छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 – 1680 ) – Shivaji Maharaj Information In Marathi

छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj Information In Marathi ) Shivaji Maharaj हे मराठा स्वराज्याची निर्माते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. जिजाबाई ह्या शहाजीराजांच्या पहिल्या पत्नी, जिच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 साली झाला. जन्मस्थळ पुण्यापासून चाळीस मैलांवर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला.

Shivaji Maharaj Information In Marathi – छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 – 1680 )

 छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 - 1680 ) - Shivaji Maharaj Information In Marathi

 सैन्य उभारणी – शिवाजी महाराज shivaji maharaj ( Shivaji Maharaj Information In Marathi )

मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज Shivaji Maharaj होते. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीराजांनी उभे केले आणि 1674 मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करून घेतला.

नक्की वाचा – राजर्षी शाहू महाराज – Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021

शिस्तबद्ध लष्कर व प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रगतिक राज्य उभे केले.  आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या 2000 सैनिकांच्या छोट्या तुकडी पासून 1,00,000 सैनिकांचे  लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केले.

राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले, तसेच किनारे व अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी राजे, शिवबा, राजे, शिवराय अशा अनेक नावांनी ओळखले जातात.

See also  kanda Anudan Yojana Form 2023 | कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

शिव जयंती shiv जयंती ( Shivaji Maharaj Information In Marathi )

Shivaji Maharaj शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj Information In Marathi )आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभो असा होतो. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 आणि औरंगजेबाचा मृत्यू 1707 या 77 वर्षाच्या काळास इतिहासकार शिवकाल असे म्हणतात.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पंडित नेहरू आपल्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथात म्हणतात, ” छत्रपती शिवाजी प्रतिहल्ला करणारा हिंदू राष्ट्रवादाचे प्रतीक होते.” जुन्या इतिहासातून त्यांना प्रेरणा मिळाली होती. महाराज अत्यंत धैर्यशाली आणि उत्कृष्ट नेतृत्व गुण असणारे नेते होते. स्वराज्यासाठी चिवटपणे लढणारा गट म्हणून मराठी जनांना एकत्र केले, त्यांच्यामागे राष्ट्रीयत्वाची पार्श्वभूमी उभी केली आणि या गटास चेतना दिली आणि मुघल सम्राज्य अखेर संपले.

 छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 - 1680 ) - Shivaji Maharaj Information In Marathi

शिवाजी महाराजांचा मृत्यु 1680 मध्ये झाला तरी त्यांच्यानंतर संपूर्ण भारतात प्रभुत्व स्थापन होईपर्यंत मराठ्यांचा स्वराज्य विस्तार होता. शिवाजी महाराजांनी अनेक जमिनीवर स्वामित्व स्थापन केले आणि अपार धन मिळवले त्यांच्याजवळ मजबूत लष्कर आणि नौदल होते आणि असंख्य सैनिकांवर त्यांचा हुकूम चालत असे.

लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज – Shivaji Maharaj Information In Marathi

आदिलशासाठी ते एक जहागीरदाराचे बंडखोर पुत्र होते. तसेच ज्या लोकांवर त्यांचे राज्य होते त्या लोकांकडून स्वामीनिष्ठेची वा भक्तीची खरीखुरी अपेक्षा राज्याभिषेकाशिवाय करणे चुकीचे होते. राज्याभिषेकाशिवाय त्यांच्या आज्ञांना किंवा आदेशांना अखिल रयत गांभीर्याने घेईलच असे नव्हते.

राज्याभिषेक झालेला नसल्याने कोणत्याही तहावर स्वाक्षरी करणे, विधीवत मार्गाने एखाद्याला जमीन देणे व आपल्या राजकीय सत्तेच्या भविष्याची हमी देणे शक्य नव्हते. आपल्या स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळवून देऊन तिचे अस्तित्व कायम राखण्यासाठी राज्याभिषेक आवश्यक होता.

ऐतिहासिक कागदपत्रांवरून हेही स्पष्ट दिसते सामाजिकदृष्ट्या भोसले bhosle घराण्याशी समान असलेल्या अनेक मराठा सरदारांमध्ये त्याकाळी मत्सराची भावना निर्माण झालेली होती. ते लोक स्वतःला शिवाजीराजांचे सेवक म्हणवून घेण्यास नकार देत होते व आपण आदिलशहाचे एकनिष्ठ सेवक आहोत असे म्हणत होते.

See also  NHM Recruitment 2022 अमरावती जिल्हा राष्ट्रीय अभियानात 105 जागांसाठी भरती

नक्की वाचा – सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 – Sindhudurg Fort Information In Marathi Language

त्यांच्या लेखी अजूनही शिवाजी भोसले हे बंडखोर आणि स्वामीद्रोही होते. त्यांचा दृष्टिकोन बदलण्यासाठीही राज्याभिषेक गरजेचा होता. महाराष्ट्रातील काही प्रगत, एका विचारांची मंडळी त्याकाळी शिवाजी महाराजांकडे हिंदुत्वासाठी लढणारे महान व्यक्ती म्हणून पाहत होते.

