाजीराजे यांनी त्या मूर्तीची हल्लीच्या देवळात प्रतिष्ठापना केली. ही प्रतिष्ठापना करण्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाडयाहून कोल्हापूरास रवाना केले होते.
महालक्ष्मीचे मंदिर हे प्रसिद्ध हेमाडपंती स्थापत्यशैली वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी किंवा आयताकृती दगडात करण्यात आलेली आहे.Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 - कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

हे पश्चिमाभिमुख असून मुख्य प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. पश्‍चिमेला असलेल्या मुख्य दरवाजे शिवाय उत्तर पूर्व आणि दक्षिणेला प्रवेशद्वारे आहेत. उत्तर दरवाजाला एक मोठी घंटा असून दिवसातून पाच वेळा ती वाजवली जाते. या दरवाजाला घाटी दरवाजा असे म्हणतात. देवळात वारा येण्याला काय कोठेही गवाक्षे नाहीत. पूर्वेकडे असलेल्या मोठया घुमटाखाली महालक्ष्मीची मूर्ती आहे व उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे असलेल्या दोन छोट्या घुमट्या खाली महाकाली आणि महासरस्वतीच्या मुर्त्या आहेत. महालक्ष्मीची मूर्ती 1.22 मीटर उंच असून ती एका 0.1 मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आली आहे. देवळाच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर जो मंडप लागतो, त्या मंडपाला प्रवेश मंडप किंवा गरूड मंडप असे म्हणतात. अश्विनी नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

See also  Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ .

अंबाबाई मंदिरात उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. दरवर्षी जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात आणि नोव्हेंबरमध्ये सूर्यास्ताच्या वेळी महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय अद्भुत घटना अनुभवास येते. ती म्हणजे 31 जानेवारी आणि 9, नोव्हेंबर रोजी सूर्याची किरणे दरवाज्यातून प्रवेश करून थेट महालक्ष्मी मूर्तीच्या पायांवर पडते. तर 1फेब्रुवारी आणि 10 नोव्हेंबर रोजी, सूर्याची किरणे देवीच्या छातीपर्यंत पोहोचतात. 2 फेब्रुवारी आणि 11 नोव्हेंबर मावळतीच्या सूर्याची किरणे हे देवीच्या पूर्ण अंगभर पडतात. या सोहळ्याला महालक्ष्मीचा किरण उत्सव म्हणतात. हा खूप मोठ्या उत्साहाने पार पाडला जाणारा उत्सव असतो.

“कोल्हापूर महालक्ष्मी माहिती ( Information About Kolhapur Mahalakshmi Temple ) कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment

x