Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष

Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष – प्रत्येक पुजेमध्ये गणपतीला प्रथम स्थान देण्यात आलेले आहे. गणपती ही बुद्धीची व विद्येची देवता असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व आहे. अथर्वशीर्ष हे गणक ऋषी यांनी लिहिले आहे. अथर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे स्थिर शीर्ष म्हणजे मस्तक ज्यांच्या पठाण यामुळे बुद्धीला स्थिरता येते असे उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय असा त्याचा अर्थ लावला जातो.

Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष

अथर्वशीर्ष हे एक उपनिषद आहे. ते अथर्ववेदातील संबंधित आहे. यामध्ये गणेश विद्या सांगितलेल्या आहेत. श्री गणेशाचा उपासक यांमध्ये या उपनिषदाला विशेष महत्त्व आहे. हजारो भाविक हे दररोज उपनिषद म्हणत असतात. काहींचा तर नेम असतो, मात्र गणपती अथर्वशीर्ष पठण करताना काही नियम पाळावे लागतात.

ते नियम पाळून अथर्वशीर्षाचे पठण केल्यास उत्तम फलश्रुती प्राप्त होते असे सांगितले जाते. यात प्रथम गणपतीच्या सगुणब्रह्माची उपासना सांगून शेवटी गणपती म्हणजेच परब्रम्ह आहे असे म्हटले जाते. गणपती हा तीन देहांच्या पलीकडचा असला तरी, त्यांचे तांत्रिक शरीर आहे आणि तोच त्याचा महामंत्र आहे. गणपती हा विश्वाचा आधार असून तो ज्ञान आणि विज्ञान मय आहे. उत्पत्ती शिवाच्या गणांचा अधिपती असलेल्या गणपतीला यामध्ये नमस्कार केलेला आहे.

यानंतर याची फलश्रुती सांगितलेली आहे. या उपनिषदांचे एक हजार वेळा पठण केल्याने जी हवे ते प्राप्त होईल असे म्हटले जाते. अबला रुद्राचा लाडका असलेला गणपती बाप्पाचा गणेश उत्सव सुरू झाला, की गणेशाचे नामस्मरण, आराधना, जप, उपासना करण्यासाठी चतुर्थी ही तिथी शुभ मानली जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्ष आणि वैद्य पक्षाचे चतुर्थी येते. या दोन्ही पक्षातील चतुर्थीला गणपतीची उपासना केली जाते.

यातील शुद्ध पक्षातील तिथी विनायक चतुर्थी नावाने ओळखली जाते. तर वद्य पक्षातील तिथी संकष्ट चतुर्थी नावाने ओळखले जाते. गणपती उपासकांसाठी वर्षभरातील तीन तिथी सर्वाधिक महत्त्वाच्या आणि गणपती नामस्मरण उपासना आराधनेसाठी सर्वोत्तम मानले जातात. त्यापैकी एक चतुर्थी म्हणजे भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी ही आहे. यामध्ये काही नियम आहेत. गणेश चतुर्थी पासून दहा दिवसांचा गणेशोत्सव सुरू होतो व देशभरातील भक्तगण गणपतीची आपल्या घरी स्थापना करतात. तसेच पूजा केली जाते.

See also  Nanda Saukhya Bhare 'नांदा सौख्य भरे'

गणेशाच्या आराधना, उपासनेसाठी कोणतीही तिथी असो त्या दिवशी गणपतीचे विविध श्लोक, स्तोत्र, आरत्या म्हटल्या जातात. त्यापैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते ते अथर्वशीर्ष अनेक गणेशभक्त दररोज प्रत्येक चतुर्थीला, संकष्टी चतुर्थीला, गणेश चतुर्थीला, गणेश जयंतीला अशा अनेकविध वेळेला ते पठाण करत असतात. गणपतीला अभिषेक करताना याचे उच्चारण केले जाते.

मराठी अथर्वशीर्ष

मराठी अथर्वशीर्ष व पुढील प्रमाणे आहेत.

