Tractor subsidy | शेतकऱ्यांना नवीन ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा शासनाकडून 50 टक्के अनुदान

Tractor Subsidy शेतकऱ्यांनो  नवीन ट्रॅक्टर खरेदीवर मिळवा शासनाकडून 50 टक्के अनुदान

शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर जर नवीन ट्रॅक्टर घ्यायचा विचारात असेल तर नक्कीच घ्या सरकारकडून यासाठी ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान मिळणार आहे.

शेती सुलभ करण्याकरता त्यात्रिकीकरणाला प्रोत्साहन दिले जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि साधन संपत्तीचे मोठे बचत होते. काही काळापासून शेतामध्ये ट्रॅक्टरचा वापरही वाढत आहे. आता शेतात नांगरणी करण्यापासून काढणी नंतरच्या व्यवस्थांना पर्यंत शेतीची अवजाराही ट्रॅक्टरला जोडून वापरले जात आहेत.ट्रॅक्टरचे उपयुक्त वाढत असली तरी त्याची किंमत जास्त असल्याने अल्पभूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे जवळपास अशक्य आहे.

त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना बैलाच्या साह्याने पारंपरिक शेती करावे लागते अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ट्रॅक्टर अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर 20 ते 50 टक्के अनुदान दिले जाते या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक दुर्बल व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

प्रधानमंत्री  किसान ट्रॅक्टर योजना 2022 अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुरबल शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी यांना ट्रॅक्टर खरेदीवर वीस ते पन्नास टक्के अनुदान दिले जाते या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम ट्रॅक्टरच्या किमतीवर दिली जाते तर जीएसटी आणि त्यासंबंधीचा इतर खर्च शेतकऱ्यांना स्वतः करावा लागतो

या योजनेअंतर्गत विविध राज्य सरकार शेतकऱ्यांकडून अर्ज मागवतात शेतकऱ्यांना हवे असल्यास थेट केंद्र किंवा राज्य सरकारच्या मदतीने ट्रॅक्टर वरील अनुदान योजनेचा लाभ घेऊन ते अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर खरेदी करू शकतात

योजनेसाठी पात्रता Tractor Subsidy

पी एम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर वरील अनुदान लाभ घेण्यासाठी पात्रता निश्चित केलेली आहे

1 त्या अंतर्गत फक्त कृषी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान दिले जाते शेतकऱ्यांकडे स्वतःची शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे

2आधार पॅन लिंक खाते भारतातील कोणत्या बँकेत असले पाहिजे

3 शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न केवळ दीड लाख रुपये असावे

See also  CM Kisan Yojana मुख्यमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6 हजार रुपये मिळणार

4 जर शेतकऱ्यांकडे आधीच ट्रॅक्टर असेल तर तो या योजनेचा लाभार्थी असणार नाही

5  फक्त एका ट्रॅक्टरच्या खरेदीवर अनुदानाचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो

आवश्यक कागदपत्रे Tractor Subsidy

आधार कार्ड ,पॅन कार्ड, जमिनीचा पुरावा सातबारा प्रत शेतकऱ्यांचे बँक खाते तपशील पासबुक प्रत, मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक केलेला असावा पासपोर्ट आकाराचा फोटो

शेतकऱ्यांनी अर्ज कसा करावा Tractor Subsidy

ट्रॅक्टर सबसिडी योजना 2022 साठी पात्र शेतकरी त्यांच्या जवळच्या सार्वजनिक सेवा केंद्र किंवा कॉमन सर्विस सेंटर सीएससी पोर्टलवर जाऊन ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात या योजनेचे संबंधितTractor Subsidy अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना हवे असल्यास ते त्यांच्या जिल्ह्यातील जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात.

Leave a Comment