नमस्कार मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची बातमी. शेती म्हटलं म्हणजे कष्ट हे आलेच. शेती करताना आपल्या शेतकरी बांधवांना त्रास होतो व हा त्रास कमी करण्यासाठी नवीन नवीन यंत्र निघत आहेत. अशाच एका यंत्राबद्दल आज आपण पाहणार आहोत यंत्राचे काम हे ऊस तोडणी साठी होते. हे यंत्र ऊस तोडण्यासाठी खूप कामात येते . या यंत्राचा काढण्या मागचा उद्देश म्हणजे ऊस कापताना जो मजूर वर्ग असतो त्यांना खूप त्रास होतो.
त्यामुळे याचा आता खूप वापर होत आहे आणि मजूर वर्गाला ऊस तोडण्यासाठी हा वेळ लागतो हे यंत्र झटपट ऊस तोडते . त्यामुळे या यंत्राला खूप मागणी आहे . मित्रांनो आनंदाची बातमी म्हणजे अशी की आता सरकारकडून कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या अंतर्गत या यंत्र साठी अनुदान दिल्या जाणार आहेत असा निर्णय शासनाकडून आला आहे. मित्रांनो हे यंत्र घेण्यासाठी आता शेतकरी मित्रांना 60,000 रुपये असे अनुदान दिले जाणार आहे .
याला केन हार्वेस्टर असेही म्हटले जाते आता हे घेण्यासाठी सरकारकडून 60, 000 पर्यंत अनुदान देणार आहे . मित्रांनो या यंत्राच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावर काम होते मित्रांनो हे यंत्र एका दिवसामध्ये 30 एकर पर्यंत उसाचे तोडणी करू शकते व शेतकरी बांधवाला नफा करून देऊ शकते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाइन अर्ज करावा लागेल हा केल्यावरच आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
मित्रांनो योजनेसाठी काही अटी आहेत चला तर पुढे पाहूया .
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अत्यंत गरजेचे आहे.
जे मित्र या योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत त्यांना कमीत कमी 20 टक्के रक्कम ही गुंतवावी लागणार आहे बाकी ते कर्ज घेऊन भरू शकतील.
मित्रांनो अर्ज भरताना अनुसूचित जाती जमाती यांना जात प्रमाणपत्र हे सादर करावे लागणार आहे.
मित्रांनो या यंत्राने तुमच्या शेतीसाठी मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे आणि उसाची शेती हे खूप शेतकरी करतात त्यामुळे हे यंत्र त्यांच्या जवळ असणे गरजेचे आहे योजनेचा लाभ घ्या. धन्यवाद !