इको फ्रेंडली गणपती | Echo-Friendly Ganpati Utsav

Echo-Friendly Ganpati Utsav-दरवर्षी गणपती उत्सव साजरा करणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती मुर्त्या गणेश भक्तांच्या घरी विराजमान होत असतात. परंतु दहा दिवसाच्या नंतर याच गणपतींच्या जेव्हा विसर्जनाची वेळ येतो. त्यावेळेस मात्र हे गणपती आपण नदी, तलाव, विहिरी किंवा समुद्रामध्ये विसर्जनासाठी नेत असतो, त्यावेळेस होणारे जलप्रदूषण याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणून इको फ्रेंडली गणपती बनवून आपण या जल प्रदूषणाला आळा घालू शकतो. तर अशाच इको-फ्रेंडली गणपती विषयी आपण माहिती पाहू तसेच ही मूर्ती कशी तयार करायचा या विषयी आपण माहिती पाहणार आहोत.

Echo-Friendly Ganpati Utsav इको फ्रेंडली गणपती

सार्वजनिक गणेशोत्सव इको-फ्रेंडली पद्धतीने साजरे व्हावेत, या दृष्टीने प्रबोधन करण्याचे काम बऱ्याच कार्यशाळेत केल्या जाते. अनेक जण ते आपला घरगुती गणेशोत्सव साधेपणाने व पर्यावरणाला पूरक अशा रीतीने साजरा करतात. ते सार्वजनिक उत्सवात मात्र पर्यावरणाची हानी बिनदिक्कत करतात. जसे की डीजे, ढोल, पथकांचा मोठा आवाज नसला, तर उत्सव साजरा होत नाही. यांसारख्या समाजातून या मंडळांना बाहेर आणावे लागेल.

हे पण वाचा : प्यारी खबर

एक वॉर्ड एक गणपती Echo-Friendly Ganpati Utsav अशी संकल्पना त्यांच्यामध्ये रुजवावी लागेल. तर लोकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्याचे व पाहण्याचे आनंद वाटेल. धर्माला नाही तर त्यातील चुकीच्या प्रथांना असलेला विरोध आहे. हे सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न या संस्थांचा आहे.
राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण व संवर्धन कामात सक्रिय असलेल्या शालेय विद्यार्थ्यांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाडू आणि मातीच्या गणेश मूर्ती तयार केलेल्या होत्या. तसेच भारतातील विविध शाळेमध्ये ही हा कार्यक्रम दरवर्षी पार पाडला जातो.

विद्यार्थी घरी, शाळेत शाडूच्या मातीच्या मुर्त्या तयार करतात व त्यांना आपल्या घरी विराजमान करतात. यामुळे पर्यावरणाची होणारी हानी वाचते. या वर्षी तरी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्यामुळे गणेश चतुर्थी घरच्या घरी साजरी करावी लागले, अशा परिस्थितीत तुम्हाला घरी इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनविण्याचा सोपा मार्ग आहे. तसेच गणेश चतुर्थी घरात राहूनच साजरी घरच्या घरी गणेश मूर्ती तयार करून केली जाते. तसेच ह्या गणेश मूर्तींचे विसर्जन पाण्यात केल्यानंतरही कोणत्याही प्रकारचे जलप्रदूषण होत नाही.

See also  399 रुपयांमध्ये पोस्ट ऑफिस ची ग्रुप ऍक्सीडेन्ट गार्ड पॉलिसी

Mumbai Ganpati Utsav – Echo-Friendly Ganpati Utsav

मुंबईसारख्या शहरात गणेशोत्सव हा सण दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने भाविक भक्त गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणून त्यांची मनोभावाने पुजा करतात. तसेच सार्वजनिक ठिकाणी ही मोठ्या गणपतीच्या मुर्त्या बसविण्यात येतात. हा उत्सव साजरा करण्यामागे खूप जुनी परंपरा आहे. काळ कोणताही असो अशा परिस्थितीत भाविकांनी निराश व अस्वस्थ होऊ नये.

जर घरीच सुरक्षित राहायचे असेल तसेच आपल्याला जलप्रदूषण टाळायचे असेल, तर श्री गणेश चतुर्थी उत्सवही साजरा करायचा असेल तर बाजारपेठेत गणेश मूर्ती मिळो अथवा न मिळो. पण आपण निश्चितपणे घरी इकोफ्रेंडली गणपती मूर्ती बनवू शकता. तर ती मूर्ती कशी बनवायची त्यासाठी कोणकोणते साहित्य लागतात ते आपण पुढील प्रमाणे पाहूया. घरी गणेश मूर्ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू पण कोणत्याही ते पाहणार आहोत.

साहित्य : चिकन माती ,पाणी , टूथपिक ई.

कृती :

चिकन माती मध्ये पाणी टाकून ती घट्ट मळून घ्या. मातीपासून मूर्तीचे भाग बनवा. एका तुकड्याने मूर्तीचा बेस तयार करा. हात, पाय, सोंड, धड, कान आणि चेहरा बनवा. यानंतर तयार केलेले हे सर्व शरीराचे भाग जोडून घ्या. त्यानंतर चिकन माती, सहा वक्र आकाराच्या तोंड बनवा आणि ती चेहऱ्याच्या मधोमध जोडा गणपतीच्या मूर्तीसाठी हात बनवा आणि ते दोन्ही बाजूला जोडा यानंतर लहान लहान आकाराचे चिकन माती पासून डोळे आणि कान बनवा. ते मूर्तीवर लावा आणि तुमचा इको फ्रेंडली गणपती तयार आहे.

स्वयंसेवी संस्थांनी एखादी समाजाच्या हिताची कल्पना मांडली. तिला जागृत लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्यानंतर सरकारी यंत्रणेने ती जोपासली तर किती व्यापक क्रांती होऊ शकते. याचे समर्पक उदाहरण म्हणजे इको फ्रेंडली गणेश उत्सव आहे. आता शाडूच्या गणेशमूर्ती पासून सजावट ते थेट विसर्जनापर्यंत सर्वकाही निसर्गावर कोणताही परिणाम होऊ न देता हा उत्सव साजरा करण्याकडे शहरी भागांचा वेगाने प्रयत्न सुरू आहे.

See also  Annabhau Sathe अण्णाभाऊ साठे

या पुढील काळात अगदी एक गाव एक गणपती असेही होते. परंतु किंवा एक वॉर्ड एक गणपती तरी ही कल्पना रोज व्हावी यासाठी प्रयत्न केले. जातील ठाण्यात दहा-बारा दिवसांपूर्वी नौपाडा भागातील सरस्वती सेकंडरी शाळेच्या विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनामुळे तलावांमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणावर क प्रोजेक्ट केला होता. त्यांनी तलावातील पाण्याचे विसर्जन आधीचे आणि नंतरचे नमुने घेतले. या अभ्यासानंतर त्यांनी तयार केलेल्या या प्रोजेक्टचे अनेक पर्यावरण प्रेमींना जलप्रदूषणाच्या वास्तवाची जाणीव झाली. त्यांना जिज्ञासा पर्यावरण दक्षता मंचच्या आणि हरियाली सारख्या स्वयंसेवी संस्थांनी उत्सवाच्या नावाखाली होणार्‍या प्रदूषणा विरोधात लढा सुरू केला.

तसेच गणपती उत्सवांचा मुद्दा सर्व सामान्याच्या धार्मिक भावनांशी निगडित असल्याने आधी या संस्थांच्या कार्यकर्त्यांनी पूर्वी गणपतीची मूर्ती शाडूची का केली जात असे आणि या मूर्तीचे विसर्जन का व नेमक्या कोणत्या पद्धतीने करावे याची माहिती घेतली. गणेशोत्सव हा एकच असा आहे, की ज्यामध्ये मातीच्या मूर्तीची पूजा होते. त्यामुळे मूर्ती चिकन मातीची असावी. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची नाही मूर्ती फार दिवस टिकू शकत नाही. म्हणून ती दीड दिवसांनी वाहत्या पाण्यात विसर्जित करावी. त्यामुळे माती त्याच निसर्गात पुन्हा एकजीव होईल अशी त्यामागची कल्पना असावी. असे या स्वयंसेवी संस्थांनी घेतलेल्या माहितीनंतर ठळकपणे अधोरेखित झाले आहे. तसेच मोठी मूर्ती का असावी, या शास्त्रात काहीच आधार नाही. हे देखील सिद्ध झाले आहे. मोठी याला कोणताही आधार नाही.

