सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 – Sindhudurg Fort Information In Marathi Language

Sindhudurg Fort Information In Marathi Language – सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 

सिंधुदुर्ग हा किल्ला ( Sindhudurg Fort Information In Marathi Language ) महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध सागरी किल्ला व पर्यटन स्थळ आहे. सिंधुदुर्ग हा किल्ला मालवण बंदराच्या किनाऱ्यापासून पश्चिमे पर्यंत 1.60 किमी. वर कुरटे नावाच्या बेटावर तो किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचा सिद्दी, मुंबईचे इंग्रज, गोव्याचे पोर्तुगीज व परकीय सत्तांना पायबंद घालण्यासाठी या किल्ल्याची उभारणी केली होती.

या किल्ल्याची पहिली पायरी 25 नोव्हेंबर 1664 रोजी बसविण्यात आली. त्याचे बांधकाम गोविंद विश्वनाथ प्रभू याने केले. विजयदुर्ग व सिंधुदुर्ग यांच्या बांधणीसाठी महाराजांनी गोवेकरी पोर्तुगीजांकडून कारागीर मागविला होता. किल्ला बांधताना कित्येक खंडी शिशाचा उपयोग पायाच्या कामासाठी केल्याचा उल्लेख कागदोपत्री आजही आढळतो. सिंधुदुर्गच्या बंदोबस्तासाठी किनाऱ्या जवळच पद्मगड, राजकोट व सर्जेकोट यांची योजना केलेली होती. शिवाजी महाराजांच्या आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 - Sindhudurg Fort Information In Marathi Language

नक्की वाचा – माझे शेजारी मराठी निबंध

सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे. मात्र पूर्वीस प्रवेशद्वार आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की, उत्तरेकडे एक खिंड दिसते. या खिंडेतून आत गेले की दुर्गाचा दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबराच्या फळ्यांपासून केला आहे. उंबराचे लाकूड दीर्घकाळ टिकते. त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे.

नक्की वाचा – छत्रपती शिवाजी महाराज ( 1630 – 1680 ) – Shivaji Maharaj Information In Marathi

आत गेल्यानंतर मारुतीचे छोटे मंदिर आहे. तेथूनच बुरुजावर जाण्यासाठी मार्ग आहे. बुरुजावर गेल्यानंतर आजूबाजूचा 15 मैलांचा प्रदेश सहज दिसतो. पश्चिमेकडे जरीमरीचे देऊळ लागते. आजही तेथे लोक वस्ती करून राहतात. श्री शिवराजे- श्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त येथे दिसते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आजही दर बारा वर्षांनी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते.

इंग्रजानी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्ध्वस्त करून टाकला. किल्यांच्या बांधणीसाठी वापरण्यात आलेला चुना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ध्वज आणि त्यांचा ध्वजस्तंभ 228 फूट उंच होता. त्यामुळे समुद्रातून दूरवर तो ध्वज सहज दृष्टीस पडत होता. ध्वजाला पाहून मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. हा भगवा ध्वज इ.स.वी. 1812 पर्यंत फडकत होता.

See also  Maharashtra Cabinet Decision पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हेक्‍टरी 13600 रुपये मदत जाहीर

गडावर ठिकठिकाणी तोफा ठेवण्याच्या जागा आहेत. बंदुका रोखण्यासाठी तटाला छिद्रे ठेवली आहेत. सैनिकांसाठी पायखाने आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी 300 वर्षापासून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश यातून दाखविला आहे, हे याचे वैशिष्ट्य आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा स्मृतिमय इतिहास म्हणजे हा किल्ला असंख्य मावळ्यांच्या साक्षीने आणि परिश्रमाने समुद्रात हा किल्ला उभा केला. तो आजही पर्यटकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षित करणार आहे. सिंधुदुर्ग किल्ला मालवणपासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 - Sindhudurg Fort Information In Marathi Language

1961 साली तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी तटाची दुरुस्ती केली. विषेश म्हणजे या किल्यामध्ये एका नारळाच्या झाडाला दोन फांद्या इंग्रजी अक्षर वाय आकाराच्या होत्या. त्यातील एक फांदी जोराच्या वीज पडल्यामुळे मोडली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून येथे जीवाचा लागलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामास 350 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महारा़्ष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालना तर्फे दि. 22 एप्रिल ते 24 एप्रिल 2016 या काळात सिंधुदुर्ग महोत्सवाचे आयोजन केले होते.

महाराष्ट्रा सरकार व मालवण येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग किल्ला ( Sindhudurg Fort Information In Marathi Language ) आणि मालवण येथील बोर्डिंग ग्राऊंडवर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‌घाटन झाले.
सिंधुदुर्ग महोत्सवाच्या पूर्वसंध्येला मालवण बाजारपेठेतून भव्य शिवप्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात येते. या यात्रेदरम्यान सिंधुदुर्गाला लाभलेल्या 350 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेचा पट उलगडून दाखवला गेला.

