Aundha Nagnath, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे गाव बालाघाट पर्वतरांगेत कुशीत वसलेले आहे. मराठवाड्यातील तीन ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे एक आहे. पांडवातील धर्मराजाने हे मंदिर बांधले अशी माहिती माहिती मिळते. महाराष्ट्रातील संत नामदेव व त्यांचे गुरु विसोबा खेचर यांची प्रथम भेट या मंदिरात झाली. अशी माहिती मिळते. यानंतर मात्र अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असून 25 फूट उंचीची तटबंदी आणि चार दिशांना चार दरवाजे आहेत.
Aundha Nagnath औंढा नागनाथ
मंदिराचे खालचा भाग काळात पाषाणात व वरचा भाग रंगातील असल्याने मंदिर शोभून दिसते. याचे प्राचीन नाव आमर्दक आहे. ही एक शिवाची उपाधी असून, या नावाचा एक शैवपंथही अस्तित्वात होता. यातूनच या स्थलनामाची उत्पत्ती झाली. ‘आमर्दक सन्तान’ या नावाने ओळखल्या जाणार्या शैव अनुयायांचे हे मुख्य पीठ असून, त्याचा प्रसार सातव्या ते अकराव्या शतकात गुजराथ, राजस्थान आणि मध्य प्रदेश या भागांतही झाला होता.
भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणार्या नागनाथ मंदिरासाठी औंढा हे गाव प्रसिद्ध आहे. या गावात एकेकाळी आमर्दक सरोवर होते. हे मंदिर एका विस्तीर्ण आवारात असून त्याभोवती एक मोठा परकोट आहे. परकोटाला चार प्रवेशद्वारे असून त्यातील उत्तरेकडील प्रवेशद्वारावर नगारखाना आहे. तेच मुख्य प्रवेशद्वार आहे. या आवारातच एक पायविहीर असून तिचा नागतीर्थ असा उल्लेख केला जातो. सासू-सुनेची बारव असेही तिला म्हणतात.
मुख्य मंदिराची लांबी 126 फूट, रुंदी 118 फूट आणि उंची 96 फूट आहे. मंदिराच्या पश्चिमेस नामदेव महाराजांचे मंदिर व सभामंडप आहे. औंढा हे संत नामदेवाचे गुरु विसोबा खेचर यांचेही गाव आहे. त्यांची समाधी या परिसरातच आहे.
या मंदिराच्या शिल्पकलेची वेरूळ व अजिंठा येथील शिल्पकलेची तुलना करून काही इतिहासकारांनी या मंदिराच्या उत्पत्तीचा संबंध वाकाटक आणि राष्ट्रकुट घराण्याशी व त्या कालखंडाशी जोडला. परंतु, चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास या मंदिराचे पूर्ण शिल्पकाम हे हेमाडपंती असल्याचे जाणवते. हेमाडपंती कालखंड सर्वसाधारण 11 ते 12 वे शतक असा मानला जातो.
यामुळे या कालखंडातच या मंदिराचे निर्माण कार्य झाले असावे. तसा पुरावा 1294 मध्ये येथे कनकेश्वरी देवी जवळ सापडलेल्या शिलालेखातून मिळतो. ह्यात यादव राजा रामदेवराय यांनी या मंदिरास उल्लेख केल्याचा सापडतो म्हणून या मंदिराचा कालखंड 11 ते 12 वे शतक मानला जातो.
मंदिराची रचना
औंढा नागेश्वर मंदिर हे शिल्पकलेने नटलेले आहे. हे मंदिर द्वादंश कोणी उतरत्या कंगोर्यांनी चौथर्यावर हेमांडपंती पद्धतीनुसार बांधलेले आहे. मंदिराच्या भोवती 20 फूट उंचीचा तट असून त्याला 4 प्रवेशद्वारे आहेत. या मंदिराच्या आवारासह लांबी 289 बाय 190 फूट एवढी आहे. मुख्य मंदिर मात्र 126 बाय 118 फूट इतके आहे. मंदिराच्या आतील भागात वर्तुळाकार मंडप 8 खांबांनी तोलून धरला आहे.
त्याचे छत घुमटाकार असून अष्टकोनी कलाकुसरीचे आहे. अशा येथील मंदिराच्या गर्भगृहात सुंदर शिवलिंग भूमिगत पद्धतीने ठेवण्यात आलेले आहे. परधर्मीयांच्या हल्ल्यापासून मंदिरातील मूर्तीला इजा पोहचू नये किंवा संभाव्य आक्रमणांपासून मूर्ती सुरक्षित राहावी म्हणून ही खबरदारी घेतली आहे.
मंदिरात अर्धमंडप अंतराळ गर्भगृह हे महत्त्वाचे घटक आहेत. मंडपाची लांबी रुंदी 40 बाय 40 फूट अंतराळ व गर्भगृहाची व्याप्ती 25 बाय 5.66 फूट इतकी आहे. या मंदिरात 8 नक्षीदार स्तंभ आहेत. यावर यक्षयक्षीण आदी शिल्पे कोरल्याने ह्याचे सौंदर्य वृद्धिंगत झाले आहे. या शिल्पात काही महत्त्वपूर्ण
Aundha Nagnath शिल्पांची माहिती
शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेले असून रावण पर्वत हालविण्याचा प्रयत्न करीत आहे. भगवान विष्णूचे दशावतार मानले जाते. अर्धनारीनटेश्वराचे शिल्प त्यात शंकराचा अर्धाभाग व पार्वतीचा अर्धाभाग आहे. नटराज तांडव नृत्य करताना. एका शिल्पात एका व्यक्तीस तीन तोंडे व चार पाय यातील कोणतीही एक बाजू झाकली तर एका व्यक्तीची पूर्ण कृती बनते.