शिवाजी महाराज राज्याभिषेक – Shivaji Maharaj Information In Marathi

 छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 - 1680 ) - Shivaji Maharaj Information In Marathi

हिंदू धर्मातील एक व्यक्ती छत्रधारी बनून स्वतंत्र बाण्याने राज्य करीत राहावे अशी त्यांची इच्छा होती आणि सहाजिकच त्यासाठी हिंदूना छत्रपतींची गरज होती. हिंदुत्वाचे ध्येय किंवा स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक विचित्र आडकाठी होती.

प्राचीन हिंदू शास्त्राप्रमाणे केवळ क्षेत्रीय वर्णातील व्यक्तीस राजा म्हणून अभिषिक्त केले जाऊ शकत होते. अशी व्यक्तीच हिंदू रयतेचा राजा असल्याचा दावा करू शकत होती. भोसले कुळ क्षत्रिय म्हणून गणली जात नव्हती तसेच ते ब्राह्मणही नव्हते अर्थातच या शास्त्रानुसार भोसले कुळ हे शूद्र होते आणि अशा कुळातील व्यक्तीस राजा होण्याचा अधिकार नव्हता.

शिवाजीराजे भोसले यांचा राज्याभिषेक अधिकृतपणे त्यांना क्षत्रिय जाहीर करून झाला तरच भारताच्या सर्व भागातील ब्राह्मण उपस्थित राहून त्यांना आशीर्वाद देतील अशी परिस्थिती निर्माण झाली.

शूद्र कुलोत्पन्न म्हणून राज्याभिषेकासाठी आक्षेप घेणाऱ्यांची तोंडे बंद करू शकेल, अशा पंडितांची त्यावेळी स्वराज्यात गरज होती.  विश्वेश्वर नामक पंडित यांच्या रूपात ही गरज पूर्ण झाली. या पंडिताचे टोपण नाव गागाभट्ट असे होते आणि तो तत्कालीन ब्रह्मदेव वा व्यास म्हणून काशीक्षेत्री प्रसिद्ध होता.

सुरुवातीस काही आढेवेढे घेतल्यानंतर पंडित गागाभट्ट शिवाजीराजे भोसले यांना क्षत्रिय मानण्यास तयार झाले. उदयपूरच्या क्षत्रिय घराण्याशी भोसले कुळाचा संबंध होता.  हे सिद्ध करण्यात बाळाजी आवजी आणि अन्य काही साथीदारांचा पुढाकार होता. त्यांनी भोसले कुळाची वंशावळी मांडून भोसले कूळ हे प्रभू रामचंद्राच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय घराणे आहे हे सिद्ध केले.

See also  Parbhani Dist NHM Recruitment 2022 परभणी जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानात विविध पदांच्या 82 जागा

अशा भक्कम पुराव्यानंतर गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून जबाबदारी स्वीकारण्यास तयार झाले. या सर्व कार्यासाठी त्यांनी मोठी दक्षिणाही घेतली. शिवराय आणि त्यांच्या साथीदारांनी साताऱ्यापासून अनेक मैल चालत जाऊन गागाभट्ट यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

6 जून, 1674 रोजी शिवाजीराजांना गडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले.शिवरायांनी नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरु झाला. फार्सी, संस्कृत शब्दकोश बनवला गेला.

साम्राज्य विस्तार – Shivaji Maharaj Information In Marathi

 छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 - 1680 ) - Shivaji Maharaj Information In Marathi

मोगल साम्राज्याचा नर्मदा पलीकडचा विस्तार तसेच शिवाजी महाराजांचा राज्यविस्ताराला वेसण घालने, या दोन हेतूंसाठी औरंगजेबाने त्यांचा मामा शाहिस्तेखान याला दख्खनच्या मोहिमेवर पाठविले.

प्रचंड मोठा लवाजमा सैन्य आणि फौजफाटा सोबत घेऊन शाहिस्तेखान निघाला आणि वाटेत असणाऱ्या प्रत्येक राज्यात गावात त्याने दहशत पसरवीत जमेल तेवढा विध्वंस केला. शेवटी पुण्याजवळील चाकणचा किल्ला जिंकून पुण्यातील शिवाजीराजांच्या लाल महालातच तळ ठोकला.

शिवाजीराजांनी खानाचा बंदोबस्त करण्यासाठी एक धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे लाल महालात शिरून खानाला संपविण्याचा. लाल महालात आणि अवतीभोवती खडा पहारा असे आणि महालात शिरणे अतिशय जोखमीचे काम होते.

मुघल सत्तेशी संघर्ष हा शिवचरित्राचा व्यापक आणि अविभाज्य भाग आहे. तत्कालीन मुघल साम्राज्य हे भारतातील सर्वात बलाढ्य होते आणि औरंगजेब हा अतिशय कठोर आणि कडवा मुघल बादशहा दिल्ली येथे शासन करीत होता.

“तुम्हाला आमचा लेख शिवाजी महाराजां (Shivaji Maharaj Information In Marathi)  विषयी महाराजांच्या प्रत्येक कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment