Aadhar card linkages voter ID आजपासून आधार कार्ड मतदान ओळखपत्र लिंक मोहीम

Aadhar card linkages voter ID आजपासून आधार कार्ड मतदान ओळखपत्र लिंक मोहीम

केंद्रीय निवडणूक आयोगाने आजपासून मतदान ओळखपत्र (Voter ID)आणि आधार कार्ड (Aadhar card)लिंक ची मोहीम सुरू करणार आहे.

महाराष्ट्रासह काही राज्यांनी आजपासून हा उपक्रम सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मतदार याद्या अधिकाअधिक बिनचूक करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र लिंक मोहिमेचा हेतू? Aadhar card linkages voter ID

मतदार यादी मध्ये दोन वेळा नावे असणे,पत्ता अपूर्ण असणे आदी चुका आढळून येत होते. मतदान ओळखपत्र आणि आधार कार्ड लिंक केल्यामुळे एकाच व्यक्तीचे एकापेक्षा अधिक मतदार संघात किंवा त्याच मतदार संघात एकापेक्षा अधिक वेळा नावाची नोंदणी तपासण्यात अधिक सोपे होणार आहे. तसेच मतदारांची ओळख पटवणे मतदारयादीत असणारी माहिती ची तपासणे अधिक सोपे होणार आहे.

मतदार ओळखपत्र से आधार लिंक साठी निवडणूक कायदा सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये डिसेंबर 2011 मध्ये आवाजी मतदानाने मंजूर झाले होते. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी ही मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी सांगितलंय की आधार मतदान ओळखपत्र लिंक अशी प्रक्रिया एक ऑगस्ट पासून राज्यात हाती घेणार आहे.या प्रक्रियेमुळे मतदारांची ओळख पटवणे सोपे जाईल. एकाच व्यक्तीच्या एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकाच मतदारसंघात एकापेक्षा जास्त वेळा मतदार यादीत नोंदणी झाली आहे काय आहे हे तपासता येईल. 17 वर्षांपेक्षा अधिक युवक ही मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी पात्र वय होईपर्यंत प्रतीक्षा न करता नाव नोंदणीसाठी आधार अर्ज करू शकणार आहेत.

आधार कार्ड मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया Aadhar card linkages voter ID

राज्य निवडणूक आयोग यासाठी शिबीर घेणार आहेत यामुळे आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे तुम्ही ऑनलाईन प्रक्रिया करू शकता
1) सर्वप्रथम नॅशनल वॉटर सर्विस पोर्टल ला भेट द्या.https://www.nvsp.in येथे लॉगिन करा.
2) तुमची नोंदणी नसेल तर नवीन युजर म्हणून नोंद करा.
3) एन व्ही एस पी वेबसाईटच्या होमपेजवर seArch इन electotalवर क्लिक करा येथे मतदार ओळखपत्र ईपीआयसी नंबर आणि स्टेट टाकून सर्च करा.
4 यानंतर feed आधार नंबर या पर्यायावर क्लिक करा ओपन होणाऱ्या विंडोजवर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड संदर्भातील माहिती द्यावी लागेल यानंतर तुम्ही ओळखत तपासणीसाठी तुमच्या नोंदणी असणाऱ्या मोबाईल क्रमांक आणि ई-मेल द्वारे otp येईल.
5) हा otp देऊन तुम्ही सबमिट वर क्लिक करा यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन च्या माध्यमातून आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र लिंग झाल्याची माहिती मिळेल.

See also  Aadhar Card Update असा बदला आधार कार्ड वरील फोटो आणि पत्ता

Leave a Comment