सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 – Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule Information In Marathi )ह्या भारतातील पहिल्या शिक्षिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी, 1831 रोजी झाला. त्यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्याच बरोबर त्या एक कवियत्री व समाजसुधारक होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुलेत्यांनी मोठी कामगिरी बजावली. आपल्या नायगाव या गावावर त्यांनी एक प्रसिद्ध कविता लिहिली आहे. तसेच त्यांनी स्त्री व शूद्रांमध्ये शिक्षणाचा प्रसार केला असून त्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सुद्धा होत्या असे म्हटले जाते. त्यांनी विधवांचे होणारे केशवपण थांबविण्यासाठी पुण्यात न्हाव्यांचा संप घडवून आणला. त्यांचा मृत्यू प्लेग या आजाराने झालेला होता.

Savitribai Phule Information In Marathi  सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती

सावित्रीबाईच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule Information In Marathi ) यांचा ज्योतिराव फुले यांच्या सोबत विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ तर ज्योतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईची सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे गोरे परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली, म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसाय वरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.

ज्योतिराव फुले यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नव्हते. त्यामुळे त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. ज्योतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनऱ्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरुन ज्योतिरावांना हे एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 - Savitribai Phule Information In Marathi

सावित्रीबाईच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या. पण 1848 साली संपेपर्यंत ही संख्या 40-45 पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेमुळे स्वागत सनातन उच्चवर्णीयांनी धर्म बुडाला जग बुडणार कली आला असे सांगून गेले. सनातन्यांनी विरोध केला, अंगावर शेण फेकले, काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण अनेक संघर्ष करत हा सावित्रीबाईचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले, सगुणाऊ सोडून गेली.

See also  Talathi Bharti 2023 | 4122 पदांची तलाठी भरती

अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाल जठर विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता.

नक्की वाचा – चाणक्य – Chanakya In Marathi 2021

पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही. अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. ज्योतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले.

सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले फसलेल्या बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. या बाल हत्या प्रतिबंधक गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई ( Savitribai Phule Information In Marathi ) आपलीच मुले मानत याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे पुनर्विवाहाचा कायदा व्हावा.

यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडत असत. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर 1890 सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. काव्यफुले व बावनकशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. त्यानंतर त्यांची भाषणही पुढे प्रकाशित करण्यात आले.

1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीर विक्रय करणार्‍या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून, त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. तसेच 1896 -97 दरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे.

See also  How to increase Android mobile speed मोबाइल हँग होत असेल तर काय करावे?

हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेग पीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातून 10 मार्च, 1897 रोजी त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 - Savitribai Phule Information In Marathi

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून 18 गावांमध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पती-पत्नींचा मेजर कँडी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी गृहिणी नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहे. सावित्रीबाईंच्या सामाजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाईंची प्रकाशित पुस्तके. दंपत्यावरील मालिका यांच्यावर विविध चित्रपट तसेच मालिका निर्मिती आहे. मध्यप्रदेश सरकारच्या उत्तम शिक्षकासाठी चा एक लाख रुपयांचा वार्षिक सावित्रीबाई पुरस्कार 2012 पासून सुरू झालेला आहे. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार सुद्धा आहे. मराठी पत्रकार परिषदेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे.

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा सर्वोत्कृष्ट नर्सला देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार आहे. सावित्रीबाई फुले यांच्या नावाची दत्तक पालक योजना सुद्धा आहे. कष्टाने शिक्षण घेतलेल्या मुलीला किंवा स्त्रीला सावित्रीची लेक म्हणायची रीत पडली आहे. त्यामुळे शिकलेल्या स्त्रियांच्या परिचय ग्रंथाला सावित्रीच्या लेकी सावित्रीच्या अशी नावे देण्यात येतात. त्यामुळे या नावाची पुस्तके अनेक लेखकांनी लिहिले आहेत.

नक्की वाचा – Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021 – महात्मा ज्योतिबा फुले

सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule Information In Marathi ) व ज्योतिराव फुले यांना स्वतःचे अपत्य नव्हते. त्यांनी एका विधवेला व तिचा मुलगा यशवंत याला आधार दिला होता. पुढे त्यांनी यशवंत याला दत्तक घेतले. तसेच त्याच्या आईचा म्हणजेच काशीबाईचा हि सांभाळ त्यांनीच केला. त्यांना लहानपणापासून शिक्षणाची आवड होती. म्हणून त्यांनी स्त्रीला सुशिक्षित व स्वावलंबी बनविण्याचा तसेच दलितांचे उद्धारकचा वेढा उचलला. त्यांना समाजातील सर्व पातळीवरून कडाडून विरोध झाला परंतु सर्व छळाला तोंड देत त्यांनी त्यांचे आंदोलन चालूच ठेवले.

See also  माझे आवडते वैज्ञानिक डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम आझाद Essay My Favorite Scientist Dr A.P.J. Abdul Kalam Azad in Marathi

सावित्रीबाई फुले यांच्या विषयी माहिती 2021 - Savitribai Phule Information In Marathi

ज्या काळात स्त्रीला चूल व मूल या बंधनात अडकवून ठेवले होते. त्या काळात जात, धर्म, लिंग यावर आधारित समाज व्यवस्थेला न जुमानता सावित्रीबाईंनी स्त्रीमुक्तीचा व स्त्री शिक्षणाचा पाया रचला 1947 आली. त्यांनी दलित वस्ती शाळा सुरू केली व सगुणाऊला शाळा चालवण्यात नेमले.

१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. गुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. 1 जानेवारी 1848 मध्ये ज्योतिराव व सावित्रीबाईंनी सर्वात पहिली मुलींची शाळा सुरू केली. ब्रिटिशांच्या काळात भारतीय व्यक्तीने सुरू केलेली ही पहिली शाळा होती. तसेच पुण्यात व मुंबईतही मुलींसाठी शाळा सुरू केल्या. गिरगावातील कमलाबाई हायस्कूल अजूनही कार्यान्वित आहे.

“आमची सावित्रीबाई फुले ( Savitribai Phule Information In Marathi ) बद्दल  माहिती यांच्याविषयी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Categories Job

Leave a Comment