महाराष्ट्रातील आतापर्यंतचे मुख्यमंत्री | Maharashtra Cheif Minister List

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री विषयी माहिती तसेच महाराष्ट्रातील आता पर्यंतचे सर्वच मुख्यमंत्री त्यांच्याविषयी नावे पाहूया.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  हे महाराष्ट्र  राज्य शासनाचे प्रमुख असतात.  विधानसभा  निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.

महाराष्ट्रातील आतापर्यंतचे मुख्यमंत्री Maharashtra Cheif Minister List

आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागे एकूण पन्नास वर्षांमध्ये 18 मुख्यमंत्रीची निवड झाली होती. यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणजेच काँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 50 वर्षे मुख्यमंत्रिपद हे काँग्रेसकडे होते. तसेच आतापर्यंत विदर्भातून चार मुख्यमंत्री निवडले गेले, तर सर्वाधिक मुख्यमंत्री म्हणजेच सहा मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातून निवडण्यात आले होते. महाराष्ट्रात दोन राष्ट्रपती राजवट देखील लागू करण्यात आली होती. महाराष्ट्र राष्ट्रपती राजवट काही काळासाठी लावण्यात आली होती.

1978 मध्ये काँग्रेस शासन निवडून आले. शरद पवार यांनी यावेळी कुलोज सरकारचे नेतृत्व केले होते. ते शासन बरखास्त करून त्या काळी विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका घेण्यात आल्या. त्यामुळे महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती राजवट शासन लागू करण्यात आले होते. तसेच 2014 ते मध्ये 32 दिवसांसाठी म्हणजेच 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसने सहकारी पक्ष कॉंग्रेसचा पाठिंबा केल्याने सरकार कोसळले व त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आले होते. राज्यात आता पर्यंत सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे वसंतराव नाईक राहिली आहेत. त्यांच्या नंतर कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी आपल्या पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेले नाही. वसंतराव नाईक यांच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण केला. राज्यात शंकराव चव्हाण अशोकराव चव्हाण हे पिता-पुत्र मुख्यमंत्री होऊन गेले आहेत.
तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री पद हे उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी स्वीकारले.

See also  शेळीपालन व्यवसायासाठी आता 25 लाखापर्यंत कर्ज Goat Loan

आतापर्यंतचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, त्यांचा कार्यकाळ आणि पक्ष

1) यशवंतराव चव्हाण : 1 मे, 1960 ते 19 नोव्हेंबर,1962 (काँग्रेस)

2) मारोतराव कन्नमवार : 20 नोव्हेंबर,1962 ते 24 नोव्हेंबर,1963 (काँग्रेस)

3) पी.के. सावंत : 24 नोव्हेंबर, 1963 ते 4 डिसेंबर, 1963 (काँग्रेस)

4) वसंतराव नाईक : 5 डिसेंबर, 1963 ते 1 मार्च, 1967 (काँग्रेस)

5) वसंतराव नाईक : 1 मार्च, 1967 ते 13 मार्च, 1972 (काँग्रेस)

6) वसंतराव नाईक : 13 मार्च, 1972 ते 20 फेब्रुवारी, 1975 (काँग्रेस)

7) शंकरराव चव्हाण : 21 फेब्रुवारी, 1975 ते 16 एप्रिल, 1977 (काँग्रेस)

8) वसंतदाद पाटील : 17 एप्रिल, 1977 ते 2 मार्च, 1978 (काँग्रेस)

9) वसंतदाद पाटील : 7 मार्च, 1978 ते 18 जुलै, 1978 (काँग्रेस)

10) शरद पवार : 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 राष्ट्रपती राजवट : 17 फेब्रुवारी, 1980 ते 8 जून, 1980

11) अब्दुल रहमान अंतुले – 9 जून, 1980, 12 जानेवारी, 1982 (काँग्रेस)

12) बाबासाहेब भोसले : 21 जानेवारी, 1982 ते 1 फेब्रुवारी, 1983 (काँग्रेस)

13) शिवाजी पाटील निलंगेकर : 3 जून, 1985 ते 6 मार्च, 1986 (काँग्रेस)

14) शंकरराव चव्हाण : 12 मार्च, 1986 ते 26 जून, 1988 (काँग्रेस)

15) शरद पवार : 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस)

16) सुधाकरराव नाईक : 25 जून, 1991 ते 22 फेब्रुवारी, 1993 (काँग्रेस)

17) शरद पवार : 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

18) मनोहर जोशी : 14 मार्च, 1995 ते 31 जानेवारी, 1999 (शिवसेना)

