Best Tree Essay In Marathi – झाडाची आत्मकथा निबंध 2021

मी एक झाड बोलतोय ( Tree Essay In Marathi ) मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मी झाड झालो तर या पृथ्वीवरील सर्वात मौल्यवान सजीव गोष्ट असल्याचा अभिमान मला असेल निसर्गाची पर्यावरणाची शोभा वाढविण्याचे महत्त्वाचे काम माझ्याकडे असेल. मी झाड झालो तर ( Tree Essay In Marathi ) निरनिराळे रंगीबिरंगी पक्षी माझ्याकडे आकर्षित होतील. मला लागलेली रंगी -बिरंगी फुले फळे हिरवी पाने पाहून सर्व पक्षी माझ्या आश्रयाला येतील.

Tree Essay In Marathi – झाडाची आत्मकथा निबंध

मी झाड झालो तर निसर्गातील सर्व सजीवांना थंडगार सावली देण्याचे काम मी करेल. मी जर झाड झालो तर वन्य प्राणी पक्षी जसे माकड, खारुताई, सुतार पक्षी, पोपट माझ्या फाद्यांवर येऊन बसतील. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

झाडाची आत्मकथा निबंध 2021 - Tree Essay In Marathi

सहलीला जाताना एखाद्या मोठ्या वडाच्या झाडाखाली बसून वन भोजन करणे कोणाला आवडत नाही . पण रस्ते रुंदीकरणासाठी तुम्ही अशीच झाडे तोडत राहिलात तर असे अनुभव तुम्ही कसे घेऊ शकाल. वडाच्या पारंब्याना लटकणे, चोरून आंबे पाडणे, मोठ्या झाडाच्या फांदीला झूला झूलने, या साऱ्या आठवणीनी तुमचे बालपण सजले होते. पण ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे. पुढच्या पिढीला हे अनुभव कधीच अनुभवता येणार नाहीत आणि मग तुम्ही तक्रार करता कि, आमची मुले दिवस रात्र विडिओ गेम्स खेळत बसतात.

नक्की वाचा – इंदिरा गांधी विषयी निबंध – Indira Gandhi Information In Marathi 2021

तुमच्या सारखे आम्ही सुद्धा जिवंत आहोत, आम्हाला हि भावना आहेत, आम्हाला हि वेदना होतात. तुमच्या मुलांना, प्रियजनांना थोडेसे खरचटले की तुमच्या मनाची घालमेल होते. पण झाडाच्या फांद्या तोडताना, फळांसाठी दगड मारताना, करवतीने, कुऱ्हाडीने वृक्षांना कापताना तुम्हाला काहीच कसे वाटत नाही? डोळ्यात अश्रू नाही पण मनात एक साधा विचार हि येत नाही, एवढे स्वार्थी कसे झालात तुम्ही?
झाडाझुडपांमुळे जमिनीची धूप कमी होते. झाडांची मुळे माती धरून ठेवतात, याने जमिनीचा पोत टिकून राहतो.

See also  CM Kisan Yojana मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळणार

यामुळे कमीत कमी कृत्रिम, रासायनिक खतांच्या मदतीने चांगले पीक घेता येते. जर चांगली पिके आली तर गरीब शेतकऱ्याला मोठे कर्ज काढावे लागणार नाही, त्याला आत्महत्या करावी लागणार नाही.  आदिवासी, गावातील गरीब लोक जंगलातून फळे, फुले, रानमेवा आणून विकतात. त्यांच्यावर त्यांचे पोट भरते. झाडे तोडून,वणवे लावून तुम्ही त्यांच्या पोटावर पाय ठेवत आहात.

तुम्ही जंगलात वणवे लावता, हजारो छोटे मोठे प्राणी, पक्षी मारले जातात, त्यांना स्थलांतर करावे लागते. जर तुमचे घर कोणी विनाकारण पेटवून दिले तर तुम्हाला कसे वाटेल? या सर्वामुळे नकळत तुम्ही मानवी जीवन चक्र प्रभावित करत आहेत. तुम्ही स्वतःच्या हातांनी आपला विनाश लिहत आहात.

अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही खूप झाडे तोडली आहेत, पर्यावरणाचा खूप ऱ्हास केला आहे. अजूनही तुम्ही केलेली चूक सुधारण्याची संधी आहे. आणखी एखादं दशक असेच चालू राहिले तर काहीच करता येणार नाही. आज जसे आपण बाटलीतून पाणी पितो तसे भविष्यात बाटलीतून श्वास घ्यावा लागेल. आपल्या नंतरची पिढी राजनीती आणि धर्मासाठी न लढता, पाणी आणि ऑक्सिजन साठी एकमेकांचा जीव घेईल. तुम्हाला तुमच्या पुढच्या पिढीला हाच वारसा द्यायचा आहे का?

झाडाची आत्मकथा निबंध 2021 - Tree Essay In Marathi

मी कोणामध्येही भेदभाव करत नाही. माझ्यासाठी पशू, पक्षी, मानव सारे एक सारखे आहेत. मी जात, धर्म, रंग असा भेदभाव करत नाही. मला सगळेच प्रिय आहेत. तुम्ही पण असे सगळे भेदभाव विसरून एकत्र या आणि या सुंदर पर्यावरणाला वाचावा. नाहीतर उद्या मनुष्यच नसतील तर तुम्ही जात, धर्म, रंग, राज्य, भाषा, देश यांचे काय कराल. वृक्ष सुद्धा तुमच्या सारखेच सजीव आहेत, त्यांचे संगोपन करा, काळजी घ्या.

नक्की वाचा – Mi Pantpradhan Zalo Tar Essay In Marathi 2021 जर मी पंतप्रधान झालो तर…

माझे हे मनोगत ऐका आणि प्रत्येकानी एक नाही चार चार झाडे लावा. वाढदिवसात, लग्नात इतर भेटवस्तू देण्याऐवजी झाडाचे रोपटे भेट म्हणून द्या. मोकळ्या जागेत, डोंगर उतारावर झाडे लावा. फक्त आपल्या जमिनीवरील नाही तर दुसऱ्याच्या झाडांनाही पाणी घाला. पशूंपासून त्यांची रक्षा करा. वणवा लावून देऊ नका. तुम्ही निसर्गाचा आदर करा, निसर्ग तुमचे संगोपन करेल. निसर्ग खूप बलाढ्य आहे, तो खूप सहनशील आहे. पण त्याच्या संयमाचा अंत पाहू नका, हीच विनंती. सर्वात शेवटी मी एकच मंत्र देईल, झाडे लावा झाडे जगवा.

See also  Us Todani Yantra Machine Yojana 2023| ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2023.

माझ्या फांद्यांवर विविध पक्षी घरटे तयार करतील व त्यांच्या मध्ये त्यांची पिल्ले आणि पक्षी आपल्या पिल्लांना घास भरतांना हे सुंदर दृश्य मी झाड झाले तर मला पाहायला मिळेल. हृदयाला घाव घालणारी माय लेकराची नाते मला पहायला मिळेल. मी झाड झालो तर कोकिळा माझ्या हिरव्यागार पानांच्यामध्ये लपून गोड गोड गाणे गाईल आणि कोकीळ यांनी गायलेले सुंदर गाणे ऐकून मला खूप जवळून ऐकता येईल व अनुभवता येईल. मी झाड झालो तर निसर्गातील सुक्ष्म हालचाली मला जवळून पाहता येतील.

मानवाकडून होणार या वन्य प्राण्यांच्या हत्या एकमेव साक्षीदार मी असेल. माणूस असताना जी माझी धडपड होती. ती सर्व संपून जाईल कुठे प्रवासाला जाण्याची वेळ येणार नाही. सारखे सारखे घड्याळ पहावी लागणार नाही, स्वार्थी मित्र भेटणार नाहीत, पुन्हा कडून फसवणूक होण्याची भीती नसेल, आई-बाबांचे कटकट यापासून सुटका होईल. अभ्यासाचं टेन्शन नसेल, परीक्षेचे टेन्शन नसेल मी झाड झालो तर पक्ष्यांसारखे प्रामाणिक मित्र मला भेटतील.

