Narsobachi Wadi ही कोल्हापूरपासून 51 किमीवर कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर वसलेले आहे. तसेच शिरूर तालुक्यातील 417 हेक्टर क्षेत्राचे गाव आहे. प्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहपूर म्हणजेच नरसोबाची वाडी आहे. दत्तात्रेयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वतींचे या ठिकाणी बारा वर्षे वास्तव्य होते असे सांगितले जाते.
Narsobachi Wadi नरसोबाची वाडी
श्री नृसिंह सरस्वतीनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती आणि त्यांच्याबद्दलचे अनेक चमत्कार येथे घडल्याचे सांगितले जाते. श्री नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचे येथे पूजा केली जाते. जेव्हा पावसाळ्या -मध्ये कृष्णाला पूर येतो. तेव्हा मंदिर पाण्याखाली जाते. पुराच्या पाण्याच्या खुणा त्यानंतरसुद्धा मंदिर परिसरावर दिसत राहतात.
इथूनच पुढे तीन किमी वर कुरुंद्वाड आहे. स्वातंत्र्य पूर्वी हे एक संपन्न संस्थान होते. कुरुंद वाढला नदीवर बांधलेला घाट आवर्जून पाहण्याजोगा आहे. तेथून खिद्रापूर जवळपास पंधरा किमी वर आहे. तेथे बारा वाजता महाप्रसादाची सोय आहे. दत्तप्रभू चे दुसरे अवतार म्हणून ओळखले जाते. अशा सरस्वतीं च्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या क्षेत्राला मध्ये दत्तप्रभूंची राजधानी म्हणून घोषित केले.
दिवाळी – information of diwali in marathi
कृष्णेचा घाट Narsobachi Wadi
कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली एक मंदिर आहे. मंदिरातच नृसिंहसरस्वतीजिंनी स्थापना केलेल्या पादुका आहेत. वाढवून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली व त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
दत्तपादुकांची स्थापना करून नरसिंहसरस्वती गाणगापुरास गेले. दत्तपादुकांचे मंदिर कृष्णेच्या घाटावर आहे. हा घाट संत एकनाथांनी बांधला, असे म्हणतात. भूतबाधा व कुष्ठरोग यांचे निवारण होते, या समजुतीने बरेच लोक येथे येऊन राहतात. चातुर्मास सोडून दर शनिवारी श्रींची पालखी निघते. भाविक लोक गुरुचरित्राची पारायणे व सप्ताह करतात. येथे दत्तात्रेयाचे व नारायणस्वामींचे अशी दोन मोठी मंदिरे आहेत.
दसरा – Dasara Information In Marathi
दत्तजयंती Narsobachi Wadi
दत्तजयंती मार्गशीर्ष पौर्णिमा आणि गुरुद्वादशी इ. सांप्रदायिक उत्सव येथे मोठ्या प्रमाणात साजरे होतात. देवांच्या पादुकांची पूजा नेहमीच अखंड चालू असते. नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातले शांत, काहीसे पारंपरिक, प्रसन्न वातावरण मनाला प्रसन्न करून सोडते.
या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत,
त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात, त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते.
सांप्रत उभे असलेले नरसोबा वाडीचे हे मंदिरविजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजार्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळ्याला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला.
त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. यापैकी औरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये येतो. या गावात अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. नसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संथ वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे.
नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी इत्यादींची समाधी मंदिरे आहेत.
Narsobachi प्राचीन कथा
प्राचीन काळी इथे घनदाट जंगल होते. नरसिंह सरस्वती स्वामी हे भगवान दत्ताच्या 16 व्या अवतारांमधील एक. कुरूंदवाड ही त्यांच्या तपश्चर्येची जागा. सन 1034 ते 1982 या दीर्घ कालावधीमधे, रामचंद्र योगी, नारायण स्वामी, मौनी महाराज, टेंबे स्वामी, महादबा पाटील या तपस्वी जनांच्या समाधी ‘वाडी’ येथे बांधल्या गेल्या. या ठिकाणी कृष्णा-पंचगंगेच्या संगमावरती असलेल्या मंदिरास 500 ते 600 वर्षांची परंपरा लाभली आहे.