ॐ नमस्ते गणपते, तूचि प्रत्यक्ष तत्त्व सत्। तूचि केवल कर्ता बा, तूचि धर्ताहि केवल। तूचि केवल संहर्ता, तूचि ब्रह्महि सर्वहे। तू साक्षात् नित्य तो आत्मा||1||

ऋत मी सत्य मी वदे ||2||

करी रक्षण तू माझे, वक्त्या-श्रोत्यांस रक्ष तू। दात्या-घेत्यांस तू रक्ष, गुरु – शिष्यांस रक्ष तू | मागुनी पुढुनी डाव्या, उजव्या बाजूने पण वरुनी खालुनी माझे, सर्वथा कर रक्षण ||3||

जसा वाङ्मय आहेस, तू चिन्मयहि बा तसा | जसा आनन्दमय तू, तू ब्रह्ममयही तसा | देवा तू सच्चिदानन्द, अद्वितीयहि तू तसा | प्रत्यक्ष ब्रह्म तू, ज्ञान-विज्ञान-मयही तसा ||4||

सर्व हे जग उत्पन्न, तुझ्यापासुनि होतसे | त्याची स्थिती तुझ्यायोगे, विलयेल तुझ्यात ते | भासते ते तुझ्या ठायी, तू भूमि जल अग्नि तू | तूचि वायु नि आकाश, वाणी स्थाने ही चार तू ||5||

तू जसा त्रिगुणां-पार, त्रिदेहांच्याहि पार तू | तू अवस्था-त्रयां-पार, त्रिकालांच्याहि पार तू | तू मूलधार चक्रात, देहाच्या नित्य राहसी | इच्छा-ज्ञान-क्रिया रूपी, शक्ती त्या तूचि तीनही। ध्याती नित्य तुला योगी, तू ब्रह्मा तूचि विष्णुही | तू रुद्र, इंद्र, तू अग्नी, तू वायू, सूर्य ,चन्द्रही तू ब्रह्म, तूचि भू, तूची अन्तरिक्ष, नि स्वर्गही| तूचि ॐ कार हे बीज, वर्णिती ज्यास वेदही ||6||

आधी ‘ग’ कार उच्चार, ‘अ’ कार तदनन्तर| त्यानंतर अनुस्वार, अर्धचन्द्रे सुशोभित| ॐ कार-युक्त हे बीज, मन्त्ररूपचि हे तव | ‘ग’ कार रूप हे पूर्व, असे मध्यम रूप ‘अ’| अन्त्य रूप अनुस्वार, बिन्दू उत्तर रूपसा| नाद सांधतसे यांना, सन्धीचे नाम संहिता| गणेश विद्या ती हीच, आहे गणक हा ऋषी | छन्द हा निचृद्-गायत्री, देवता श्रीगणेश ही | ॐ गं रूपी गणेशाला, नमस्कार सदा असो ||7||

See also  Rohit Sharma Replaces Virat Kohli as ODI Captain | विराट कोहली आता कप्तान का नाही?

एकदन्तास त्या आम्ही, देवाधीशास जाणतो | आणि त्या वक्रतुण्डाते, आम्ही ध्याने उपासतो | त्यासाठी सर्वदा आम्हा, तो दन्ती प्रेरणा करो ||8||

एकदन्ता चतुर्हस्ता, पाश – अंकुश धारका |द्न्त नी वरदा मुद्रा, धारका मूषक – ध्वजा। लम्बोदरा रक्तवर्णा , शूर्प-कर्णा गजानना | रक्त – वस्त्रा विघ्न-हर्त्या, गिरिजानन्दन-वर्धना। रक्त-चन्दन-लिप्तांगा, रक्त-पुष्पा-सुपूजिता | भक्तावरी दया कर्त्या ,अच्युता जग-कारणा | सृष्टिपूर्वी प्रकटल्या, प्रकृती पुरूषा परा | या ध्यातो नित्य तो योगी, योग्यांमध्ये वरिष्ठसा ||9||

वन्दन व्रातपतिला, गणाधेशास वन्दन | वन्दन प्रमथेशाला, एकदन्तास वन्दन | लम्बोदरा शिवसुता, विघ्नहर्त्यास वन्दन | वांछिला वर देणाऱ्या अय, तव मूर्तिस वन्दन ||10||

त्यापासून मिळणारे फळ अथर्वशीर्षाचे जो अध्ययन करतो, तो ब्रम्हरूप होतो. त्याला कोणत्याच विघ्नांची बाधा होत नाही. तो सर्व बाजूंनी सुखांत वाढतो. हिंसा अभक्ष- भक्षण, परदा, रागमन, शौर्य व पाप संसर्ग या पाचही महा पापापासून मुक्त होतो. संध्याकाळी पठाण करणारा दिवसा लहानपणी केलेल्या पापांचा नाश होतो. सकाळी पठण करणारा रात्री नकळत केलेल्या पापांचा नाश करतो.

