चिखलदरा थंड पर्यटन स्थळ – Chikhaldara Information In Marathi 2021

चिखलदरा Chikhaldara Information In Marathi  हे अमरावती जिल्ह्यातील थंड पर्यटन स्थळ आहे. अनेक पर्यटक चिखलदऱ्याला भेट देण्यासाठी येत असतात. थंड हवेचा, दिसणार्‍या धबधब्याचा, इको पॉईंट अशा बऱ्याच ठिकाणांचा येथे येऊन आनंद घेत असतात.चिखलदरा थंड पर्यटन स्थळ - Chikhaldara Information In Marathi 2021 

Chikhaldara Information In Marathi – चिखलदरा थंड पर्यटन स्थळ

चिखलदऱ्याला जाण्यासाठी अमरावती, परतवाडा येथे जावे लागते आणि नंतर परतवाडा शहरापासून चिखलदरा ( Chikhaldara Information In Marathi ) जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक सर्वात जुना असलेला घाट मार्ग. हा मार्ग सोडून आणखीन एक मार्ग आहे. हा मार्ग साधारण पन्नास किलोमीटर लांबीचा आहे. पूर्वी इंग्रज याच मार्गाने घोडा गाडीने चिखलदऱ्याला जात असत. तसेच दुसरा मार्ग आहे तो म्हणजे धामणगाव गढी मोठा मार्ग.

हा साधारण 30 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. हा मार्ग जनरल वेलस्ली याने शोधून काढलेला असल्याची माहिती आपल्याला मिळते. मुख्य पर्यटन मार्ग म्हणून मुख्यता पर्यटक हाच मार्ग चिखलदरा जाण्यासाठी निवडतात. अमरावती ते चिखलदरा हे अंतर 90 किलोमीटर आहे. चिखलदरा हे एक पर्यटन स्थळ आहे. यालाच हिल स्टेशन असेही म्हटले जाते. चिखलदरा हे समृद्ध वनस्पतींनी नटलेल्या आणि निसर्गसौंदर्याने बहरलेल्या सातपुडा पर्वताच्या शिखरावरील एक प्रसिद्ध आणि समृद्ध ठिकाण आहे.

याला विदर्भाचे नंदनवन असेही म्हटल्या जाते. चिखलदरा ( Chikhaldara Information In Marathi ) हे घनदाट अरण्य होते. पूर्वीच्या काळी चिखलदरा थंड हवेचे ठिकाण अशी कुठलीच ओळख नव्हती, व माहित ही नव्हते. सर्वात प्रथम हैदराबाद फलटणचा कॅप्टन रॉबिन्सन यांनी 1823 मध्ये चिखलदऱ्याला शोधले यानंतर इंग्रजांना या ठिकाणाचे महत्त्व समजले आणि त्यांनी चिखलदऱ्याला हिल स्टेशन म्हणून विकसित केली. इंग्रजी अधिकारी कॅप्टन मिडोज या इंग्रजी अधिकाऱ्याला निसर्गाविषयी अधिक प्रेम,

नक्की वाचा – Mahabaleshwar Information In Marathi महाबळेश्वर पर्यंटन स्थळ 2021

जिव्हाळा, आपुलकी होती. म्हणून त्याच्यामुळे यातूनच चिखलदरा हे हिल स्टेशन त्याकाळी मोठ्या प्रमाणात विकसित झाले. इंग्रजांना अपेक्षित नैसर्गिक वातावरण आढळल्याने या ठिकाणी इंग्रजांना जाण्याचा-येण्याचा प्रवास जास्त वाढला . चिखलदरा हे पर्यटन स्थळ समुद्रसपाटीपासून 3, 666 फूट उंचीवर आहे.

See also  Vihir Anudan Yojana Maharashtra 2023 | विहीर अनुदान योजना महाराष्ट्र २०२३ .