नक्की वाचा –शिवजयंती – Shivaji Maharaj Jayanti 2021

सिंधुदुर्गाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊ ( Sindhudurg Fort Information In Marathi Language )

शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर 48 एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या 52 आहे व 45 दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत. त्यांची नावे दूध विहीर, साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी तीस ते चाळीस शौचालयाची निर्मिती केली आहे. या किल्ल्यामध्ये शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इ.स. 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते.

See also  kanda Anudan Yojana Form 2023 | कांदा अनुदान योजना फॉर्म 2023 .

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला ( Sindhudurg Fort Information In Marathi Language )आहे. महाराजांकडे 362 किल्ले होते. या सर्व किल्ल्यांचा पूर्वेस विजापूर, दक्षिणेस हुबळी, पश्चिमेस अरबी समुद्र आणि उत्तरेस खानदेश, वऱ्हाड या देशापर्यंतचा विस्तार होता. भुईकोट  आणि डोंगरी किल्यांच्या बरोबरीने सागरी मार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्त्वाची आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सागरी किल्ले निर्माण केलेहोते. चांगल्या, भक्कम आणि सुरक्षित स्थळांचा शोध घेऊन समुद्रकिनाऱ्याची पाहणी झाली. इ.स. 1664 साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळा कभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले. महाराजांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटांची पायाभरणी झाली. आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याविषयी माहिती 2021 - Sindhudurg Fort Information In Marathi Language

एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली. असं म्हणतात की, किल्ला बांधण्यासाठी एक कोटी पेक्षा जास्त खर्च आला. उभारणीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले, त्यांना गावे इनामे देण्यात आली. ऐतिहासिक सौदर्य लाभलेला सिंधुदुर्ग हा किल्ला ज्या कुरटे खडकावर तीन शतके उभा आहे. तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे. तो शुद्ध काळाकभिन्न खडक मालवण पासून सुमारे अर्धा मैल समुद्रात आहे.

सिंधुदुर्ग या किल्ल्यावर पाण्याची ही विशेष सोय केली गेली होती. मुख्य म्हणजे या किल्ल्याच्या परिसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहे. त्यांची नावे दूधबाव, दहीबाव आणि साखरबाव अशी आहेत. ह्या विहिरींचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्या बाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा एक चमत्कारच मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावर रहाणे सुलभ झाले आहे. पाण्याचा अतिरिक्त साठा करण्यासाठी एक कोरडा तलाव बांधण्यात आला होता. सध्या यातील वापर पावसाळ्यात पिकवला जाणारा भाजीपाला व कपडे धुण्यासाठी होतो.

See also  Narsobachi Wadi नरसोबाची वाडी

शिवकालीन चित्रगुप्त याने लिहिलेल्या बखरीतयाबाबत पुढील मजकूर नमूद केला आहे. “चौर्‍याऐंशी बंदरात हा जंजिरा अठरा टोपी करायचे उरावर शिवलंका, अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मान तारा. जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन, राज्याचा भूषण अलंकार. चतुर्दश महारत्नापैकीच पंधरावे रत्न, महाराजांस प्राप्त जाहले.”

इ. स. 1713 मध्ये हा किल्ला करवीर संस्थानच्या आधिपत्याखाली आला. 1765 मध्ये तो इंग्रजांनी घेऊन त्याचे नाव फोर्ट ऑगस्टस असे ठेवले परंतु मुंबईच्या इंग्रजांनी तो पुढे करवीरच्या छत्रपतींना काही अटींवर परत दिला आणि मालवणला वखार घालण्यास संमती मिळविली. 1812 मध्ये कर्नल लायोनेल स्मिथ याने हा किल्ला घेऊन येथील चर्चचा बंदोबस्त केला.

या किल्ल्यावर आजही शिवजंयती, रामनवमी, नवरात्र इ. उत्सव तिथीनुसार आनंदाने व मोठ्या उत्साहाने साजरे करतात. काही कुटुंबांची येथे वस्ती असून अंगणवाडी व एक पूर्व प्राथमिक शाळा आहे. करवीर छत्रपतींच्या वतीने येथील शिवाजी मंदिरात प्रतिवर्षी जिरेटोप, वस्त्रे अर्पण केली जातात. तसेच किल्ल्यावरील शिवरायांच्या हाताच्या ठशाचा चांदीचा छाप बनविण्यात आला असून त्याची नित्यपूजा कोल्हापुरातील जुना राजवाडा येथील भवानी मंदिरात होते.

‘चौऱ्यांशी बंदरांत हा जंजिरा मोठा व अठरा टोपीकरांचे उरावर अजिंक्य दुर्ग होता’ असे बखरकार म्हणतात. म्हणून महाराजांनी मोठ्या अभिमानाने त्याचे नाव ‘शिवलंका’ असे ठेवले. स्वराज्याच्या आरमारी दलाची आजही साक्ष देणारा हा किल्ला असून पर्यटक व दुर्ग अभ्यासकांसाठी आकर्षण ठरला आहे.

“तुम्हाला आमची माहिती सिंधुदुर्ग किल्ला ( Sindhudurg Fort Information In Marathi Language )याविषयी कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

 

Leave a Comment