Flood Damage Compensation |अतिवृष्टी नुकसान भरपाई |

Flood Damage Compensation |अतिवृष्टी नुकसान भरपाई |

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असून या नुकसान भरपाई वाटपात मोठे बदल झाले. आहेत आता शेतकऱ्यांना नवीन पोर्टल मार्फत मिळणार लवकरात लवकर मदत.

पीक नुकसान भरपाई : यावर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या संकटांना शेतकऱ्यांना सामना करावा लागला शेतकरी राजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले परंतु शेतकऱ्यांनी वारंवार पाठ पाठपुरावा करून देखील शेतकऱ्याला लवकर मदत मिळत नसल्याने राज्य शासनाने आता एक नवीन निर्णय घेतला असून आता या निर्णयानुसार अतिवृष्टी ग्रस्त शेतकरी मित्रांना नुकसानाची भरपाई लवकरात लवकर मिळण्याकरिता एक पोर्टल स्थापन करण्यात आले असून महा आयटी द्वारे हे पोर्टल विकसित करण्यात येणार आहे व तसेच शेतकऱ्यांना आता नुकसानासाठी राज्य सरकारकडून अतिरिक्त भरपाई म्हणून निधी वितरित करण्याचे मंजूर झाले आहे या मंजूर झालेल्या निधीच्या वाटप कशाप्रकारे करायचा यासाठी राज्य शासनाने नवीन धोरण तयार केले व या धोरणाद्वारे एका नवीन पोर्टलवर शेतकरी बांधवांना आपल्या झालेल्या नुकसानाची नोंद ऑनलाईन करता येणार आहे त्यामुळे कमी वेळात व लवकरात लवकर शेतकरी बांधवांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे व तसेच अतिवृष्टी भरपाई वाटता बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेऊन त्या निर्णयात बदल देखील करण्यात आला.

राज्य सरकारने घेतलेला निर्णय :  शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी ग्रस्त मदतीची वाटप आता पंतप्रधान किसान योजना व तसेच प्रोत्साहन अनुदानाप्रमाणेच शेतकऱ्यांना देखील ऑनलाईन पद्धतीने आपली पात्रता सिद्ध करा करावी लागणार आहे राज्य शासनाच्या निर्णयामुळे बोगस शेतकऱ्यांना आळा बसणार आहे आणि खरोखर नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना याची मदत मिळणार आहे यासंदर्भात राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे व त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी हा महत्त्वाचा बदल लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे माहिती अंतर्गत या निधीच्या वाटपासाठी लवकरात लवकर एक पोर्टल विकसित करण्यात येणार आहे व तसेच याबाबत राज्य सरकारने याला मंजुरी देखील दिली आहे शेतकरी मित्रांनो मदतीसाठी या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.व तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे इतर कागदपत्रे अपलोड करणे हे सुद्धा आवश्यक आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ई केवायसी करणे बंधनकारक असून आधार नंबर आणि खाते नंबर द्यावा लागणार आहे.

See also  Information About Kolhapur Mahalakshmi Temple 2021 - कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराची माहिती

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे Click करा.

होणारे नवीन बदल:  ज्याप्रमाणे पी.एम किसान चा लाभार्थी आहे की नाही हे प्रमाणित करण्यासाठी शेतकऱ्यांना पी केवायसी करणे आवश्यक झाले आहे. व तसेच आता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देखील आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड वरून बायोमेट्रिकद्वारे स्वतःची ओळख सुद्धा करावी लागणार आहे. व त्यामुळे बोगसगिरी व खोटारडेपणा करणारा शेतकऱ्यांना आळा बसणार आहे. व तसेच पारदर्शक पद्धतीने योग्य त्या शेतकऱ्यांना त्या निधीचे डायरेक्ट त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.

आमच्याशी जुळण्यासाठी येथे Click करा.

Leave a Comment