संध्याकाळी व सकाळी पठण करणारा पाप रहित राहतो. सर्व ठिकाणी अध्ययन करणारा विघ्न मुक्त राहतो. धर्म अर्थ काम व मोक्ष मिळवितो हे अथर्वशीर्ष शिष्य भाव नसलेल्या माणसाला सांगू नये. जर कोणी अशा अनधिकार्यी स मोहानी देईल. तर तो मोठाच पापी होतो. या अथर्वशीर्षाच्या सहस्त्र आवरता नानांनी जी जी कामना मनुष्य करील ती ती या योगें सिद्ध होईल. ||11||

या अथर्वशीर्षाचे जो गणपतीला अभिषेक करतो. तो उत्तम वक्ता होतो. चतुर्थीच्या दिवशी कांहीं न खातां जो याचा जप करतो, तो विद्यासंपन्न होतो. असें अथर्वण ऋषीचे वाक्य आहे. याचा जप करणाऱ्याला ब्रह्म व आद्य म्हणजेच मायाचा विलास पडेल जो कधीच भीत नाही ||12||

जो साळीच्या लाह्या आणि हवन करतो. तो यशस्वी सर्वंकष बुद्धिमान् होतो. जो सहस्त्र मोदकांनी हवन करतो, त्याला इष्ट फळ प्राप्त होते. जोग ऋणमुक्त समाधी यांनी हवन करतो, त्याला सर्व मिळते अगदी सर्व काही प्राप्त होते. ||13||

See also  राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार पंचात्तर हजार रुपये State Government Decision

आठ ब्राम्हणांना योग्यप्रकारे याचा उपदेश केल्यास करणारा सूर्यासारखा तेजस्वी होतो. सूर्यग्रहणात महानदीच्या काठी किंवा गणपती प्रतीमेजवळ जप केल्यास हा मंत्र सिद्ध होतो. असा मंत्र सिद्ध करणारा महा विघ्नापासून मुक्त होतो. महादशापासून मुक्त होतो. महा पापांपासून मुक्त होतो. तो सर्वज्ञ होतो. तो सर्वसंपन्न होतो. जो हें असें जाणतो असे हे उपनिषद आहे.

Ganpati Atharvshirsh वयाने मानवाची बुद्धी मन स्थिर राहते व अथर्वशीर्ष पठनाणें साध्य होते. असे गणेश उपासकांची मत आहे. अथर्वशीर्षाचा पाठ एकदा अकरा वेळा, एकवीस वेळा व सहस्त्र वेळा केला जातो. तुम्ही कधी अथर्वशीर्षाचा पाठ म्हटला आहे का? एकदा तरी अनुभव घेण्यास हरकत नाही. अथर्वशीर्ष यामध्ये गणेश म्हणजेच विश्वातील निसर्ग, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश पंचम हा शक्तीचा हे असे म्हटले जाते. मग आपण या निसर्गाला जपले पाहिजे असे म्हणता येईल.

जगामधील सर्व गोष्टी पंचमहा -भूतांपासून निर्माण होतात आणि त्यांच्यातच विलीन होतात. हे आपल्याला माहित आहे. विश्वामध्ये चैतन्याच्या जेवढ्या खुणा आपल्याला दिसतात. त्या सर्वांमध्ये गणेश आहेत. संत तुकारामांच्या अभंगात आणि संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या मध्ये असे सांगितले आहे.

म्हणून सर्व पापांपासून मुक्तता मिळण्यासाठी गणपती अथर्वशीर्ष पठण करा व पापमुक्त व्हा. एकदा नक्की तुम्ही वाचून पहा तुम्हाचे मन आनंदी होईल व तुमच्या मनातील वाईट विचार असतील ते सुद्धा निघून जातील. गणपती बाप्पा मोरया असे का म्हणतात? माहिती आहे का जाणून घ्या

“तुम्हाला आमची माहिती Ganpati Atharvshirsh गणपती अथर्वशीर्ष कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.”

आमच्या अद्भुत मराठी या ब्लॉगला भेट द्या

 

Leave a Reply

Your email address will not be published.

x