Ganpati Bappa Morya “गणपती बाप्पा मोरया” असे गणपतीला का म्हटले जाते? 2021

Ganpati Bappa Morya “गणपती बाप्पा मोरया” असे गणपतीला का म्हटले जाते? हे आपण जाणून घेऊ. प्रत्येक घरात दहा दिवसांसाठी श्री गणेश विराजमान होत असतात. गणेश चतुर्थी जवळ आली की, मुलांचा आनंद पाहण्या -सारखा असतो. दहा दिवसांच्या या गणेशोत्सवात दाही दिशांनी आपल्याला आनंद दिसतो. लोकांच्या मनात दैविक उत्साह दाटलेला दिसून येतो. ‘गणपती बाप्पा मोरया’ असे गणपती विषयी म्हटले जाते. गणपती बाप्पा सोबत मोरया का म्हटले जाते. याविषयी जास्त लोकांना माहीत असेलच हे सांगता येत नाही.

Ganpati Bappa Morya “गणपती बाप्पा मोरया” असे गणपतीला का म्हटले जाते?

बऱ्याच जणांना गणपती बाप्पा मोरया Ganpati Bappa Morya असे का म्हटले जाते. हे माहित सुद्धा नाही. मग गणपती बाप्पा सोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे सहाशे वर्ष जुनी एक कथा आहे.

महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 कि.मी. अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे. 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशाचे एक परम फक्त होऊन गेले होते. ते प्रत्येक गणेश चतुर्थीला चिंचवड पासून 95 किमी अंतरावर असलेल्या मोरगावचा मयुरेश्वर गणपती मंदिरात दर्शनासाठी जात होते. मयूरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील अष्टविनायक गणपती पैकी एक आहे असे सांगितले जाते.

वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयुरेश्वर मंदिरात जात राहिले; परंतु त्यांचे वय जास्त झाल्यामुळे म्हणजे वृद्धापकाळाने त्यांना मंदिरात जाणे शक्य होईनासे झाले. यामुळे मोरया गोसावी नेहमी दुखात राहत होते. एके दिवशी श्री गणेशाने त्यांना स्वप्नात दर्शन देऊन सांगितले की, उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल.
तर,
दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले असता, कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्रीगणेशाची एक छोटी मूर्ती होती. देवाने त्यांना दर्शन दिले. ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली. त्यानंतर त्यांची समाधीही येथे बांधण्यात आली. हे या ठिकाणी अशा प्रकारे जोडले आहे, की येथे फक्त गणपती उपचार न करता ‘गणपती बाप्पा मोरया’. गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया असे आनंदाने म्हटले जाते.

See also  राज्य सरकारचा मोठा निर्णय या योजनेचा शेतकऱ्यांना मिळणार पंचात्तर हजार रुपये State Government Decision

गणेश चतुर्थी विषयी माहिती

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला सिद्धिविनायक की चतुर्थी असे म्हटले जाते. हिलाच शिवा असे म्हटले जाते. गणपती संप्रदायाचे हे महत्त्वाचे व्रत मानले जाते. गणेश चतुर्थीची प्रचलित अख्यायिका अशी आहे, की एकदा गणपती चतुर्थीचे स्वतःचे आवडीचे मोदक खाऊन उंदराच्या पाठीवरून गणपती जात होते. वाटेत साप पाहिल्याने उंदिर भयाने कापू लागला.

यामुळे Ganpati  उंदराच्या पाठीवरून खाली पडला व त्याचे पोट फाटून मोदक बाहेर पडले. गणपतीने ते सारे मोदक पुनः पोटात टाकले व पोटावर साप बांधला हे दृश्य पाहून आकाशातील चंद्र हसू लागला व म्हणून गणपतीने त्याला श्राप दिला की, तुझे चतुर्थीस कोणी दर्शन घेणार नाही. आणि जो घेईल त्यांना संकट येईल. असा शाप चंद्राला दिला अशी एक प्रचलित आहे.

गणेश जन्म माघ महिन्यातील चतुर्थीला माघी चतुर्थी असे म्हटले जाते. हा गणपतीचा जन्म दिवस आहे. जागृती स्वप्न सुषुप्ती आणि सूर्य अशा चार अवस्था मानले गेले आहेत. चतुर्थी ही व्यवस्था म्हणजे आत्मिक साधनेची एक अवस्था मानली गेली आहे असे भारतीय तत्वज्ञान मानते. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते. हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्याचा मुख्य मंत्र गणेश गायत्री मंत्र असा आहे

|| एकदंताय विघ्नहे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् ||

शंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य देवतेचे स्थान दिल्यावर गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली गणपतीच्या उपासकांच्या गणपथ्य संप्रदाय निर्माण झाला. पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील एक पुरूष मानले जातात या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचलेली आहेत गणेश पुराण आणि मुग्दल पुराण.

Ganpati ची विविध नावे आहेत. ते म्हणजे पुराणांमध्ये गणपती शिवहर पार्वतीपुत्र अशा विविध नावांनी ओळखतो. शंकर-पार्वतीचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे.

See also  399 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस ची ग्रुप ऍक्सीडेन्ट गार्ड पॉलिसी

वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुण्ड म्हणजे, “ज्याचे तुण्ड वक्र वा वाकडे आहे तो”.  गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो. त्यामुळे हे नाव एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.

प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार  कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने  गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळा खेळातील लढाईत  कार्तिकेयाने  गणपतीचा एक दात पाडला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे  महा म्हणजे मोठे उदर असणारा व लंब वा लांबडे उदर असणारा असा आहे.

ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.

वैदिक काळ  Ganpati Bappa Morya

गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या  ऋग्वेदात मिळतो.  दोन ऋक मंत्र गणानाम गणपतीम् हवामहे व विषु सीदा गणपते. वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात. जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती ब्रह्मणस्पती वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन गणेश विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात.

ऋग्वैदिक Ganpati ची दुसरी नावे होती बृहस्पती, वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई. तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुर्‍हाड ही या देवतेची अस्रे होती. या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई. ही देवता कायम ‘गण’ नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.

दुसर्‍या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे.

इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसना -च्या पाचव्या शतकातील  पंचतंत्र  वा  भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही.  गुप्त  काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे मानले जाते.

See also  Rohit Sharma Replaces Virat Kohli as ODI Captain | विराट कोहली आता कप्तान का नाही?

गाणपत्य Ganpati Bappa Morya

गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे. गणपती संप्रदायाने गणेश म्हणूनव मुदगल या देवतेदोन पुराणे व महाकाव्यांत उल्लेखआहे. गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत. यांची रचना साधारणपणे इ.स. 1100 ते इ.स. 1400 मध्ये झाल्याचे मानले जाते.

गणेश पुराण  Ganpati Bappa Morya

गणेश पुराण गणेशाच्या कथा व पूजापद्धती यासाठी हे पुराण महत्त्वाचे आहे. याचे दोन खंड आहेत. उपासना खंड आणि क्रीडाखंड किंवा उत्तरखण्ड उपासना खंडाची अध्यायसंख्या 92 असून क्रीडाखंडाची अध्यायसंख्या 155 आहे. उपासनाखंडाच्या 36 अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्रनाम स्तोत्राची रचना झाली आहे. याचा अनेक ठिकाणी पाठ होतो.

क्रीडाखंडाचे अध्याय 138-48 गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहेत. गणपतीने आपल्या गजानन  अवतारात ही गीता राजा वरेण्यास सांगितली. याचे स्वरूप  भगवद्गीता  ग्रंथाप्रमाणे आहे.  मोरया नावाच्या ऋषी मुळेच गणपतीला गणपती बाप्पा मोरया हे नाव पडले.
अशाप्रकारे गणपतीला ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हटले जाते. तुमच्या लक्षात आले असेलच. आपण गणपतीपुळे लेख जरूर वाचा.

“तुम्हाला आमची Ganpati Bappa Morya माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”

दिवाळी – information of diwali in marathi

मराठी आरोग्य 

Leave a Comment