नित्य उपासनेमधे सोन्याचा मुकुट मूर्तीला घालून, पाने ग्रहण करण्याचा विधी असलेली, रोज पहाटे होणारी ‘महापूजा’ पाहण्यासारखी असते. चातुर्मास वगळता रोज रात्री देवाच्या पालखीची मिरवणूक निघते. या मिरवणूकीच्या पूर्वी निरनिराळया मंत्रांचे उच्चारण होते. तेंव्हाचे मंगल, धार्मिक वातावरण प्रभावशाली असते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या ‘भक्त मंडळा मार्फत, या मंदिराची सर्व व्यवस्था ठेवली जाते. दत्त संप्रदायाच्या वस्तूंची दुकाने तसेच मिठाईची दुकाने नरसिंहवाडीला आहेत. पैठण प्रमाणेच या ठिकाणचा घाट देखील संत एकनाथांनी बांधून घेतला. कान्यगत अवसर असताना, तसेच प्रत्येक पौर्णिमेस इथे जत्रा भरते. हे ठिकाण कोल्हापूरपासून, 40 किमीवर आहे.
आदिलशहा भाविक होता व त्याने अनेक भू-भाग दान केल्याविषयी माहिती इथे सापडते. दरवर्षी 10 लाख भाविक या जागेस भेट देतात. इथे ग्राम पंचायत असून, दळणवळणाची सुविधा आहे.
त्रयंबोली मंदिर
करवीरच्या पूर्व दिशेला एका उंच टेकडीवर, रम्य मंदिरामध्ये वास करून देवीने अनुग्रह दिला आहे. जवळच तर्क तीर्थ नावाचे कुंड होते. आजही ते थोडे फार वापरात आहे. टाकळ हे त्याचे अलिकडचे नाव. मूळचे मंदिर लहान असून, आतील मूर्ती स्वयंभू आहे. काळ्या पाषाणातील ही मूर्ती चतुर्भुज आहे. येथली मूर्ती, महालक्ष्मी मंदिराकडे पाठ करून आहे.
त्रयमाली हे या देवीचे दूसरे नाव आहे. अनेक करवीर वासीयांचे हे श्रध्दास्थान आहे. मंदिराच्या पायऱ्यांवर जलधारांचा अभिषेक करण्याचा धार्मिक विधी या ठिकाणी दर आषाढ महिन्यात मोठ्या उत्साहाने पार पडतो. जवळच यमाई मंदिर आहे. देवस्थान कमिटीने छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला आहे. या मंदिराची चोख व्यवस्था गुरव कमिटी ठेवते.
Narsobachi Wadi ची कथा
कृष्णेच्या पलीकडील तीरावर एक दरिद्री दाम्पत्य रहात असे. एकदा दत्तप्रभू त्या ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेले, परंतु घरात काहीही नसल्या मुळे ती स्त्री भगवंताना भिक्षा घालू शकली नाही. तेथून निघताना त्यांच्या अंगणात असलेला घेवड्याचा वेल नृसिंहसरस्वतींच्या नजरेस पडला, त्यांनी तो क्षणार्धात उपटला आणि निघून गेले.
त्या स्त्रीला त्याचे खूप दुःख झाले आणि ती शोक करू लागली कारण घरात काही शिजवायला नसतांना त्या घेवड्यावर निदान त्यांचे पोट तरी भरत होते. पती घरी आल्या नंतर तीने घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्याने तिला शांत करून तो वेल दूर नेऊन टाकला आणि त्या ठिकाणची माती नीट करत असतांना चमत्कार घडला. त्यांना सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा सापडला. धावत जाऊन त्या पती-पत्नींनी दत्तप्रभूंचे पाय धरले.
आजही भाविक नरसोबाच्या वाडीला गेल्यावर ती वेल उपटलेली जागा बघण्यास आणि तेथे असलेल्या मंदिराचे दर्शन घेण्यास आवर्जून जातात. नृसिंहवाडीला पूर्वी अमरापूर म्हणून ओळख होती. हा सर्व परिसर अरण्याने भरलेला होता. नरसोबाची वाडी हे गाव त्यानंतर बऱ्याच काळाने वसले आहे.
या मंदिराबद्दल एक कथा अशी देखील सांगितली जाते की, Narsobachi Wadi तील हे मंदिर विजापूरच्या आदिलशाहने बांधले आहे. हिंदू धर्मियांचे हे पवित्र मंदिर असले तरी या ठिकाणी आपल्या मुलीची दृष्टी परत यावी यासाठी त्याने प्रार्थना केली होती. त्याच्या हाक भगवंताने ऐकल्याने समाधानी झालेल्या आदिलशाहने या ठिकाणी मंदिर बांधून दिले होते. तुम्ही या ठिकाणाला नक्की भेट द्या.
” Narsobachi Wadi “या विषयी आमचा लेख तुम्हाला कसा वाटला, ते कमेंट करून नक्की सांगा.