Maharashtra Rain राज्यात पुन्हा पावसाचे थैमान या भागात मुसळधार पाऊस

Maharashtra Rain राज्यात पुन्हा पावसाचे थैमान या भागात मुसळधार पाऊस

जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या चार दिवसात थोडी उसंत दिली होती. परंतु कालपासून पुन्हा पावसाची शक्‍यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Maharashtra rain

हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार येथे अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. दरम्यान पुणे-मुंबई या मुख्य शहरांमध्ये पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे.

राज्यात काही भागांत पावसाने उसंत दिल्याने काही ठिकाणी सूर्यदर्शन झाले होते त्यामुळे काही अंशी तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला होता. दरम्यान कालपासून पूर्व विदर्भातील चंद्रपूर गोंदिया गडचिरोली उत्तर कोकणातील पालघर शहापूर नाशिक-पुणे जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. तर पूर्व विदर्भात पूर्व मराठवाड्यात विजांचा पावसाची शक्यता होती.

बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे दिसून येते. राजस्थानच्या गंगानगर पासून ईशान्य बंगालच्या उपसागरावर यांचा पट्टा दोन ते तीन दिवसात दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिसा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिण भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाची शक्यता आहे. दरम्यान मागच्या 24 तासात कोकण: कोल्हापूर माथेरान कुडाळ या भागात कोकण ३0 मीमी पावसाची नोंद झाली. सर्व मुरुड राजापूर जव्हार संगमेश्वर खालापूर माणगाव शहापूर या भागात 20 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळा महाबळेश्वर 50 मिमी तर इगतपुरी गगनबावडा येथे तीस मिमी पावसाची नोंद झाली. मराठवाडा परिसरात 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील गोंदिया लाखांदूर सालकेसा या भागात प्रत्येकी वीस मिमी पावसाची नोंद झाली.

See also  MPSC मार्फत होणार शिक्षकांची भरती

Leave a Comment

x