दौलताबाद ( Daulatabad Killa Information In Marathi ) हा किल्ला औरंगाबाद जिल्ह्यात आहे. दौलताबादचा किल्ला महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात एक आकर्षक किल्ला म्हणून ठरलेला आहे. तसेच या किल्ल्याला देवगिरी किल्ला या नावानेही ओळखले जाते. या किल्ल्याला 28 नोव्हेंबर, 1951 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. या किल्ल्यावर पंचधातुनी बनवलेली एक तोफ आहे. ही तोफ किल्ल्यावरच बनवलेली आहेत. त्या तुफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे. तोफेवर कोरलेली माहिती ही पर्शियन भाषेत लिपीत आहे.
Daulatabad Killa Information In Marathi – दौलताबाद किल्ला विषयी माहिती
कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या यादव वंशातील दुसरा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून, पुढे तेथून राज्य चालविले. त्यानंतर पुढे सिंघाना व त्यानंतर त्याचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढविले. या कृष्णाचा भाऊ महादेव याची खरी जन्मतारीख 29 ऑगस्ट, 1261 अशी असल्याचे निश्चित झाले आहे. त्याने उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यात जोडण्यात यश प्राप्त केले आणि गादीवर आपल्या मुलाला अमन्नाकडे सोपविले.
दौलताबाद किल्ल्याचा ( Daulatabad Killa Information In Marathi ) नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित ठेवता येईल. असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच उंच भिंती, किल्ले बंदी करणाऱ्या वृत्तात संपूर्ण किल्ला चहू बाजूंनी जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात.
किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी. एका बाजूला किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे. या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहे. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात आलेले आहेत. या कोठडीमध्ये काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली आहेत.
देवगिरी किल्ला हा यादव वंशाच्या भिल्लम या राजपुत्राने देवगिरी गावाची स्थापना केली. जवळ जवळ दोनशे वर्ष यादवांनी इथे सत्ता भोगली. पुढे या राज्याची सत्ता सुलतान कडे गेली. देवगिरीचा भौगोलिक स्थिती महत्त्वपूर्ण असल्यामुळे मोहम्मद बिन तुगलक याने काही काळासाठी दिल्लीहून आपली राजधानी देवगिरीला आणली व देवगिरीचे नामकरण केले ते म्हणजे दौलताबाद. देवगिरी हे भारताचा मध्य ठिकाणी असल्यामुळे येथून उत्तर व दक्षिण या दोन्ही दिशेला वर्चस्व प्रस्थापित करता येऊ शकत होते.
नक्की वाचा – शिवजयंती – Shivaji Maharaj Jayanti 2021
देवगिरी किल्ल्यावर पाहण्यासारखे काय आहे तर देवगिरी किल्ला हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात महत्त्वपूर्ण असा एक अभेद्य किल्ला म्हणून ओळखला जातो. देवगिरी किल्ल्यावर आपल्याला भारताच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे बांधकाम शत्रूसाठी या किल्ल्यावर चढाई करणे म्हणजे आपले प्राण त्याने असेच होते. देवगिरी किल्ल्याच्या या वास्तू पाहण्याजोग्या आहेत. तटबंदी दरवाजा भव्य व शिल्पांनी सजलेला दरवाजातून आपण प्रवेश करून आत आल्यावर आपण किल्ल्याच्या सुरुवातीच्या जागी येऊन पोहोचतो. डोंगरी किल्ला असला तरी किल्ल्याच्या भिंती तळापासून बांधलेल्या नजरेस पडतात देवगिरी किल्ला हा अनेक तटबंदीने वेढलेली आहे.
किल्ल्याच्या मध्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपणाला किल्ल्याचे सात दरवाजे पार करावे लागतात. पहिली तटबंदी ओलांडून आत आल्यावर आपल्याला हा भव्य दरवाजा पहावयास मिळतो. ज्याचे नाव महाकाय दरवाजा आहे. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. शत्रूकडे हत्तीच्या धडके पासून वाचवण्यासाठी दरवाजावर लोखंडी खिळे लावण्यात आले आहेत. या दरवाज्यातून आत गेल्यावर आपणाला त्या किल्ल्याचे भव्य तसेच सुरेख व सुंदर बांधकाम पहावयास मिळते.
महाकाव्य दरवाजा जवळ एक सरस्वती नावाची विहीर व एक जैन मंदिर आहे. पहिल्या व दुसऱ्या दरवाजातून पुढे गेल्यावर एक मोकळी जागा पहावयास मिळते. तेथे आपणाला किल्ल्यावरील चाकांच्या ठेवलेल्या छोट्या तसेच मोठ्या तोफा पाहावयास मिळतात. शत्रूपासून किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी या तोफांचा वापर केला जाईल तिथे तोफा व त्यांचे दार उघडे आपणाला सुस्थितीत ठेवलेले पहावयास मिळतील.
दौलताबादच्या किल्ल्यावर ( Daulatabad Killa Information In Marathi ) पाहण्यासारखे बरेच ठिकाण अजूनही सुव्यवस्थित दिसतात. सरस्वती विहीर व जैन मंदिरापासून पुढे गेल्यानंतर आपल्याला टेहळणी बुरुज दिसतो. टेहळणी बुरुज हा तिसरा दरवाज्यासमोर आहे. जेव्हा शत्रू पहिला व दुसरा दरवाजा ओलांडून तिसऱ्या दरवाज्यापाशी येतो. तर समोरच बुरुजावर तोफांचा व बाणांचा मारा करण्यासाठी ही जागा आहे. शत्रुला भ्रमित करण्यासाठी तिसऱ्या दरवाजापाशी आणखीन एक दरवाजा आहे. शत्रूला ठीक-ठिकाणी अडवण्यासाठी किल्ल्यावर असे अनेक भिंती बांधण्यात आलेल्या आहेत.
चांद मिनार : कुतुब मिनारची एक प्रतिकृती असल्यासारखी आहे. चौथ्या तटबंदीतून आत गेल्यावर आपल्याला एक सपाट भाग दिसतो. थोडे पुढे गेल्यावर आपल्याला एक गुलाबी रंगाचा तीन मनोरे असलेला चांद मिनार पहायला मिळतो. या मिनार प्रत्येक मजल्याला पायऱ्या व सहा झरोके आहेत. अतिशय सुंदर असे या मिनारचे बांधकाम केलेले आहे. इसवी सन 1435 च्या वेळेस सुलतान अहमदशहा यांनी गुजरातच्या स्वारीच्या विजयाप्रीत्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. या मनोर्याचे बांधकाम इराणी पद्धतीचे आहे.
नक्की वाचा –राजर्षी शाहू महाराज – Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi 2021
आतमधून वर पर्यंत जाण्यास गोलाकार जिना आहे व मध्ये जागोजागी हवा आणि उजेडासाठी झरोके आहे. सध्या या मनोरामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. या चांद मिनारच्या मागच्या बाजूस काही इमारतींचे अवशेष दिसतात. इथे काही राजवाडे मशिदी होत्या आणि काही ठिकाणी हमामखाना असल्याचे सुध्दा मला दिसते. यापैकी एक इमारती मध्ये किल्ल्यातील सर्व वास्तू एका ठिकाणी आणून ठेवल्या आहेत. इथे तोफा मंदिरांवर आढळणारी सर्व शिल्प ठेवलेली आहेत. सुंदर बगीचा देखील येथे बांधलेला आहे. हे सर्व पाहून मन मुख्य रस्त्याला लागायचे आणि समोरची वाट धरायची तसेच हळूहळू मुख्य देवगिरीकडे वाटचाल करायला सुरुवात करायची असेच होते. मोगलांच्या काळात ह्या मंदिराचे रुपांतर मशिदीमध्ये केलेले दिसते.
हत्ती तलाव : चांद मिनार जवळून पुढे गेल्यास आपल्याला एक भलामोठा हौदाच्याच्या आकाराचा तलाव दिसतो. हा किल्ल्यावरील सर्वात मोठा तलाव आहे व या तलावातून किल्ल्यासाठी सर्वत्र पाणीपुरवठा केला जात होता. जवळ किल्ल्यावरील उध्वस्त झालेल्या वास्तूचे अवशेष आपल्याला पहावयास मिळतात. तसेच भारत माता मंदिर हत्ती तलावाच्या समोरच एक भव्य दरवाजा लागतो. त्या दरवाजातून आत गेल्यावर एक भव्य सभामंडप दृष्टीस पडतो. तसेच पुढे गेल्यावर आपल्याला सुंदर नक्षीकाम केलेल्या वास्तू नजरेस पडते. यादवकालीन वास्तू परंपरेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. 1947 ते 1948 यामध्ये याच्या काळात स्थानिकांनी भारत मातेच्या मूर्तीची येथे स्थापना केली आहे.
महाराष्ट्रातील काही सर्वोत्कृष्ट किल्ल्यां -मध्ये देवगिरी किल्ल्याची गणना केली जाते. सभासदाने याचे वर्णन ‘दुर्गम दुर्ग देवगिरी हा पृथ्वीवरील चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका’ असे केलेले आहे. या देवगिरी पूर्वी सुलगिरी या नावाने देखील हा किल्ला ओळखला जात असे. राजा भिल्लम यादवाने बांधलेल्या या दुर्गाची प्रतिष्ठा आणि ऐश्वर्य इंद्र नगरीशी स्पर्धा करीत होते असे देवगिरीचे वर्णन आढळते. या देवगिरीची देवगड व धारागिरी अशी नावे आढळतात. पुढे मोगलांचे आक्रमण या गडावर झाल्यावर त्याचे नाव दौलताबादचा किल्ला म्हणून प्रसिद्ध झालेल्या किल्ल्याच्या पायथ्याला पूर्णपणे सपाट प्रदेश आहे. या प्रदेशात अनेक उध्वस्त झालेल्या इमारतींचे अवशेष आजही आपल्याला दिसतात.
कालाकोट देवगिरी : कालाकोटच्या तटबंदी मधील पहिल्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस भक्कम बुरुज आहेत. यामधून आत शिरल्यावर मुख्य देवगिरी किल्ल्याच्या चढणीला सुरुवात होते. आत शिरल्यावर वाट उजवीकडे वळते आणि तसेच या वाटेवरच सैनिकांना राहण्यासाठी दालन आहेत. याच्या पुढे दुसरे प्रवेशद्वार आहे, याचे नाव दिंडी दरवाजा याची लाकडी दारे असून आजही शिल्लक आहेत. पुढे तसेच आणखीन पहारेकर्यांच्या देवड्या मग आणखीन पुढे पायऱ्या लागतात व ह्या सोडून पुढे गेल्यावर एक पडलेल्या अवस्थेतील वाडा लागतो. याचे नाव चीनी महाल आहे.
हा वाडा दुमजली आहे असा त्याच्या बांधणीवरुन वाटते. या वाड्याचा उपयोग कैदखाना म्हणून केला जात असे. पुन्हा मागे येऊन डावीकडे वळायचे इथे आणखी एक वाडा आहे. त्याचे नाव निजामशाही वाडा आहे. यात अनेक खोल्या व दालने आहेत. एकंदर वाड्याच्या आकारमानावरून खरोखर इथे राजेशाही थाट असावा असे वाटते. या वाड्यातील कोरीव काम सुद्धा अप्रतिम आहे. वाडा पाहून एक वाट वाड्याच्या मागच्या बाजूस असणार्या लेण्यांकडे जाते.
तुम्हीही नक्की देवगिरी/ दौलताबाद किल्ल्याला ( Daulatabad Killa Information In Marathi ) भेट द्या व या सर्व वास्तू पाहून प्रत्यक्ष अनुभव घ्या. “तुम्हाला आमची माहिती देवगिरी किल्ल्याबाबत ( Daulatabad Killa Information In Marathi ) कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”