Atirushti Nuksan Bharpai Madat 2022 | अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत 2022

Atirushti Nuksan Bharpai Madat 2022 – अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा मिळालेला आहे अतिवृष्टीच्या निकषातून वगळलेले जे शेतकरी आहेत त्यांना आता अतिवृष्टी मदत जाहीर झालेली आहे.

काही शेतकरी अतिवृष्टीच्या निकषात बसले नव्हते बाधित व नुकसान भरपाई पासून वंचित 8 लाख शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत जाहीर झालेली आहे.

जून ते ऑगस्ट 2022 या काळामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या व निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून आता शासनाने मदत जाहीर केलेली आहे. मुख्य मंत्री मदत व पुनर्वसन विभागामार्फत 755 कोटी रुपयांच्या निधीचे पुणे अमरावती औरंगाबाद या विभागातील नऊ जिल्ह्यांना हा निधी वितरित करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये राज्य शासनाने हा सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे.

आतापर्यंत शासनाने नैसर्गिक आपत्ती निवारण्याकरिता 4500 कोटी रुपये निधीचे वाटप केलेले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानापोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त सोलापूर, अमरावती, औरंगाबाद या जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केलेले होते.

खालील जिल्ह्यांना होणार आहे लाभ

परभणी 2545.25 हेक्टर

जालना 678 हेक्टर

औरंगाबाद 12679 हेक्टर

हिंगोली 96 हजार 677 हेक्टर

लातूर 213251 हेक्टर

बीड 48.80 हेक्टर

उस्मानाबाद 12609.95

सोलापूर 74446

यवतमाळ 36711.31

या पोस्टला सुद्धा भेट द्या

 

 

See also  Mahatma Jyotiba Phule Information In Marathi 2021 - महात्मा ज्योतिबा फुले

Leave a Comment