Maharashtra Cabinet Decision शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान कॅबिनेट बैठकीत निर्णय

Maharashtra Cabinet Decision शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान कॅबिनेट बैठकीत निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी राज्यातील विविध विभागाबाबत महत्त्वाचे निर्णय करण्यात आले.

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून तर शेतकऱ्यांच्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय याचाही समावेश आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांच्या मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

सुमारे 14 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल आणि 6 हजार कोटी निधी लागेल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुमारे 13. 85 लाख शेतकऱ्यांच्या 14.57 लाख कर्जखात्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुसकान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा घेता येईल एखादा शेतकरी मृत झाल्यानंतर त्याच्या वारसांनी कर्ज परत फेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा आला मिळेल नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी 2017-18,2018-19,आणि 20219-20हा कालावधी विचारात घेऊन या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करून नियमित पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आली.

या योजनेचा लाभ कोणाला? Maharashtra Cabinet Decision

1) 2017 -18 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2018 पर्यंत पूर्णता परतफेड केले असल्यास

2)2018-19 या आर्थिक वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 30 जून 2019 पर्यंत पूर्ण परत फेड केली असल्यास

3) 2019-20 या आर्थिक वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्णता परतफेड केले असल्यास

2017-18 2019 2020 या तीनही आर्थिक वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज परतफेडीचा दिनांक यापैकीजी नंतरची असेल त्या दिनांक पूर्वी कर्जाची पूर्णता परतफेड केली असता त्याचा शेतकऱ्यांना त्यांनी 2018-19 अथवा 2019-20 या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त 50 हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात आली.

See also  Marathi Jokes मराठी जोक्स

मात्र 2018-19 अथवा 2019-20या वर्षात घेतलेले आहे व त्याची पूर्णता परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम 50 हजारांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी 2018 -19 – 20 व्या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.

Categories Job

Leave a Comment