Maharashtra Government Decision सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी 12 निर्णय

Maharashtra Government Decision सरकारने घेतले शेतकऱ्यांसाठी 12 निर्णय

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान विधानसभेत नियम 293 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शेती क्षेत्रासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ह्या वर्षी पावसामुळे शेतीचे मोठा नुस्कान झाले आहे त्यावर आता विधानसभेत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

विधानसभेत घेण्यात आलेले निर्णय Maharashtra Government Decision

1 नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान वाटप सप्टेंबर महिना सुरू केले जाईल.

2 अतिवृष्टीमुळे झालेले नुसकान भरपाई देण्यात येते मात्र आजपर्यंत सततची मागणी लक्षात घेता सततच्या मुसळधार पावसामुळे 33 टक्क्यापेक्षा जास्त नुस्कान झाली असल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.

3 गोगलगायी यलो मोझ्याक यासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊन होणारे नुकसान याबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून अशा प्रकारच्या किडी मुळे होणाऱ्या शेती पिकांचे नुकसान यामुळे देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल.

4 स्वयंचलित हवामान केंद्राची संख्या वाढवण्यात येईल यामुळे शेतकऱ्यांना आजचा हवामानाचा अंदाज मिळेल व विमा दावे वेगाने निकाली काढता येतील.

5 पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे फोन करून सूचना देण्यात येतात तसेच कृषी कार्यालय तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेले आहे त्या ठिकाणी नुकसानीची सूचना किंवा अर्ज स्वीकारले जातील हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत.

6 नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या नुसकान या संदर्भातील मदतीचे रक्कम देखील देण्यासाठी होणारा विलंब कमी करण्यासाठी यापुढे पंचनामा साठी मोबाईल ॲप्स वापर करण्यात येईल.

7 राज्यात ज्या ज्या क्षेत्रात दरड कोसळणे किंवा वारंवार पूर येणे इ आपत्ती प्रवण क्षेत्र आहे नागरिकांना सतत धोकादायक क्षेत्रातमध्ये राहावे लागते अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही अशा क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्चित करण्यात येईल

8 डिजिटल शेती अभियानामध्ये बियाणांची टेसेबीलिटी ब्लॉक चैन मोडेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी वा किमान उत्पादक समूहांचे संगणकीकरण हे कार्य हाती घेतले जातील यामुळे उच्च दर्जाचे बियाणे व खते शेतकर्‍यांना योग्य दरात मिळून त्याचे उत्पन्न वाढेल

See also  पर्यावरण विषयी निबंध - Essay On Environment In Marathi Language 2021

9 कृषी क्षेत्रामध्ये सुगंधित व औषधी वनस्पती लागवड व उत्पादन करण्यासाठी त्यांना योग्य व त्या सुविधा केंद्राचा समावेश जीवन साधण्याचे कार्य प्रभावी पद्धतीने हाती घेतली जाईल

10 जैविक शेती व नैसर्गिक शेती या संदर्भात केंद्राच्या योजना प्रभावीपणे राबविल्या जातील जेणेकरून आपली शेती विषमुक्त होईल

11केंद्रशासित योजनांची सुयोग्य अंमलबजावणी करण्यासाठी सुनियोजित पद्धतीने कार्य केले जाईल

12 शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी शेत शिवार ते बाजारपेठेपर्यंत असणारे संपूर्ण दर्जात्मक साखळीच तयार करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा शासनाच्या विविध विभागाच्या समन्वयाने तयार करण्याची कारवाई करण्यात येत आहे या बाबाचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल.

Lumpy Skin Disease Vaccination वर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Comment