19) नारायण राणे : 1 फेब्रुवारी, 1999 ते 17 ऑक्टोबर, 1999 (शिवसेना)

20) विलासराव देशमुख : 18 ऑक्टोबर 1999 ते 16 जानेवारी, 2003 (काँग्रेस)

21) सुशीरकुमार शिंदे : 18 जानेवारी, 2003 ते 30 ऑक्टोबर, 2004 (काँग्रेस)

22) विलासराव देशमुख : 1 नोव्हेंबर, 2004 ते 4 डिसेंबर, 2008 (काँग्रेस)

23) अशोक चव्हाण : 8 डिसेंबर, 2008 ते 15 ऑक्टोबर, 2009 (काँग्रेस)

See also  Tuljapur Bhavani Temple Live Darshan तुळजापूर भवानी

24) अशोक चव्हाण : 7 नोव्हेंबर, 2009 ते 9 नोव्हेंबर, 2010 (काँग्रेस)

25) पृथ्वीराज चव्हाण : 11 नोव्हेंबर, 2010 ते 26 सप्टेंबर, 2014 (काँग्रेस)

26) राष्ट्रपती राजवट : 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014

27) देवेंद्र फडणवीस : 31 ऑक्टोबर, 2014 (भाजप)

28) उद्धव ठाकरे : 28 नोव्हेंबर, 2019 (शिवसेना )

शरद पवार

18 जुलै इ.स. 1978 रोजी शरद पवारांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. पवारांबरोबर काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेले 12 आमदार, काँग्रेस पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावाने बनली आणि त्याचे नेते पवार झाले. ते राज्याचे सर्वांत तरुण मुख्यमंत्री होते. 1980 साली इंदिरा गांधींचेसत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त केली. त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले. जून, 1980 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेस पक्षाने 288 पैकी 186 जागा जिंकल्या आणि बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले. शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते.

देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे 28 वे मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस म्हणजे विद्वत्ता आणि लोकप्रियतेचा मिलाप साधणारे एक दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्त्व आहे. नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्या नंतर त्यांनी व्यवसाय व्यवस्थापनात स्नातकोत्तर पदवी आणि डी. एस. ई. बर्लिन येथून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्र या विषयात पदविका मिळविली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पा -वधीतच त्यांनी मोठा जनाधार प्राप्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या जनतेचे प्रतिनिधित्त्व करत असतानाच पक्षांतर्गत विविध स्तरांवर नेतृत्व केले. नागपूर महानगरपालिकेतून ते सलग दोनदा (1992 आणि 1997) निवडून आले.

नागपूरचे महापौर पद त्यांनी भूषविलेले असून भारतातील आजवरचे दुसरे सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ख्याती आहे. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेअर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच. देवेंद्र फडणवीस हे अनुभवी लोकप्रतिनिधी असून राजकीय बुद्धिचातुर्य व कौशल्य यासाठी त्यांना विविध व्यासपिठांनी गौरविलेले आहे. त्यांच्या कार्य-कर्तृत्त्वाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेतली गेलेली असून राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तसेच जागतिक संसदीय फोरमच्या सचिवपदी ते कार्यरत आहेत.

See also  Shelipalan Yojana 2022 Information in Marathi | शेळीपालन योजना २०२४ माहिती

उद्धव बाळासाहेब ठाकरे

28 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र सरकार दर्जा राज्यशासनाचे प्रमुखचे सदस्य महाराष्ट्राचे विधिमंडळ निवासवर्षा निवास, मुंबई आसन मंत्रालय, मुंबई नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल कालावधी 5 वर्ष पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री निर्मिती 1 मे 1960 पहिले पदधारक यशवंतराव चव्हाण (1960-1962) उपाधिकारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री 2019 च्या निवडणुकां -मध्ये कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते,

त्यामुळे महाराष्ट्रात  राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापना करण्याचा दावा केला व देवेंद्र फडणवीसपुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. परंतु सभागृहातील चाचणी मतामध्ये बहुमत मिळणार नाही हे तीन दिवसांत स्पष्ट झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी 26 नोव्हेंबर, 2019 रोजी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा मध्यस्थीने शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे  यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले व उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री:

इ.स. 1947 ते 1952- बाळ गंगाधर खेर
इ.स. 1952 ते 1956 – मोरारजी देसाई इ.स. 1956 ते 1960 – यशवंतराव चव्हाण आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे मुंबई प्रांतातील मुख्यमंत्री आहेत.

“तुम्हाला आमची माहिती Maharashtra Cheif Minister List कशी वाटली, ते मला कमेंट करून नक्की सांगा.”

Leave a Comment