Crop Insurance | अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना इतक्या हजार कोटींची मदत जाहीर

Crop Insurance अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल इतक्या हजार कोटींची मदत जाहीर

शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी शिंदे सरकारने(maharashtra government) दिली आहे ती म्हणजे यावर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई  सरकारने जाहीर केले आहे. यासाठी सरकारने 3 हजार 500 कोटी रुपयांचे मदत शेतकऱ्यांना वितरित करण्याची घोषणा केली आहे.

19 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असून यात शेतकऱ्यांना तीन हेक्टर पर्यंतच्या नुकसान भरपाईसाठी रकमेचा लाभ दिला जाणार आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 27 हजार वरून 36 हजार प्रति एकर पर्यंत दिलासा दिला जाणार आहे. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे केंद्राकडून नुकसानीचे रक्कम आल्यानंतर अतिरिक्त मदत दिली जाईल असे सरकारकडून सांगण्यात आले. आहे राज्यातील 25 लाख 93 हजार शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे यामुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना तीन हजार पाचशे कोटी रुपयांचे मदत जाहीर करण्यात आली आहे .मदत रकमेच्या वितरणाबाबत शासनाने मदत व पुनर्वसन विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना नुष्कानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची रक्कम लवकरात लवकर वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत.

Crop Insurance अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना तब्बल इतक्या हजार कोटींची मदत जाहीर

सोबतच शेतकऱ्यांसाठीची मदत रक्कम संबंधित विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी संपूर्ण केली आहे शासनाने मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ऑनलाईन जमा करण्यास सांगितले आहे.काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात जुलै महिन्यात आपत्तीमुळ झालेल्या नुकसान झालेल्या लोकांना मदतीचे रक्कम वाढवून देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार यापूर्वी लागवडीचे योग्य लागवडीपूर्वी सहा हजार आठशे रुपये दराने नुकसान भरपाई दिले जात होती ती वाढून आता 13600 करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात जुलै महिना संततधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे जुलै महिन्याच्या पहिल्या दिवसापासून राज्यात एवढा पाऊस झाल्याने  पेरणी क्षेत्र पाण्याखाली गेले असून सोयाबीन कपासी यांना सर्वाधिक फटका बसला आहे त्यासाठी शासनाने आता अतिवृष्टी ग्रस्त भागाला मदत जाहीर केली आहे.

See also  चिखलदरा थंड पर्यटन स्थळ - Chikhaldara Information In Marathi 2021

अतिवृष्टी नुकसान भरपाई जिल्हा निहाय यादी जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Comment