Best Wishes in Marathi मराठी शुभेच्छा

Best Wishes in Marathi मराठी शुभेच्छा

Best Wishes in Marathi हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार तुमचा,
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

कितीही रुसलीस कितीही रागावलीस
तरी
माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही….
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

 

सुख दुखात मजबूत राहो एकामेंकांची साथ, आपुलकी, प्रेम वाढत राहो.
क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,
लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…….

अनमोल जीवनात, साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत हात तुझा हवा आहे, आली गेली कितीही संकटे तरीही,
न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे. माझ्या प्रिय बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

 

देव करो असाच येत राहो
तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य जसा प्रत्येक दिवस असो सण खास
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…….

प्रत्येक क्षणा क्षणाला,
तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो,
शुभ लग्नाचा हा वाढदिवस,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

तुम्ही दोघांनी एकमेकांना
चांगल्या प्रकारे सहन केल्या बद्दल
आपल्या मित्र मंडळाकडून
तुमचे हार्दिक अभिनंदन
येणारे वर्ष असेच समजुतीने भांडून
आणि प्रेमाने हसत रडत जावो
हीच ईश्वर चरणी प्राथर्ना
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

साथीदार जेव्हा सोबत असतो,
तेव्हा प्रवास छानच होतो.
तुमच्या प्रवासाच्या सुरूवातीचा
साक्षीदार असलेला
हा दिवस असाच अविस्मरणीय राहो.
आनंदाचा हा क्षण वारंवार
तुम्हाला जगता येवो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा….

आयुष्यात भलेही असोत दुःख,
तरीही त्यात तू आहेस कडक उन्हातली सावली,
माझ्या या बेरंग जीवनात रंग भरणारी
मला नेहमी प्रेरणा देणारी
अशीच राहो आपली साथ, हीच माझी आहे इच्छा खास……

कधी भांडता कधी रुसता
पण नेहमी एकमेकांचा आदर करता
असेच भांडत राहा असेच रुसत रहा
पण नेहमी असेच सोबत राहा..
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

प्रेमाचे तसेच नाते,
हे तुम्हा उभयतांचे,
समंजसपणा हे गुपित तुमच्या सुखी संसाराचे,
संसाराची हि वाटचाल सुख-दुःखात मजबूत राहिली,
एकमेकांची आपसातील आपुलकी माया-ममता नेहमीच वाढत राहिली,
अशीच क्षणा-क्षणाला तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आनंदाचा जावो……

Best Wishes in Marathi

नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा……

 

पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी सहवासातील
गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो…..

 

लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात.
हा शुभदिन आपणा उभयतांच्या,
आयुष्यात वर्षानुवर्षे यावे
हीच आमुची शुभेच्छा…..

 

आनंदाची भरती वरती, कधी आहोटी
खारे वारे, सुख दुःख हि येति जाती
संसाराचे डावच न्यारे
रुसणे फुगणे प्रेमापोटी नित्याचे हे असते सारे, उमजुनि ह्यातील खाचाखळगे
नांदा सौख्यभरे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…….

See also  Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Anudan Yojana | भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान

 

राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच
वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच
येतात, जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची
स्वतःहून जास्त काळजी असते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

 

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा आणि
मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा
लग्नाचा वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……..

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,
प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,
जीवनाचं सार आहात तुम्ही,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…….

विश्वासाचं नातं हे कधीही तुटू नये.
प्रेमाचा धाग हा सुटू नये.
वर्षोनुवर्ष नातं कायम राहो
लग्नाचा वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…….

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली.
लग्नाचा वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…….

 

लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे. पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.

लग्नाचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

नाती जन्मोजन्मीची
परमेश्वराने जोडलेली,
दोन जीवांची प्रेम भरल्या
रेशीम गाठीत अलगद बांधलेली……

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो. माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

मराठी शुभेच्छा

समुद्रापेक्षाही अथांग आहे, तुम्हा दोघांचं प्रेम. एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास, हॅपी अनिव्हर्सरी आईबाबा…….

 

ना कधी हास्य गायब होवो तुमच्या चेहऱ्यावरून, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो, कधीही रागवू नका एकमेकांवर लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……

तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात, देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव, दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत, दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव……

सप्तपदीमध्ये बांधलेलं आहे प्रेमाचं बंधन, जन्मभर असचं प्रेमाने बांधलेलं राहो तुमचं नंदनवन, कोणाची न लागो त्याला नजर, आम्ही सोबत असूच साजरं करायला हजर…..

ना कोणता क्षण सकाळ ना कोणता क्षण संध्याकाळ आहे. माझा प्रत्येक क्षण तुझ्या नावे आहे ह्याला फक्त शायरी समजू नकोस माझ्याकडून तुला हा प्रेमाचा पेैगाम आहे. उदास नको होऊस मी तुझ्यासोबत आहे. नजरेपासून दूर पण हृदयाजवळ आहे. डोळे मिटून माझी मनापासून आठवण काढ तू माझ्यासाठी नेहमीच एक खास आहे……

 

माझ्याशी लग्न केल्याबद्दल धन्यवाद आणि मला एक संधी दिल्याबद्दल, मला हवं तसं जगू देण्याची आणि मला खात्री आहे की, भविष्यातही हे असंच असेल चल तर मग साजरा करूया आपल्या लग्नाचा वाढदिवस….

मला आजही लक्षात आहे, ज्या दिवशी आपण पहिल्यांदा भेटलो होतो. लग्नदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

तुमच्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थना करते की, तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम, आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्मी मिळो….

 

तो खास दिवस आज पुन्हा आला आहे. ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत. तू माझ्यासाठी खूपच खास आहेस. लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..

See also  Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021

 

तुझ्या नावाने अनेकांनी तुला हाक मारली असेल, पण तुझ्या नावासाठी जगणारा एकच आहे, हॅपी अॅनिव्हर्सरी…….

प्रेम म्हणजे फक्त कॅडललाइट आणि गुलाब नाहीत. प्रेम म्हणजे रोजचं जगणं एकमेकांशी बोलणं एकमेकांना वेळ देणंनखुल्या मनाने एकमेकांना स्वीकारणं प्रेम म्हणजे आयुष्यातील खास गोष्टी एकमेकांना सांगणं हेच प्रेम. लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

 

आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे. आपल्या दोघांची साथ कायम राहो. आयुष्यातील संकटाशी लढताना आपली साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या,
खूप खूप शुभेच्छा…..

दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे, हे नातं असंच राहावं ही इच्छा आहे.
हॅपी अॅनिव्हर्सरी…..

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

 

विश्वासाचे नाते कधीही कमकुवत होऊ देऊ नका, प्रेमाचे बंधन कधीही तुटू देऊ नका. तुमची जोडी वर्षानुवर्षे अशीच कायम राहो,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

 

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो,
तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे,
तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे,
हीच इस्वरचरणी प्रार्थना करते.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित आयुष्य जावं तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो.लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

तु आहे म्हणून तर,
सगळं काही माझं आज आहे..
हे जग जरी नसलं तरी,
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.
प्रिये तुला आपल्या
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

 

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,
तू जे मागशील ते तुला मिळो,
प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवो…..
लग्न वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

 

जीवनाची बाग सदैव राहो हिरवीगार,
जीवनात आनंदाला येऊ दे उधाण,
तुमची जोडी सदैव राहो,
पुढची शंभर वर्षे हीच सदिच्छा
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

 

जन्मोजन्मी राहावं तुमचं नातं असंच अतूट
आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग अनंत
हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना.
लग्न वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा….

तुमच्या दोघांची जोडी कधी ना तुटो,
ईश्वर करो तुमच्यावर कोणी ना रुसो,
असंच एकत्रित जावं आयुष्य तुमचे,
तुम्हा दोघांकडून आनंदाचा एकही क्षण ना सुटो. लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

 

चांगल्या लोकांचे चांगले क्षण,
चांगल्या लोकांचा चांगला सहवास,
तुम्हा दोघांना लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…..

