Lampi Skin Desease लम्पी स्किन डिसीज गुरांवर आले मोठे संकट
शेतकरी मित्रांनो आज गुरांवर लम्पी स्कीन डीसीज चा प्रादुर्भाव मोठ्या प्रारमाणत जाणवत आहे. सध्या राज्यात मोठ्या प्रमाणावर हा आजार पसरत आहे .
एल सी डी हा आजार विषाणूजन्य असून संसर्गजन्य आहे या रोगाचा प्रसार कॅप्रीपोक्स या विषाणूमुळे होतो आणि हे विषाणू शेळ्या व मेंढ्यांमध्ये देवी रोगाच्या विषाणूशी संबंधित आहेत.
आजाराचा प्रसार कसा होतो? Lampi Skin Decease
एलसीडी हा आजार चवणारे डास गोचीड,चिलटे तसेच बाधित जनावरांमुळे दूषित पाणी व चारा प्राशन केल्यामुळे होतो.
आजाराची लक्षणे
1 ह्या आजाराचे प्रमुख लक्षण म्हणजे जनावरांच्या अंगावर दहा ते वीस मीमी व्यासाच्या गाठी येतात
2 भरपूर ताप येतो नाकावाटे व तोंडावर चिकट स्त्राव येतो
3 जनावर चारापाणी खाणे कमी करतो
4 जनावराचे दूध कमी होते तर काही जनावरांच्या पायावर सूज येते
पशुपालकांनी घ्यावयाची काळजी
जनावर बाधित झालेले आढळून आल्यास त्याला निरोगी जनावरांपासून वेगळे करणे तसेच या रोगाचा प्रादुर्भाव कमी होईपर्यंत कुठल्याही जनावरांचे खरेदी व विक्री करू नये. गुरांच्या गोठा मध्ये डास मच्छर चिलटे होणार नाहीत तशी औषधांची फवारणी करावी रोगांची लक्षणे दिसतात जनावरांच्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये संपर्क साधावा जेणेकरून आपल्या पशुपालकांचे नुकसान होणार नाही.