Alandi Temple आळंदी मंदिर

महाराष्ट्रातील आळंदी Alandi Temple या गावी संत ज्ञानेश्वरांची समाधी आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे घालवलेला आहे. या आळंदी गावाला ‘देवाची आळंदी’ म्हणूनही ओळखले जाते. चोराची आळंदी या नावाचे आळंदी आणखीन गाव पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहे. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किमीवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी ही आळंदी खुप प्रसिद्ध आहे.

Alandi Temple आळंदी मंदिर

आळंदी हे शहर इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वरांची समाधी मंदिराच्या मागच्या बाजूला नदीवर असलेला घाट तेथे आहे. तो घाट दिसायला अतिशय सुंदर व आकर्षक आहे.

आळंदी इतिहास History of Alandi

आळंदी या गावाचा इतिहास खूप महत्त्वपूर्ण आहे. चांगदेव नावाचे एक ज्येष्ठ योगी ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला वाघावर बसून आले होते. त्यावेळी ज्ञानेश्वर आपल्या भावंडासह एका भिंतीवर बसून ऊस खात होते. चांगदेवांची भेट घेण्यासाठी ज्ञानेश्वरांनी त्या भिंतीला चालवत नेले, अशी आख्यायिका आहे. ही भिंत आळंदीला आहे. आळंदी हे एक तीर्थक्षेत्र आहे.

नक्की वाचा – माझे कुटुंब मराठी निबंध

त्यांच्या शिवाय तेथे विठ्ठल रखुमाई, राम कृष्ण, मुक्ताई यांची मंदिरेही आहेत. आषाढी व कार्तिकी एकादशीला येथे मोठी यात्रा भरते. ज्ञानेश्वराची पालखी पंढरपूरला जाते. आळंदी ते पंढरपूर हे अंतर 150 किलोमीटर आहे. पण भक्तिरसात चिंब भिजलेले वारकरी पावसाळा पाण्याची तमा न बाळगता हे अंतर पार पाडत असतात. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीता हा ग्रंथ मराठीत आणला.

श्री ज्ञानदेवांनी या ठिकाणी संजीवनी समाधी घेतल्याने या गावाचे महत्व अमर होऊन गेले आहे. गेल्या 700 वर्षात अनेक संस्थांच्या आणि ऐतिहासिक घटनांच्या पाहुलखूणा येथे उमटलेल्या आहे. तसे पाहिले तर पौराणिक काळापासून हे गाव प्रसिद्ध आहे.

इतिहासकालिन राजवाडे यांच्या मते, आळंदी हे गाव मध्य युगातले आहे. कृष्णराज राष्ट्रकूट यांच्या तळेगाव ताम्रपटात आळंदी गावाचा उल्लेख आढळतो. इंद्राने पृथ्वीवर येऊन महाया केला. तो इथेच स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात 64 व्या अध्यायात या गावाची व वारणा, अलका, करनेका, आनंद व सिद्धेश क्षेत्र अशी नावे आहेत.

See also  Aapleabhilekh Mahabhumi 1880 साल पासुन चे जमिनीचे जुने कागदपत्रे पहा मोबाईल वर

गणपतीपुळे – Ganpatipule In Marathi

आळंदी चे महत्व Importance of Alandi

Alandi  हे तीर्थक्षेत्र एवढी पावन तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे आळंदीचे महत्त्व कथन करणारी संस्कृत आणि मराठी मध्ये प्रत्येक दोन बातम्या आहेत. मात्र ही सारी हस्तलिखिते संकलित करून प्रकाशित करण्याचे काम झालेले नाही. पुरणाच्या सह्याद्री खंडाच्या 61 व्या अध्यायात अलकापुरी असा आळंदीच्या संस्कृत मध्ये उल्लेख आहे.

123 लोकांमध्ये आप्पा वैद्य यांनी 1856 मध्ये संक्षिप्त रूपामध्ये लिहिलेले अकरा पृष्ठांचे हे हस्तलिखित भारत इतिहास संशोधक मंडळ मध्ये होती. पुराणामध्ये करून रशिया येथील संशोधिका डॉ. इरीना गलुष्कोव्हा यांनी मास्को ओरिएंटल संस्थेमध्ये प्रबंध सादर केला होता. याव्यतिरिक्त अलका महात्मे नावाचे दुसरे असे लिखित भारत इतिहास संशोधक मंडळात मध्ये आहे.

यामध्ये 46 पाने असून संत कवी बालमुकुंद केसरिया ग्रंथाचे लेखक आहे. यामध्ये 133 श्लोक आहेत. तसेच यामध्ये आळंदीचा उल्लेख आनंदवन अलका व ती अलका या नावाने केलेला आहे. तसेच महानदी या नदीचा उल्लेख कुबेरगंगा या नावाने केलेला आहे. हे संतकवी सोळाव्या शतकात झालेले असावे.

ज्ञानलीलाअमृत हा कवी सदाशिव यांनी आळंदी महत्त्व कथन करणारा मराठी ओवीबद्ध ग्रंथ लिहिला आहे. हे हस्तलिखित आळंदी करणे ही बाब पर्मुखा देवीवरून मासिकाकडे प्रसिद्धीसाठी दिले आहे होते. त्यातील बराचसा भाग मासिकातून प्रमाण अशा प्रसिद्ध झाला होता. मात्र तो ग्रंथरूपात आलेला नाही.

त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कीर्तनकार सदानंद बुवा कुलकर्णी यांनी आमची आळंदी हा ओवीबद्ध ग्रंथ लिहिला होता. यामध्ये अठरा अध्याय असून 200 ओव्यांचा समावेश आहे. हे हस्तलिखित इरीना गलुस्कोव्हा यांनी पाहिले होते. या ग्रंथाची हाताने लिहिलेली नक्कल प्रत डॉक्टर ढेरे यांच्या संग्रहातून मराठी हस्तलिखित केंद्राकडे आली आहे

दिवाळी – information of diwali in marathi

ज्ञानेश्वरांची (Dnyaneshwar Maharaj) समाधी

Alandi येथे संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी म्हणजेच 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधी मंदिर हे 1570 मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते. आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जात असते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे 216 किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जात असतात.

See also  Nanda Saukhya Bhare 'नांदा सौख्य भरे'

शिवाजी महाराजांनी एका शेताचे उत्पन्न श्री ज्ञानोबांच्या समाधिस्थ नाव दिले होते. त्यानंतर राजाराम महाराज बाळाजी पेशवे पहिले बाजीराव यांनी आळंदी गावाकडे लक्ष पुरविले आणि आळंदीला गाव पण दिले. क्षेत्राच्या सौंदर्यात भर पडली त्यानंतर अनेक धनिकांनी या गावाला घेऊन त्यामध्ये वास्तू बांधल्या गेल्यात .

हैबतबाबा पायरी Haibatbaba Payari

हैबतबाबा श्री ज्ञानेश्वर महाराजांचे फार मोठे भक्त पंढरपूर येथे जशी नामदेवांची पाहिली तशीच आळंदी येथे हैबतबाबांची पायरी. त्यांचे वंशज आजही पालखी सोहळा चालवतात .

श्री सिद्धेश्वर Shri Siddheshwar

हे शिवलिंग फार प्राचीन आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी आळंदी प्रसिद्ध होती. ती सिद्धेश्वर यामुळेच श्री सिद्धेश्वर ज्ञानेश्वराचे हे कुलदैवत आहे.

अजानवृक्ष Ajanwruksh

हा रुक्ष पवित्र समजला जातो. या वृक्षाची छाया देऊळवाड्यात शतकानुशतके पडली आहे. याची मुळे समाधी स्थानात श्री ज्ञानदेवांच्या कंठास लागली आणि श्री एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती दूर केली. अशी आख्यायिका आहे. येथे भाविक श्री ज्ञानेश्वरांची अखंड परायण करतात.

सुवर्ण पिंपळ Suvarn Pimpal

पिंपळ वृक्ष देऊळवाड्यात फार पुरातन काळापासून उभा आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या वृक्षांमुळे उदयाला आले आणि जगाला चार सोन्यासारखे मोठे मिळालीत.