ना कधी हास्य गायब होवो,
तुमच्या चेहऱ्यावरून
तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो,
कधीही रागावू नका एकमेंकावर,
लग्नाच्या वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा……

तु आहेस म्हणून तर,
सगळे काही माझे आहे.
तूच माझ्या प्रेमाचा गंध आहे.
प्रिये तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……

 

तुम्ही एकमेकांच्या जीवनाला किती सुंदर सजवलेले आहे.
लग्नाचा वाढदिवस खूप धूम धामात सेलिब्रेट करा.
कारण तुमचे हे नात खूप सुंदर प्रेमळ आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..

 

तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला मी देवाकडे प्रार्थना करते की,
तुम्हा दोघांना जगातील सर्व सुख, आनंद आणि सहवास जन्मोजन्मी मिळो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

See also  Lampi Skin desease लंम्पी स्किन डिसीज गुरांवर आले मोठे संकट

तु माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस.
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण तू आहेस.
काय सांगू कोण आहेस तू
फक्त देह हा माझा आहे.
त्यातील जीव आहेस तु
प्रिये लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…..

 

नजर ना लागो आपल्या प्रेमाला कोणाची आणि आपण असेच सोबत राहू हे दुवा आहे. परमेश्वराची…..

सुख दुखात एकमेकांची साथ असू द्या,
एकमेकांच्या मायेची,
प्रेमाची ओढ लागू द्या,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

 

प्रिये तू कितीही रुसलीस कितीही रागावलीस तरी, माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही. लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

आपण दोघे आमच्यासाठी खास आहात,
जे आमच्या आनंदात रंग भरतात,
तुम्ही नेहमी आनंदात राहो,
हीच परमेश्वराला प्रार्थना.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

 

आपल्या जीवनाच्या प्रवासात नेहमीच माझ्यासोबत रहा,
तुझ्या प्रत्येक क्षणात आनंदाचे रंग बहरत जावो, तुझ्या आनंदातच माझा आनंद.
लग्न वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……..

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,
तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,
प्रार्थना आहे देवापाशी की, तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

 

तुम्ही एकमेकांच्या अडचणीत धैर्य शोधा,
हसून खेळून आयुष्य जगा,
आम्हांला वाटते की, आपण नेहमीच आनंदीत रहावे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा …..

 

देवाकडे तुझ्यासाठी आनंद मागतो,
तुझ्या चेहऱ्यावर नेहमी आनंद राहो,
तुझ्यापेक्षा कोणतीही मौल्यवान भेट नाही,
तूच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान आहेस.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…..

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,
तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,
प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

 

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो, तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,
तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,
हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना….

 

सूर्याच्या तेजाप्रमाणे तुमचा संसार उजळत राहो,
बहरलेल्या फुलासारखा सुगंध बहरत राहो,
देवाची कृपा नेहमी तुमच्यावर राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….

 

तुमच्या जीवनातील आनंद फुलत जावो,
तुमचे जीवन नेहमी सुख आनंदाने भरलेले राहो,
तुमचे जीवन हजारो वर्षे बहरत जावो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…..

 

जन्मो जन्मो तुमचे नाते असेच राहो,
तुमच्या जीवनात आनंदाचे रंग भरत जावो.
तुमची जोडी नेहमी आनंदात राहो हीच मनापासून सदिच्छा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

 

तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होवो,
तुमचे जीवन फुलाच्या सुगंधासारखे दरवळत राहो,
तुमच्या जीवनात आनंद बहरत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा…..

 

उगवता सूर्य, बहरलेले फुल,
उधळलेले रंग,
तुमच्या जीवनात आनंद उगवत,
बहरत आणि उधळत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

आपले नाते कधीही तुटू नये,
आनंद आपल्या घराच्या अंगणात खेळो,
असाच एकमेंकांचा विश्वास वाढत राहो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या,
हार्दिक शुभेच्छा……

“लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हाला कश्या वाटलं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

Categories Job

Leave a Comment