Shetkaryana 600 Kotinchi Madat | शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

Shetkaryana 600 Kotinchi Madat | शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा होणार.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपणास कळविण्यात आनंद होतो की शेतकऱ्यांना आता 600 कोटींची मदत मिळणार आहे. ती त्यांच्या खात्यामध्ये राज्यात सप्टेंबर ऑक्टोंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेला नाशिक आणि पुणे विभागातील शेतकऱ्यांना सुमारे 600 कोटी रुपयांची मदत देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे.  त्यानुसार या पैशाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या अहवालानुसार शेतकऱ्यांना पाच हजार 661 कोटींच्या मदतीचे वाटप केले आहे.  यादरम्यान आक्टोंबर मध्ये पुणे आणि नाशिक विभागातील अनेक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र ही नुकसान प्रचलित निकषात बसत नसल्याने हे निकष शिथिल करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून सातत्याने केली आहे.  त्याची देखील दखल घेत  महसूल मंडळात 24 तास 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असेल, आणि 33% पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याही विभागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता.  त्यानुसार या निकषात बसणाऱ्या सुमारे सहारा खाऊन अधिक शेतकऱ्यांना 673 कोटी 11 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय पुनर्वसन विभागाने घेतला आहे त्यानुसार नाशिक विभागातील धुळे जळगाव, अहमदनगर आणि नंदुरबार जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांना तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जिल्ह्यातील सुमारे दोन लाख शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  बाधित शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा अधिक मदत देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यानुसार  पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये बागायत पिकांसाठी 27000 तर बहुवार्षिक पिकांसाठी हेक्टरी 36000 या प्रमाणात ही मदत दिली जाणार आहे.

Shetkaryana 600 Kotinchi Madat | शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत रक्कम थेट खात्यात जमा होणार.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

See also  Crop Loan List | कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा.

Leave a Comment