श्री एकनाथ पार Shri Eknath

श्री ज्ञानेश्वरांच्या मंदिरात असलेल्या श्री केसरीनाथ मंदिरासमोर चा हा एकनाथ फार जुना होता. 1976 साली चिंचवडचे ज्ञानेश्वर भक्त श्री जगन्नाथ गणपती गावडे यांनी स्वखर्चाने पुन्हा बांधून संस्थानाला अर्पण केला. या पारावर नाथांच्या पादुका बसविण्यात आलेल्या आहेत.

पुंडलिकांचे देऊळ  Pundilik Mandir

पुण्यातील एक सावकार चिंतामण विठ्ठल माळवतकर यांनी 1857 बांधलेले हे मंदिर इंद्रायणी नदीच्या पत्रात आहे.

विश्रांत वड

श्री ज्ञानेश्वर चांगदेव भेटीची साक्ष वडगाव घेनंद रस्त्यावर या भेटीची साक्ष विश्रांत आजही देत आहे. चांगदेवांचे असंख्य शिष्य विंचवाचे रूपाने अश्विन महिन्यात नवरात्र उत्सवाचे वेळी श्री ज्ञाने देवांची पालखी तेथे जाते. त्यावेळी प्रकट होतात पण वैशिष्ट्य म्हणजे कोणासही दंश नाहीत. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

See also  शेळीपालन व्यवसायासाठी आता 25 लाखापर्यंत कर्ज Goat Loan

श्री ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत वाघावर बसून आले. हातात सर्पाचा चाबूक होता. त्यांचा गर्व परिहार करण्यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराज हे त्यांचे भावंडासह भिंतीवर बसून त्यांना समोर गेले व त्यांना उपदेश केला.

आळंदी यात्रा उत्सव

कार्तिकी वारी संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला समाधी घेतली. त्या निमित्ताने कार्तिक वैद्य पक्षांमध्ये मोठी वारी भरते. संत क्षेत्री भरणाऱ्या यात्रेमध्ये ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा आहे. वैद्य अष्टमी ते वद्य त्रयोदशी असा यात्रा कालावधी असून एकादशी ते त्रयोदशी हे यात्रेचे महत्त्व दिसून येते. यात्रेसाठी पंढरपूर वरून संत नामदेवाची पालखी येते.

आषाढी पालखी

सोहळा पालखी प्रस्थान आषाढी वारीसाठी संत ज्ञानेश्‍वरांचा पालखी सोहळा पंढरपूरला जातो. ज्येष्ठ वद्य अष्टमीला पालखी प्रस्थान होते. पहिल्या दिवशीचा मुक्काम आळंदी मध्येच गांधी वाड्यात होत असतो. दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ वद्य नवमीला पालखी आळंदीहून निघते. प्रस्थान व प्रस्थानाच्या आठ दिवस आधी आळंदीमध्ये यात्रे प्रमाणे गर्दी होते.

पालखी परत येते

आषाढ वद्य दशमीला पालखी आळंदीला परत येते. पालखी परत येते त्या आषाढ वद्य दशमी व एकादशीला यात्रे प्रमाणेच गर्दी असते.

राहण्याची व्यवस्था

आळंदी येथे भरपूर धर्मशाळा आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे भक्त निवास सुद्धा आहेत. राहण्याची मुबलक व्यवस्था असली तरी यात्रेमध्ये मात्र राहण्याची सोय होणे अवघड होते. यात्राकाळात जायचे झाल्यास आधी मुक्कामाची सोय करून जावे. तसेच आळंदी येथे यात्रा भरतांना आपण पुणे किंवा देहू या जवळच्या गावातही मुक्काम घेऊ शकतो.
तुम्हीही आळंदीला नक्की भेट द्या व श्रींचा आशीर्वाद द्या.

“तुम्हाला Alandi Temple विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

आमच्या mrathibatmi या website ला नक्की भेट द्या

Leave a Comment