तुम्हाला तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता मिळेलच बघा कायदा काय सांगतो Maharashtra Land Revenue Act 1966

तुम्हाला तुमच्या शेतात जाण्याचा रस्ता मिळेलच बघा कायदा काय सांगतो Maharashtra Land Revenue Act 1966

शेतकऱ्यांसाठी रस्त्याबाबत खूप मोठ्या भानगडी निर्माण होतात. एका शेतातून दुसऱ्या शेतात जाण्याकरता रस्ता मिळत नाही हा रस्ता मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत का? ह्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल.

शेतासाठी रस्ता मिळवण्याचे तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 (Maharashtra Land Revenue Act 1966) 143 नुसार तुम्ही दुसऱ्याच्या शेतातुन 100% टक्के रस्ता मिळू शकतात तहसीलदार साहेब तुम्हाला तुमच्या बांधावरून रस्ता मिळवून देऊ शकतो त्यासाठी तुम्हाला तहसीलदारांकडे तक्रार नोंदणी अर्ज सादर करावा लागेल की आम्हाला या शेतातून जाण्यासाठी रस्ता पाहिजे किंवा आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्यावा.

या तक्रारीवर तुम्हाला एक अर्ज लिहावा लागेल आणि सोबत तुम्हाला कोणत्या बाजूने रस्ता पाहिजे याचा कच्चा नकाशा लावावा लागेल तसेच आणखी एक म्हणजे तुमची शेतीचे शासकीय मोजणी झालेली असेल तर त्याचा नकाशा लावावा लागेल तसेच तीन महिन्याच्या आतील सातबारा तुम्हाला अर्जाला जोडावा लागेल. शेताच्या बाजूच्या किंवा आमच्या शेतातून रस्ता पाहिजे त्या शेती विषयी काही माहिती असेल तर ती माहिती अर्जासोबत जोडून तो अर्ज तहसिलदाराकडे सादर करावा.

हा अर्ज तहसीलदारांकडे केल्यानंतर तहसीलदार त्या शेतकऱ्याला अधिकृत नोटिस पाठवतो त्यांना तहसीलदार साहेब अधिकृत तारीख देतात या नोटिसा पाठवल्यानंतर तहसीलदार किंवा नायब तहसीलदार दिलेल्या दिनांकला तिथे प्रत्यक्षपणे येऊन पाहणी करतात. सर्वप्रथम तुम्हाला खरच रस्त्याची गरज आहे का? पूर्वीच्या मालकाचा रस्ता कोणता आहे? हे पाहिले जाते. तुमच्या शेतात जाण्यासाठी जवळचा रस्ता कोणता आहे हे पाहता रस्ता किती फुटाचा आहे तुम्ही ज्या रस्त्याची मागणी करत आहात त्यासाठी तुम्हाला दुसरा रस्ता आहे का? याचे सर्व पाहणी करतात.

शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतात रस्ता तयार करण्यासाठी काही नुकसान होते का याची सर्व दक्षता घेतली जाते.दोघांची बाजू लक्षात घेऊन तहसीलदार किंवा नायब तहसीलदार यावर आपला निर्णय ठरला होता जर खरोखरच तुम्हाला रस्त्याची गरज आहे आणि त्यासाठी इतर कोणताही दुसरा मार्ग उपलब्ध नसेल तर तुम्हाला तिथूनच मार्ग काढून देतील. पायवाटेचा रस्ता असेल तर आठ फुटाचा रस्ता तुम्हाला मिळेल अशी काही तरतूद आहे गाडी वाटेचा 8 ते12 फुटाचा रस्ता देखील असेल तरच सुद्धा एक तरतूद आहे शेजारच्या शेतकऱ्याचा नकार असेल परंतु तुम्हाला खरच रस्त्याची गरज असेल तर तुम्हाला ते रस्ते जमीन महसूल अधिनियमानुसार मिळू शकतात.

See also  पोस्ट ऑफिस च्या योजनेत दररोज 50 रुपयांची बचत करा आणि मिळवा 35 लाख रुपये Post Office Yojana

7/12 उताऱ्याचे फायदे आणि नवीन प्रोसेस जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Categories Job

Leave a Comment