399 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस ची ग्रुप ऍक्सीडेन्ट गार्ड पॉलिसी

अपघातामुळे होणाऱ्या शारीरिक तसेच अनेक अडचणी साठी ह्या सर्वांकश हमखास संरक्षणाच्या साह्याने तयार राहा. दुर्दैवी प्रसंगापासून संरक्षण मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिस अंतर्गत 399 रुपयांमध्ये ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी काढण्यात येत आहे.

भारतीय डाक विभाग पोस्ट ऑफिस अंतर्गत 399 मध्ये दहा लाख रुपयांचा अपघाती विमा काढण्यात येत आहे. या विम्याची वयोमर्यादा 18 ते 65 वर्षे असून मात्र 399 रूपामध्ये वार्षिक हप्ता याप्रमाणे आपला विमा काढण्यात येत आहे.

ग्रुप एक्सीडेंट गार्ड पॉलिसी

1 जर अपघाती मृत्यू आत असेल तर डाक विभागाअंतर्गत विम्याची रक्कम 10 लाख रुपये देण्यात येतील.

2 कायमचे अपंगत्व दहा लाख रुपये- एखाद्या व्यक्तीला जर कायमचे अपंगत्व येत असेल तर त्या व्यक्तीला 10 लाख रुपये मिळतील.

3 दवाखाना खर्च 60000 रुपये वाढत्या आजारांचे प्रमाण बघता आपल्याला जर दवाखाना खर्च होत असेल तर पोस्ट ऑफिस गार्ड पॉलिसी अंतर्गत 60 हजार रुपये पर्यंत आपला दवाखाना खर्च केला जाईल.

4 तसेच मुलांच्या शिक्षणासाठी खर्च एक लाख रुपये प्रतिवर्षी पर्यंत परंतु हा लाभ जास्तीत जास्त दोन मुलांना घेता येईल.

5 आपण दवाखान्यामध्ये असताना डॉक्टर फी आणि राहण्याचा खर्च हा सुद्धा या पॉलिसीमध्ये आहे आपण ऍडमिट असे पर्यंत दररोज 1000 रुपये याप्रमाणे दहा दिवस आपला खर्च करण्यात येईल.

6 दवाखान्या मध्ये ओपीडी खर्च रक्कम तीस हजारापर्यंत असेल.

7 आपला जरा अपघात झाला असेल आणि त्यामध्ये जर पॅरेलेसेस झाला असेल तर आपल्याला दहा लाख रुपयांचा विमा देण्यात येईल.

8 आपण जर ऍडमिट असाल तर कुटुंबाला दवाखान्यापर्यंत येण्यासाठी प्रवास खर्च 25 हजार रुपयांपर्यंत असेल सर्व प्रकारच्या अपघात सर्पदंश विजेचा शॉक फरशीवरून घसरून खाली पडणे गाडीवरील accident या सर्व प्रकारच्या अपघातांना या विमा अंतर्गत संरक्षण देण्यात आलेला आहे अधिक माहितीसाठी आजच आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क करा.

See also  Nanda Saukhya Bhare 'नांदा सौख्य भरे'

Leave a Comment