नक्की वाचा – माझी आजी मराठी निबंध

चिखलदरा ( Chikhaldara Information In Marathi ) हे अतिशय दिसायला सुंदर व थंड हवेचे ठिकाण असून वेगवेगळ्या ऋतूनुसार येथील नैसर्गिक सौंदर्य बदलत राहते. पावसाळ्यात पडणारे धुके, हिवाळ्याच्या थंडीत वाहणारे वारे, पावसाळ्यात पर्वतरांगांवर ऊन खाईतुन ओसंडून वाहणारे धबधबे, श्रावणात होणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरी आणि मधेच पडणारे ऊन या सर्वांनी चिखलदरा हे स्थळ पर्यटकांना नेहमीच आकर्षण वाटत असते. चिखलदऱ्याच्या जंगलात बरेच प्राणी आहेतचिखलदरा थंड पर्यटन स्थळ - Chikhaldara Information In Marathi 2021

त्यामध्ये अस्वल हा प्राणी पाणी पिताना किंवा जंगलात फिरताना बरेचदा दिसतो. तसेच अन्य वन्य प्राणी सुद्धा अधूनमधून दिसतात. या नंदनवनात एकेकाळी कॉफीचे आणि चहाचे मळे असायचे, आज येथे चहाची लागवड बघायला मिळत नसली तरी कॉफीचे मळे काही ठिकाणी पाहायला मिळतात. त्या काळात येथे जवळपास अडीचशे एकर माळरानावर कॉफीची लागवड होत होती अशी नोंद आहे.

चिखलदरा येथे बरेच प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासारखे आहे. त्यामध्ये पहिलाच पॉईंट. व तिथे जाऊन प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपण आपला आनंद द्विगुणीत करू शकतो.

देवी पॉइंट : चिखलदरा ( Chikhaldara Information In Marathi ) येथील दरी खाली उतरून गेल्यावर आपल्याला एक भोयारा सारखी जागा दिसते. या भुयाराच्या आत गेल्यावर एक देवीचे मंदिर दिसते. हे खरी देवीचे मंदिर आहे. या ठिकाणाला देवी पॉइंट असे म्हटले जाते.

धबधबा : चिखलदरा चे सर्वात आकर्षण असलेले खरं म्हणजे धबधबा. धबधबा चिखलदऱ्याचे येथील मुख्य आकर्षण आहे. देवी पॉइंट पासून चंद्रभागा या नदीचा उगम होतो. तेथे देवीच्या मंदिरासमोर दगडी कुंडात देवीच्या कुंडातून पडणाऱ्या पाण्यामुळे सुंदर धबधबा तयार झालेला आहे. हा धबधबा सुंदर असून तो पर्यटकांचे आकर्षण ठरलेला आहे.

मोझरी पॉईंट/ हरिकेन पॉइंट : चिखलदरा देवी पॉइंट आणि धबधब्यापासून जवळच मोझरी पॉईंट आहे. त्याच्या बाजूला लागून हरिकेन पॉईंट आहे. वन उद्यान येथे वनविभागाने वन उद्यान विकसित केले आहे. या उद्योगात मुलांसाठी गार्डन रेल्वेची ही व्यवस्था करण्यात आलेली आहे.

See also  Solar Rooftop Yojana 40 टक्के अनुदानासह छतावर सौर पॅनल बसवा

बहामनी किल्ला : चिखलदरा चे आणखीन एक आकर्षक ठिकाण म्हणजे बहामनी किल्ला. चिखलदऱ्याच्या दक्षिण दिशेला साधारणत तीन ते साडेतीन किलोमीटर गेल्यावर बहामनी किल्ला आपल्या दृष्टीस पडतो. हा किल्ला खूप मोठा आहे. हा किल्ला संपूर्ण पाहायचा असेल तर पूर्ण दिवसही कमी पडतो. या किल्ल्यामध्ये जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा आपल्याला दिसतात. या किल्ल्याचे वैशिष्ट्य असे की, शत्रूपासून त्यांच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला. किल्ल्याची बांधणी दुहेरी पद्धतीने करण्यात आलेली आहे.

याला पंचबोल पॉइंट असेही म्हटले जाते. चिखलदरा येथील पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेला ईको पॉईंट या ठिकाणी चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेली एक खोल दरी आहे. इको पॉईंटचे वैशिष्ट्य असे की, आपण एकदा आवाज दिला की, तोच आवाज आपल्याला चार पाच वेळा परत ऐकू येतो. म्हणजेच आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येतो.

विराट देवी : चिखलदऱ्यापासून साधारणता 11 किलोमीटर अंतरावर विराट देवीचे मंदिर आहे. हे मंदिरही पाहण्यासारखे आहे.