त्यांच्या रोजच्या भटकंतीची चर्चा मला ऐकायला मिळेल मी झाड झालो तर उन्हाळ्यातील कडक ऊन मला अनुभवता येईल. सकाळच्या कोवळ्या उन्हात आनंद घेता येईल. उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे सुंदर दृश्य मला पाहता येईल. आकाशात निर्माण होणारे सात रंगाचे इंद्रधनुष्य सर्वात प्रथम मला पाहता येईल. थंडीतील गारवा अनुभवता येईल. पावसाळ्यातील पावसामध्ये आंघोळ करता येईल. मी झाड झालो तर बाजूच्या झाड बांधवांची कत्तल पाहून मला खूप रडायला येईल.

मी झाड झालो तर ( Tree Essay In Marathi ) मला नेहमी माणसांची भीती असेल कारण माणूस माझे मित्र वन्यप्राणी पक्षी यांना माझ्यापासून दूर घेऊन जाईल. मी झाड झालो तर पर्यावरणाचे संतुलन टिकविण्याचा महत्त्वाचे काम करेल. पर्यावरणातील सजीवांना हानिकारक अशा विषारी वायूंचे शोषण करून सजीवांना चांगल्या आरोग्य प्रदान करण्याचे काम मी करेल. मी झाड झालो तर लहान मुले माझ्या फांद्यांना झोका बांधून घेऊन उंच उंच आभाळाला भिडणारे त्यांचा आनंद घेतील.

See also  Mi Pantpradhan Zalo Tar Essay In Marathi 2021 जर मी पंतप्रधान झालो तर...

झाडाची आत्मकथा निबंध 2021 - Tree Essay In Marathi

मी झाड झालो तर ( Tree Essay In Marathi ) मधमाशा माझ्या त्यांना आपले घर बनवते आणि निरनिराळे रंगीबिरंगी फुलातील मध गोळा करून साठवता येईल. मी झाड झालो तर आकाशातील वीज वार्‍यांचा मारा सहन करून स्वतःला मजबूत बनवेल. मी झाड झालो तर दूरच्या प्रवासाला निघालेले प्रवासी माझ्या शीतल छायेत क्षणभर विश्रांती घेतील आणि भोजन करतील. निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी आलेले शाळेतील मुले माझ्या छायेत खेळतील बागडती नाचतील शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, विद्यार्थीनी मिळून एकत्र भोजन करतील. मी झाड झालो तर मनात फक्त एकच भीती असेल की एक दिवस मानव इतर वन्य प्राण्यांसाठी माझी सुद्धा हत्या करणार हे नक्की आहे.

मी मानवाला सांगू इच्छितो की, सर्वांनी मिळून कमीत कमी एक झाड तरी लावावे वते जगवावे. जेणेकरून तुमचेच पर्यावरण आणि स्वास्थ्य चांगले राहील. जास्तीत जास्त झाडे जगवन्यामुळे नियमित पाऊस येईल पावसामुळे तुमची शेती चांगली होईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मिटेल. पर्यावरणामध्ये माझे महत्त्व आहे, तेवढेच इतर सर्व पशुपक्ष्यांचे देखील आहे आणि मीच नसेल तर हे पशु पक्षी आपले घरटे कुठे बांधतील.

कुठे राहतील किंवा मग तुम्हाला श्वषणासाठी लागणारा ऑक्सिजन कुठून मिळणार या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्व व्यक्तींनी किंवा मानव समाजाने झाडे जगविण्याचा प्रयत्न करावा. म्हणून सर्वांना मी एक संदेश देतो कि सर्वांनी एक झाड तरी आपल्या दारी जगवावे. वड, पिंपळ, कडुलिंब यांसारख्या वृक्षांची लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखावा.

“तुम्हाला आमचा लेख मी झाड झाले तर ( Tree Essay In Marathi ) कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment