MPSC मार्फत होणार शिक्षकांची भरती

MPSC मार्फत होणार शिक्षकांची भरती

शासकीय सर्व पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून म्हणजेच एमपीएससीमार्फत करण्याची मागणी करण्यात येत होती.

त्यातच आता राज्यातील शिक्षकांची भरती देखील (Recruitment of teachers) एमपीएससी mpsc करून घेण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव शिक्षण आयुक्तालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे.सध्या पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती होते.या प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्याने ही प्रक्रिया लांबली आहे. खाजगी अनुदानित संस्थांतील शिक्षकांची पदे मुलाखतीद्वारे करण्याचा टप्पा सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना आयुक्तालयाकडून शिक्षकांची भरती एमपीएससीमार्फत राबविण्याचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

राज्यभरातील उमेदवारांकडून सातत्याने शिक्षक भरतीची मागणी होत होती त्या पार्श्वभूमीवर 2019 मध्ये 12 हजार 500 पदांची भरती पवित्र संकेतस्थळामार्फत केली होती. वास्तविक पारदर्शक भरती होण्यासाठी पवित्र पोर्टल ची निर्मिती करण्यात आली होती. भरती प्रक्रिया राबवणाऱ्या mpsc अनुभवी संस्था असून ती शासनाचीच आहे. पारदर्शक गुणवत्तापूर्ण पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जात असल्याने एमपीएससीची विश्वासार्हता आहे. जर शिक्षक भरती झाली तर गुणवत्तापूर्वक शिक्षक मिळण्यास मदत होणार आहे.

दरम्यान शिक्षण आयुक्तालयाने जरी प्रस्ताव दिला असला तरी एमपीएससीमार्फत शिक्षक भरती करावयाची असेल तर काही तांत्रिक बदल आवश्यक आहेत त्या बदलांची पूर्तता केल्यानंतरच पुढील शिक्षक भरती एमपीएससी मार्फत राबविली जाऊ शकते.

या प्रस्तावाबाबत शिक्षण सचिव एमपीएससीच्या अध्यक्षा कडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असला तरी mpsc चे सध्याचे नियम आहे. त्यामध्ये बदल केल्यानंतरच शिक्षकांची भरती होऊ शकते त्यामुळे हे बदल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

See also  DigiLocker mParivahan Driving License ड्रायव्हिंग करताना वापरा हे ॲप
Categories Job

Leave a Comment