Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ला

Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ला हा किल्ला महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा असून तो रायगड जिल्ह्यात आहे. तसेच हा किल्ला समुद्रसपाटीपासून 820 मिटर उंचीवर आहे. साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक वेगळीच ओळख आहे.

Raigad Fort Information in Marathi रायगड किल्ला

छत्रपती शिवाजीराजांनी Raigad चे स्थान आणि महत्त्व पाहून 16 व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. येथे शिवाजी महाराजांची समाधी सुद्धा आहे. इंग्रजांनी गड कब्जात घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस केली. आता हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.

इतिहास

Raigad या किल्ल्याची प्राचीन नाव रायरी हे होते. युरोपचे लोक त्यास पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणत होते. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य तितकाच रायगड अजिंक्य व दुर्गम होता. 500 वर्षांपूर्वी त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व ‘तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार, उंची व सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास ‘नंदादीप’ असेही नाव पडले. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता होत होता.

मोऱ्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला तर प्रतापराव मोरे विजापुरास पळाला. महाराजांनी 6 एप्रिल, 1656 रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आली. तेथे असताना, कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली. त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व पुरेसा आहे.

नक्की वाचा – माझा भाऊ मराठी निबंध

बाजारपेठ

नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो होळीचा माळ. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात, तीच शिवाजी महाराजांचा काळातील बाजारपेठ. पेठेचा दोन रांगात प्रत्येकी 22 दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजार पेठ आजही हुबेहुब जसेचा तसेच आहे.

See also  इको फ्रेंडली गणपती | Echo-Friendly Ganpati Utsav

स्तंभ

गंगासागराचा दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात. त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराचा शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. ते पूर्वी पाच मजले होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.

पालखी दरवाजा

स्तंभांचा पश्चिमेस भिंत असलेल्या भागातून 31पायऱ्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाजातून बाले किल्ल्यात प्रवेश करता येतो.

गंगासागर तलाव

हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेचा धर्मशाळेचा इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे 50-60 पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो. तो गंगासागर तलाव. महाराजांचा राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली. म्हणूनच याचे गंगीसागर असे नाव पडले. शिवाजी महाराजांचा काळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येत होत.

जिजाबाईंचा वाडा

जिजाबाईंना गडावरची थंड हवा, वारा मानवत नसे, म्हणून महाराजांनी त्यांचासाठी पाचाडजवळच एक वाडा बांधून दिला. तोच हा मासाहेबांचा राहता वाडा. वाड्याची व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी तसेच शिपायांची व्यवस्थाही महाराजांनी केली होती.

हिरकणी Hirkani टोक

हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेचा माऱ्यात आहेत.

महादरवाजा

महादरवाजाचा बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. महादरवाजाला दोन भव्य बुरूज असून एक 75 फूट तर दुसरा 65 फूट उंचं आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास जंग्या म्हणतात.

चोरदिंडी

महा दरवाजापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याचा थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी बांधलेली आहे. बुरुजाचा आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायऱ्या आहेत.

नाना दरवाजा

या दरवाजास ‘नाणे दरवाजा’ असेही म्हणत. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा 1674 च्या मे महिन्यात राज्याभिषेकाचा निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्‍री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास दोन कमानी आहेत. दरवाजाचा आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत. त्यांस ‘देवडा’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.

See also  Ganpati Bappa Morya "गणपती बाप्पा मोरया" असे गणपतीला का म्हटले जाते? 2021

हत्ती तलाव

महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो. तो हत्ती तलाव. गजशाळेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता.

मेणा दरवाजा

पालखी दरवाजाने वर प्रवेश केला की, चढउतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात ते आहेत राण्यांचे महाल. मेणा दरवाजातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो.

राजभवन

राणीवशाचा समोर डाव्या हातास दासदासींचा मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांचा मागे दुसरी जी समांतर भिंत आहे.

रत्‍नशाळा

राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्‍नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली आहे.

नगारखाना

सिंहासनाचा समोर जे भव्य प्रवेशद्वार दिसते तोच हा नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. नगारखान्यातून पायऱ्या चढून वर गेले की, माणूस किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.

शिरकाई देऊळ

महाराजांचा पुतळ्याचा डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते, ते शिरकाईचे देऊळ. शिरकाई ही गडावरील मुख्य देवता. शिर्के पाचव्या शतकापासून रायगडाचे स्वामी होते. याची आठवण देणारी गडस्वमिनी शिरकाई हिचे मंदिर गडावर आहे. लोकमान्य टिळकांचा काळात मावळकर नावाचा इंजिनिअराने हे मंदिर बांधले आहे. ते शिरकाईचे मूळ मंदिर नाही. मूर्ती मात्र प्राचीन आहे. मूळ शिरकाई मंदिर राजवाड्यास लागून डावीकडे होळी माळावर होते. तेथे मूळ देवळाचा चबुतरा अजूनही आहे.

जगदीश्वर मंदिर

बाजारपेठेचा खालचा बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. तेथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते. तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे. पण सध्या ही मूर्ती भग्रावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे.

महाराजांची समाधी Raigad Fort

मंदिराचा पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो. ती महाराजांची समाधी आहे. सभासद बखर म्हणते, क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके 1602 चैत्र शुद्ध 15 इ.स.1680 या दिवशी रायगड येथे झ़ाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याचा महाद्वाराचा बाहेर दक्षणभागी केले. तेथे काळ्या दगडाचा चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे अष्टकोनी जोते बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे.

See also  Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष

वाघ दरवाजा

वाघ दरवाजा हा दूरदर्शीपणा ची धोरण ठेवून महाराजांनी महादरवाजा शिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाजाने वर येणे जवळ -जवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाजाने निसटली होती.

टकमक टोक

जसजसे या टोकाकडे जावे तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला 2600 फूट खोल कडा आहे. टोकावर वारा जोरात वाहत असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी लागते. आधीपासुनच शिवराज्यकाळात या ठिकाणावरून गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.

खुबलढा बुरूज

गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजा शेजारी एक दरवाजा होता, त्यास ‘चित्‌ दरवाजा’ म्हणत पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झ़ाला आहे.

वाघ्या कुत्र्याची समाधी

इतिहासात असे म्हटले जाते की, शिवाजी महाराजांंचा अत्यसंस्कार चालू होता. तेव्हा शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्र्याने त्या आगीत उडी घेतली. तुम्ही या स्थळाला अवश्य भेट द्या व सर्व इतिहासातील घटनांचा आढावा घ्या. तुम्ही आमची आळंदी विषयी माहिती पण जरूर वाचा.

“तुम्हाला आमचा लेख Raigad Fort Information in Marathi कसा वाटला, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

 

Leave a Comment