Aadhar Card Update असा बदला आधार कार्ड वरील फोटो आणि पत्ता

Aadhar Card Update असा बदला आधार कार्ड वरील फोटो आणि पत्ता

आधार कार्ड(Aadhar Card) आपल्या देशातील महत्त्वाचा दस्तऐवज किंवा कागदपत्र आहेत. सरकारी आणि खाजगी प्राधिकरणाच्या अनेक सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार आवश्यक आहे. बँक खाते उघडण्या पासून ते शाळेत प्रवेश घेण्यास पर्यंत तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे.

पण अनेकदा आधार कार्ड वरील जुन्या फोटोमुळे आणि पत्या मुले अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून आधार कार्ड वरील तुमचा फोटो बदलू शकता. युनिक आयडेंटिफिकेशन ॲथॉरिटी ऑफ इंडिया(UIDAI) कार्डधारकांना आधार कार्ड वरील फोटो बदलण्याची परवानगी देते. त्यासाठी त्यांच्या UIDAI या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी लागेल.

असा बदला आधार कार्ड वरील फोटो Aadhar Card Update

फोटो बदलण्यासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या अधिकृत पोर्टल uidai.gov.in वर जावे लागेल. आधार कार्ड वरील फोटो बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागेल त्यानंतर जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट देऊन हा फॉर्म आधार नोंदणी कार्यकारिणीकडे सबमिट करा. त्यासाठी तुम्हाला आधार केंद्रावर 25 रुपये शुल्क भरावे लागेल. एक अधिकारी तुमचा फोटो काढेल आधार कार्डवर तो अपलोड करेल. एक्झिक्यूटिव्ह तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर आणि पावती स्लिप देईल.URN तुम्ही वापरून या वेबसाईटवर आधार अपडेट स्तिथी पाहू शकता.

असा बदला आधार कार्ड वरील पत्ता Aadhar Card Update

जर तुम्ही आधार वर दिलेला पत्ता बदलायचा असेल तर UIDAI काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेले आहेत पत्ता बदलण्यासाठी पासपोर्ट, बँक स्टेटमेंट/ पासबुक पोस्ट ऑफिस अकाउंट स्टेटमेंट किंवा पासबुक रेशन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स,सरकारी फोटो आयडी कार्ड, सर्विस फोटो कार्ड ह्या सारख्या पत्त्यांच्या पुराव्यांचे कागदपत्राची स्कॅन केलेली प्रत आवश्यक आहे त्याचबरोबर वीज बिल पाणी बिल हे सर्व कागदपत्रे दाखवून तुम्ही पत्ता बदलू शकता.

See also  Bsnl recharge plan आता 19 रुपयात महिनाभर बोलला सर्वात स्वस्त प्लॅन
Categories Job

Leave a Comment