हे पण वाचा : प्यारी खबर

गणपती विसर्जन कसे करावे?

या संस्थांनी सर्वात आधी कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याची कल्पना मांडली होती. दहा वर्षांपूर्वी पहिल्यांदा जेव्हा कृत्रिम तलावाचे काम सुरू झाले. तेव्हा ते राजकारण्यांकडून बंद करण्यात आले. त्या वर्षी प्रचंड विरोधामुळे या तलावांमध्ये विसर्जित झालेल्या गणेश मूर्तींची संख्या जेमतेम दुहेरी आकडा गाठू शकले. सलग तीन वर्ष हे कार्यकर्ते या कृतीने तलावाजवळ उभे राहून त्याचे महत्त्व पटवून देत होते. पण त्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा लागत होता.

See also  Crop Loan List | कर्जमाफी योजनेच्या पात्र शेतकऱ्यांच्या नवीन याद्या जाहीर,गावानुसार याद्या पहा

अखेर चौथ्या वर्षापासून मात्र या प्रयत्नांना यश आले आणि ही संख्या एकदम हजारोच्या घरात पोहोचणे अर्थात या क्रांतीमध्ये ही विद्यार्थ्यांचा मोठा वाटा होता. कारण विसर्जनाच्या मिरवणुकीत असंख्य भक्तांच्या डोळ्यातील अश्रू या युवकांनी पाहिजे असे मद्यपान करून मिरवणुकीत बेभान नाचणारे श्रद्धा व अंधश्रद्धा खेड समोरच होत असताना विसर्जनासाठी आकारणी लहान मूर्ती सोयीची कशी ठरते. हे त्यांच्या लक्षात आले व त्यांच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला. हाच उत्सवाचे स्वरूप बदलले टर्निंग पॉइंट ठरले आहे. स्वयंसेवी संस्थांनी एखादी समाजाच्या हिताची कल्पना मांडून त्याला जागृत करण्याचा प्रतिसाद दिलेला आहे.

काय करावे ज्यामुळे Echo-Friendly Ganpati Utsav साजरा होईल ?

पुढच्या काळात सार्वजनिक गणेशोत्सव इको-फ्रेंडली Echo-Friendly Ganpati Utsav पद्धतीने साजरे व्हावेत. या दृष्टीने प्रयत्न केले जातील, कारण अनेक जण जे आपला घरगुती गणेशोत्सव साधेपणाने व पर्यावरणाला पूरक अशा रीतीने साजरा करतात. ते सार्वजनिक उत्सवात मात्र पर्यावरणाची हानी होऊ देत नाहीत. डीजे, ढोल पथकांचा कर्कश आवाज नसला तर उत्सव साजरा होत नाही.

या भ्रामक समजुतीतून या मंडळांना बाहेर आणावे लागेल. एक वॉर्ड एक गणपती ही कल्पना रुजवली तर लोकांना दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमही पाहता येतील. विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन त्यामध्ये गणेशोत्सव किंवा नवरात्री सारखा उत्सव पार पाडू शकतो. म्हणून इकोफ्रेंडली पद्धतीने हे उत्सव साजरे होऊ लागले तर त्याच्यापासून निसर्गाला होणारा तोटा किंवा निसर्गावर होणारा परिणाम हा कमी प्रमाणात होईल.

“तुम्हाला आमची Echo-Friendly Ganpati Utsav माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की कळवा.”

Leave a Comment