चिखलदऱ्याचा जंगल हा निसर्गाचा श्वास आहे, असे म्हटले जाते. निसर्ग हा माणसाचा श्वास आहे. जंगल आणि निसर्ग हे दोन्ही नसतील, तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये या दोन्हींचे प्रमाण खूपच चांगले आहे. महाराष्ट्रात भरपूर जंगले आहेत. म्हणजेच महाराष्ट्राला हे एक वरदानच लाभलेले आहे, असेही म्हटले तरी चालेल. त्यातही विदर्भाला निसर्गाचे जास्त लाभलेला आहे. महाराष्ट्रात खूप हिल स्टेशन आहेत. परंतु ते पर्यटकांना अजूनही माहीत नाहीत, म्हणून अशा हिल स्टेशनची ओळख, माहिती करून घेण्यासाठी आपल्याला ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.चिखलदरा थंड पर्यटन स्थळ - Chikhaldara Information In Marathi 2021

चिखलदरा बद्दल पौराणिक महत्त्व आपण जाणून घेऊया – ( Chikhaldara Information In Marathi )

चिखलदऱ्यापासून 11 किलोमीटर अंतरावर विराट राज्याची राजधानी होती. तिला वैराग नगरी म्हणत असे. आजही वैराग गाव या ठिकाणी वसलेले आहे. पाच हजार वर्षांपूर्वी पांडवांनी आपली आज्ञा वासाचा काळ या सातपुडा पर्वत रांगेतील चिखलदऱ्याच्या वनात पूर्ण केला, अशी मान्यता आहे. त्यावेळी द्रोपती सुद्धा वेश बदलून विराट राजाच्या महाराणीची दासी म्हणून राहत असे.

See also  औरंगाबाद शहर - Aurangabad Information In Marathi 2021

परंतु द्रोपतीवर विराट राजाचा मेहुना कीचक याची वाईट नजर पडली, तेव्हा द्रोपतीने ही गोष्ट भीमाला सांगितल्याने भीमाने किचक याला ठार केले आणि त्याचा मृतदेह वैराट पासून दूर एका नदीच्या दरीत फेकून दिला. आज ही ती दरी म्हणून ओळखल्या जाते. नंतर शेजारी असलेल्या एका कुंडात भीमाने आपले हात धुतले तोकुन भिमकुंड म्हणून ओळखला जातो. नंतर पुढे कीचकदरी वरून तिच्या पुढे अपभ्रंश होऊन चिखलदरा हे नाव असल्याचे अभ्यासक सांगतात.

नक्की वाचा – Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 – कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

चिखलदऱ्याला आपण ज्या वेळेस जातो. त्यावेळेस आपल्याला गोविलगड नजरेस पडतो. गोविदगड या किल्ल्याचे बांधकाम राज्यकर्त्यांच्या काळात अजून हिजरी सन 826 मध्ये इ.वी.सन 1425-1426 या दरम्यान बहामनी वंशाचे बादशाही अहमद शहा बहामनीच्या काळात अब्दुल लतिफ खानने केल्याच्या इतिहास अभ्यासक सांगतात. 1518 पर्यंत गोविलगड दिल्लीच्या अकबराच्या ताब्यात होता. नंतर 1698 मध्ये त्यावर मराठ्यांनी ताबा मिळवला.

नंतर पुढे 1603 मध्ये जनरल वेलस्ली या ब्रिटिश योध्याने आपल्या ताब्यात घेतला. इंग्रजांनी गोविलगड किल्ल्या जिंकल्यानंतर तेथील रहिवाशांना बाहेर काढले आणि बाहेर पडलेले हे रहिवासी तिथूनच वस्ती करून राहू लागले.

अशाप्रकारे चिखलदरा मनाला मोहून टाकणारा आणि भुरळ पाडणारा आहे म्हणून तुम्ही नक्की या स्थळाला भेट द्या व येथील घटकांचा आनंद घ्या. चिखलदऱ्याला जाण्याकरता रेल्वे मार्ग सुद्धा आहे. पुणे नागपूर रेल्वे मार्गावर बडनेरा स्टेशनवर उतरून अथवा खासगी वाहनाने चिखलदरा येथे जाणे सोयीस्कर आहे. हे अंतर 100 किमी आहे.

“तुम्हाला आमची माहिती चिखलदरा Chikhaldara Information In Marathi  या विषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment