Tuljapur Bhavani Temple Live Darshan तुळजापूर भवानी

तुळजापूरTuljapur Bhavani Temple Live Darshan हे तुळजापूर भवानीउस्मानाबाद जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. तसेच ते समुद्रसपाटी पासून 2600 फुट उंचीवर आहे. तुळजापूर येथील भवानी मातेचे मंदिर बालाघाट डोंगराच्या कडेपठारावर वसलेले आहे तसेच हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत आहे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. या डोंगराचे पुराण ग्रंथातील जुने नाव यमुनागिरी असे होते. या डोंगरावर खूप प्रमाणात चिंचेची झाडे असल्यामुळे त्याचे नामकरण चिंचपूर झाले. नंतर तुळजाभवानीच्या नावाने लोक तुळजापूर म्हणू लागले.

Tuljapur Bhavani Temple Live Darshan तुळजापूर भवानी

भवानी आई आपल्या भक्तांसाठी धावून येणारी व संकटांना हरणारी आहे. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक भक्त दर्शनासाठी तुळजापुरला येतात. या देवीचे भक्त केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही आहेत हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत.

उस्मानाबाद पासून तुळजापूर अंतर 22 किमी आहे. सोलापूर येथून 45 किमी आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे. रेल्वेने सोलापूर किवा उस्मानाबाद ला येवु शकता.

चिखलदरा थंड पर्यटन स्थळ – Chikhaldara Information In Marathi

तुळजापूर विषयी पौरानिक कथा

Tuljapur Bhavani Temple Live Darshan तुळजापूर भवानी 

लाईव दर्शन करीता वरील लिंक वर क्लिक करा

कृतयुगात कर्दभ नावाचे तपोनिष्ठ ऋषी होऊन गेले. त्यांची पत्नी अनूभुती रुपसंपन्न असून पतिव्रता होती. सुदैवाने तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु त्यांचा सुखी संसार फार काळ टिकला नाही. कारण कर्दभ ऋषींनी लवकरच इह्लोकीची यात्रा संपविल्यामुळे अनुभुतिने सती जाण्याचा निर्णय घेतला, परंतु अल्पवयीन पुत्राला मागे सोडून पतिसोबत सहगमन करू नये असे ऋषींनी शास्त्राचा आधार घेऊन सांगितले असता,

अनुभूतीने आपल्या पुत्राला गुरुगृही सोडून ती मेरू पर्वतानजिक असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली आणि तिथे आश्रम बांधून तिने तपश्चर्या सुरू केली. तिची तपश्चर्या सुरू असताना कुकर नावाचा दैत्य तिच्या अप्रतिम सौंदर्यावर लूब्ध झाला. त्याच्या मनात पापवासना निर्माण होऊन त्याने तिला स्पर्श केला त्यामुळे तिची समाधी भंग पावली. दैत्याने काही अनुचित प्रकार करु नये म्हणून तिने आदिशक्तिचा धावा केला.

See also  शेळीपालन व्यवसायासाठी आता 25 लाखापर्यंत कर्ज Goat Loan

आदीशक्तीने या दैत्याच्या तावडीतून आपली सुट्का करावी आणि खरोखरच देवी भवानी मातेच्या रुपाने त्वरित धावून आली. तिने दैत्याशी युदध केले. दैत्यही महिषाचे रूप घेऊन आला. तेव्हा देविने त्रिशुळाने त्याचे शीर वेगळे केले. ही भवानी देवी वेळीच अनुभूतीच्या रक्षणासाठी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असे नाव पडले. कालांतराने त्वरिताचे तुरजा व त्याचे पुढे तुळजा झाले. निजामशाही असो किंवा आदीलशाही असो कोणीही धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करीत नसत.

दौलताबाद किल्ला विषयी माहिती

कल्लोळ तीर्थ ( Kallol Tirth )

भवानी मातेच्या मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या उतरल्यानंतर महाद्वार लागते. त्यावरील काही शिल्प हेमाड्पंथी असून तिथे नारद मुनींचे दर्शन घडते. पुढे गेल्यावर कल्लोळ तीर्थ लागते. देवी इथे आल्यानंतर जेव्हा या तीर्थाची निर्मिती केली. तेव्हा पृथ्वीवरील सर्व उदकतीर्थे या तीर्थास धावून आल्यामुळे त्यांचा एकच कल्लोळ झाला. म्हणून या तीर्थास ’कल्लोळ तीर्थ’ म्हणतात.

गोमुख तीर्थ( Gomukh Tirth )

या तीर्थापसून समोरच गोमुख तीर्थ लागते. त्यातून अहोरात्र पाण्याचा प्रवाह वाहतो. त्याचप्रमाणे श्रीदत्ताचे हस्तप्रक्षालनाचे ठिकाण आहे. पूढे गेल्यावर अमृतकुंड लागते. त्याच्या अलीकडे गणेश मंदिर आहे. येथे सिद्धीविनायक आहे. नंतर निंबाळकर दरवाजा लागतो. दरवाजा ओलांडून आत गेले असता मातेचा कळस नजरेस पडतो.

हा कळस पंचधातूपासून बनविला आहे. मंदिराच्या दर्शनी बाजुस होमकुंड आसून त्यावर शिखर बांधले आहे. मंदीराचा सभामंडप सोळाखांबी असून पश्चिम दिशेला मातेचा गाभारा आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. होमाच्या डाव्या बाजूला दर्शन मंडप उभारण्यात आले आहे. हे पाच मजली इमारत असून धर्म दर्शन व मुख दर्शन अशे भाग केले आहेत.

तुळजापूर देवीचे वर्णन Tuljapur Bhavani Temple Live Darshan

गाभाऱ्याच्या मधोमध चांदीच्या सिंहासनावर आरूढ झालेली भवानी मातेची मूर्ती गंडकी शिळेची असून तिने विविध शस्त्रे धारण केलेली आहेत. देवीने एका हातात महिषासुराची शेंडी धरली आहे. तर दुसऱ्या हाताने त्याच्या बरगडीत त्रिशूळ खुपसला आहे. तिच्या उजव्या पायाखाली महिषासुर व डाव्या बाजूला सिंह आणि पुराण सांगणारी मार्कंडेय ऋषीची मूर्ती दिसते.

See also  राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार पंचात्तर हजार रुपये State Government Decision

देवीच्या उजव्या खांद्याजवळ चंद्र व डाव्या खांद्याजवळ सूर्य कोरलेला दिसतो. देवीला कोणीही स्पर्श करू शकत नाही. देवीची पूर्वी 3 वेळा पूजा केली जात असे. आता मात्र सकाळ-संध्याकाळ अशी 2 वेळा पूजा केली जाते.‍ गाभाऱ्याच्या उत्तरेस शयनगृह असून त्यात मातेसाठी एक चांदीचा पलंग ठेवला आहे. तसेच दक्षिण दिशेला देवीचे न्हाणीघर आहे.

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी, पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्ट्मी व भाद्रपद वद्य अष्ट्मी ते अमावस्या अशी देवीची तीन शयन वर्षे ठरली असून इतर वेळी ती अष्टौप्रहर जागृत असते. तुळजाभवानी दसरा महोत्सवामध्ये देवी ला वेगवेगळ्या आकर्षक अलंकार घालून पूजा मांडण्यात येतात. भारतात एक मात्र मुर्ती जी स्थलांतरित आहे. देवी वर्षातून तीन वेळा नीद्रा घेते. दोन वेळा चांदीच्या पलंगावर व एक वेळा नगर वरुण पलंग येतो.

सभामंडप ओलांडून गेल्यावर पूर्वेला भवानी शंकराची वरदमूर्ती, शंकराची स्वयंभू पिंड, पाठीमागे नंदी, नंदीवर भवानीशंकराचा मुखवटा व त्यावर पंचनागाचा उभारलेला फणा आणि सतत तेवत असणारा नंदादीप दृष्टीला पडतो. मंदीराचे परिसरात श्रीनृसिंह, खंडोबा, चिंतामणी या देवतांच्या मूर्ती दृष्टीस पडतात. याव्यतिरिक्त आणखीन काही ठिकाण प्रसिद्ध आहे त्याच्याविषयी माहिती पाहूया.

काळभैरव

हे स्थान श्रीक्षेत्र काशी प्रमाणेच येथे डोंगराच्या कड्यावर आहे. भोवताली रम्य झाडी असून पावसाळ्यात उंचावरून पाणी पडते. हे स्थान दर्शनीय व रमणीय आहे.

आदिमाया व आदिशक्ति

देवळाच्या मुख्य व्दाराजवळ उजव्या हाताकडे आदिमाया व आदिशक्ति ह्या देवता आहेत.

घाटशीळ

डोंगराच्या उतरणीवर किल्लेवजा, मजबूत, सुंदर देवस्थान आहे. आत देवीच्या पादुका आहेत. घाट्शीळवर उभारून देवीने श्रीरामाला सीतेचे रूप घेऊन श्रीलंकेचा मार्ग दाखविला. तेव्हा रामाने देवीला ओळखले व तो म्हणाला ‘तू का आई? येथे असलेल्या कमानी पूर्वी रजाकारांवर देखरेख करण्यासाठी वापरत. जवळच मंदिर संस्थानने बांधलेली बाग आहे.

पापनाश तीर्थ

हे एक तीर्थ असून पापनाशिनी असे याचे प्राचीन नाव आहे. येथे स्नान केल्याने लोकांचे पापातून सुटका होते. अशी लोकांची धारणा आहे. देऊळ जुने पण मजबूत आहे.

See also  Rohit Sharma Replaces Virat Kohli as ODI Captain | विराट कोहली आता कप्तान का नाही?

रामवरदायिनी

येथे रामवरदायिनी नावाची देवी असून जेव्हा श्री रामचंद्र वनवासात गेले होते. तेव्हा सीतेला शोधण्यासाठी रामचंद्र येथे आले असताना, या देवीने त्यांना वर दिला व योग्य मार्ग दाखवला.

भारतीबूवाचा मठ

देवळाच्या मागील बाजूस म्हणजे शिवाजी दरवाजा उतरून खाली गेल्यावर हा मठ लागतो. याचे मूळ पुरूष रणछोड भारती. यांच्यासोबत श्रीदेवी सारीपाट खेळत असे. मठ जुना, मजबूत व पाहण्यासारखा आहे.

गरीबनाथाचा मठ

मठात गोरगरीबांना सदावर्त दिले जात होते. हा मठ सध्या खड्काळ गल्लीत आहे.

नारायणगिरीचा मठ

हा मठ दशनामगिरी गोसाव्याचा होता. सध्या हा येथील क्रांती चौकात आहे.मंकावती तीर्थ मंकावती कुंड हे तुळजापूरातील एक मोठे पवित्र कुंड आहे. असे म्हणतात की, या कुंडात स्नान केल्याने अंग पवित्र होते. याला विष्णू कुंड असेही म्हणतात. यावर महादेवाची पिंड आहे. तसेच मोठे मारुती मंदिर आहे.

धाकटे तुळजापूर

येथून जवळच धाकटे तुळजापूर हे गाव आहे. या ठिकाणी तुळजा मातेची बहीण वास्तव्य करते.

तुळजापूरच्या देवीस महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून अग्रमान आहे. स्वराज्य संस्थापना करणारे शिवाजीराजे भोसले यांच्या भोसले घराण्याची ही कुलदेवता होय. या देवीच्या आशीर्वादाने शिवाजीराजांना राज्यस्थापनेची प्रेरणा मिळाली, अशी समजूत भाविकांमध्ये प्रचलित आहे. आख्यायिकेनुसार देवीने महाराजांना दृष्टांत देऊन महाराष्ट्रावरील दुष्टचक्राचे निवारण करण्यासाठी भवानीतलवार दिली होती.  तुम्हीही या स्थळाला नक्की भेट द्या.

“तुम्हाला आमची माहिती Tuljapur Bhavani Temple Live Darshan अशी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

आमच्या आरोग्य मराठीमी कास्तकार या ब्लॉगला सुद्धा भेट द्या

Leave a Comment