महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत 7 मोठे बदल अशी होणार भरती प्रक्रिया Maharashtra Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेत 7 मोठे बदल अशी होणार भरती प्रक्रिया Maharashtra Police Bharti 2022

महाराष्ट्र सरकारने (state government) 7231 जागांसाठी पोलीस भरती(police bharti) घेण्याची घोषणा केली आहे. शिपाई ( कॉन्स्टेबल )पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

2020 सालच्या पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास नुकतीच मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय 28 जून 2022 रोजी जारी करण्यात आला आहे. या पदासाठी होणाऱ्या भरती परीक्षेच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत.

शिपाई पदासाठी Maharashtra Police Bharti 2022 च्या भरतीसाठी पहिल्यांदाच शारीरिक चाचणी होणार आहे. नंतर मैदानी चाचणीत उत्तीर्ण उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. याविषयी बोलताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलीप वळसे-पाटील म्हणाले की या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलीस दलास होणार असून त्यांना ताकतवान मनुष्यबळ उपलब्ध होईल. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलांचा मोठा फायदा होईल.

पोलीस शिपाई भरती पद्धतीचे हे महत्त्वाचे सात बदल

1 पोलिस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी आधी आणि मग लेखी परीक्षा घेण्यात येईल.

2 शारीरिक चाचणी गुणांची होणार आहे.

3 राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष पदासाठी शारीरिक चाचणी एकूण शंभर गुणांची होणार आहे.

4 शारीरिक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणारे उमेदवार लेखी चाचणीसाठी पात्र असतील.

5 लेखी परीक्षा शंभर गुणांची होईल.लेखी परिक्षे मध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचे असतील.

6 लेखी परीक्षा मराठी भाषात घेण्यात येईल.

7 लेखी चाचणी चा कालावधी 90 मिनिटे असेल लेखी परीक्षा विशेष बाब म्हणून OMR पद्धतीने घेण्यात येईल.

See also  शेळीपालन व्यवसायासाठी आता 25 लाखापर्यंत कर्ज Goat Loan
Categories Job

Leave a Comment