याशिवाय मंदिरावर तिन्ही बाजूने अंदाजे 5.5 फूट लांब व 8 फूट रुंदीची एक आकर्षक ध्यानस्त योग्याची मूर्ती भव्य स्वरूपात दर्शनी पडते. तत्कालीन कलाकारांनी गाभार्यातील दूषित हवा बाहेर काढण्यासाठी सोय केलेली आहे. बांधकामात जेथे जोड आहेत. त्याठिकाणी लोखंड व शिसे या धातूच्या मिश्रणाचा उपयोग करून बांधकाम मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
या मंदिरात महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. ही यात्रा पाच दिवस चालते. महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे साक्षात भगवान शंकराच्या विवाहाचा दिवस मानला जातो. यात्रेच्या पाचव्या दिवशी रथोत्सव साजरा केला जातो. मंदिराच्या परिसरात लाकडी रथामध्ये श्रीच्या मूर्तीची मिरवणूक काढली जाते. हा लाकडी रथ भाविक मोठ्या श्रद्धेने ओढतात.
रथोत्सवाला लाखो भाविक उपस्थित असतात. रथोत्सवाने यात्रेची सांगता होते. दिवसेंदिवस येथील यात्रेचे स्वरूप बदलत असून आता पुरेशा जागे अभावी यात्रेत चित्रपटगृहे, विविध दुकाने, आकाश पाळणे, सर्कस कमी प्रमाणात येत असल्याचे जाणवते. यात्रेत असलेला पूर्वीचा उत्साह कमी होत असला तरी दर्शनार्थी भाविकांच्या संख्येत मात्र फार मोठा प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसत आहे.
Aundha Nagnath बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असून मंदिर शिल्पकौशल्याने नटलेले आहे. मंदिर द्वादशकोनी उतरत्या कंगोऱ्याच्या चौथऱ्यावर हेमाडपंती पद्धतीनुसार बंधलेले असून मंदिराची उंची 18 मी. आहे. सभोवताली 6 मी. उंचीचा तट असून त्याला चार प्रवेशद्वारे आहेत. देवळाच्या आतील व बाहेरील शिल्पपट्टीवर शिव, पार्वती, गणेश, बुद्ध, यती इत्यादींच्या सुंदर मूर्ती कोरलेल्या आहेत. मधला वर्तुळाकार मंडप व त्यावरील घुमट आठ अष्टकोनी, कलाकुसरीच्या खांबांवर आधारलेला आहे.
गावाच्या दक्षिणेकडील मंदिरातील कनकेश्वरी ही नागनाथपत्नी मानली जाते. पूर्वी औंढ्याला आमर्दकक्षेत्र म्हणत असल्याचा उल्लेख राष्ट्रकुटांच्या ताम्रपटात आढळतो. नागनाथाच्या मूर्तीची पाठ दरवाजाकडे आहे. संत नामदेवांना नागनाथाचे दर्शन घेण्याची मनाई केली. त्यांनी मग देवळामागे भजन सुरू केले, म्हणून नागनाथांनी पाठ फिरविली अशी दंतकथा आहे. येथे संत नामदेव व त्यांचे गुरू विसोबा खेचर यांच्या समाध्या आहेत.
Aundha Nagnath हेंच नागेश ज्योतिर्लिंग आहे. असे दक्षिणेतील लोकांचे म्हणणे आहे. याविषयी एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळात एकदा दारुका नावाची राक्षसीण होती. तिने पर्वतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तप केले. पार्वती तिच्या तपाला प्रसन्न झाली व तिला एक वन दिले. ते वन फार चमत्कारिक होते. दारूका जिथे जाईल तिथे वन तिच्या मागे जात असे. या वनात ती तिचा पती दारूक सोबत राहत होती.
दारूक आणि दारूका यांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. हे दोघे सर्व लोकांच्या अमानुष छळ करत असत व अनेक ब्राह्मणांना यांनी ठार केले होते. तर काही ब्राह्मणांना बंदी केले. बंदी केलेल्या ब्राह्मणांमध्ये एका महान शिवभक्त होता. कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला. जेव्हा ही गोष्ट दारूकाला समजले तेव्हा त्याने शिवभक्त ब्राम्हणाला ठार मारण्याची धमकी दिली आणि ती तिथुन निघून गेला. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्तांनी पुन्हा शंकराची उपासना सुरू केली.
दारूकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडून टाकली. तो ब्राम्हणांना ठार मारू लागला, त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. त्याचक्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारूक आणि दारूका राक्षसांचा वध केला. त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की, “मी येथेच नागेश ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमचे वास्तव्य करेल.” ते हेच ठिकाण आहे. नागनाथ ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर या मंदिराच्या भोवती जे आहे त्याला दारुकावन असे म्हणतात.
Aundha Nagnath Temple च्या आवारात बारा ज्योतिर्लिंगाचे छोटी छोटी मंदिरे असून 108 महादेवाची मंदिरे आणि आणखीन 68 महादेवाच्या पिंडी आहे. त्याशिवाय वेदव्यास लिंग भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय मुरलीमनोहर, दशावतार यांचीदेखील मंदिरे आहेत. भगवान शंकर आणि विष्णू या ठिकाणी एकत्र आल्याने या स्थानास व येथील महादेवाचे हरीहरात्मक लिंग मानण्यात आले आहे. भाविक दर्शनासाठी येत असतात. तसेच तुम्ही या शब्दाला नक्की भेट द्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे असणारे मंदिर पहा.
“तुम्हाला आमचा Aundha Nagnath लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”