Pik Vima E- Pik Nond पिक विमा संबंधी मोठी बातमी ई पीक नोंद सक्तीची नाही

Pik Vima E- Pik Nond पिक विमा संबंधी मोठी बातमी ई पीक नोंद सक्तीची नाही

पंतप्रधान पिक विमा(Pik Vima) योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक नोंद (E-Pik Nond) आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक नोंदीच्या दाखल्याची कोणतीही सक्ती करण्यात आलेले नाही अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात 2022-23 वर्षात पंतप्रधान पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. चालू खरीप हंगामातील पिकांचा विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना 13 जुलै 2022 पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र या योजनेत सहभागी होण्यासाठी ई पीक नोंद सत्तेची असल्याने योजनेत सहभाग घेता नसल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. पण शेतकऱ्यांना पीक स्वयंघोषणापत्र पीक विमा योजनेत सहभागी होता येईल.

राज्य सरकारच्या ई पीकमध्ये पिक पेरा याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरू होत आहे. त्यावेळी आपल्या पिकांची नोंद करावी अशी कृषी विभागाने कळविले आहे. स्वयं घोषणा पत्रदेऊन पिक विमा योजनेत भाग घेतलंल्यानंतर शेतकरी यांनी ई पीक पाहणीत आपल्या पिकाची नोंद करावयाची आहे विम्यासाठी नोंद केलेले क्षेत्र आणि ई पीक मध्ये तफावत दिसल्यास ई पीक पाहणी तील क्षेत्र अंतिम गृहीत धरण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेच्या पिकासाठी सहभाग घेतला आहे त्याचे योग्य नोंद पीक पाणी करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे.

See also  Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Anudan Yojana | भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान

Leave a Comment

x