Swamitva Yojana in Marathi language | महाराष्ट्र स्वामित्व योजना मराठी

Swamitva Yojana in Marathi language.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजना सुरू केली. या योजनेचा लाभ ग्रामीण लोकांना होणार आहे. ही योजना दिनांक 24 एप्रिल 2021 पंचायतीराज दिनानिमित्त सुरू केली असून, सुरुवातीला ही योजना देशभरातील सहा राज्यात चाचणी तत्त्वावर सुरू केली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश ही सहा राज्ये आहे. ज्या गावातील लोकांना प्रॉपर्टी कार्ड मिळाली, ते आता त्यांच्या गावातील ई-प्रॉपर्टी कार्डच्या आधारे बँकांकडून कर्ज घेऊ शकतात. स्वामित्व योजनेअंतर्गत ई-प्रॉपर्टी कार्ड E-Property Card वितरण करण्यात आले. स्वामित्व योजना म्हणजे काय? त्याचे फायदे काय? ई-प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय? ई प्रॉपर्टी कार्ड नेमकं काय असतं किंवा ते कसं काढायचं याविषयीची माहिती

स्वामित्व योजना काय आहे हे जाणून घेऊया :
सरकारने ग्रामीणांच्या जमिनीची नोंद ठेवण्यासाठीच्या उद्देश्याने ही स्वामित्व योजना सुरू केली. या योजनेमार्फत ग्रामीणांना जमिनीच्या वादापासून मुक्तताच मिळणार नाही, तर त्यांना बँकेतून सहजपणे कर्ज देखील मिळू शकेल. सरकारकडे या जागेचे डिजीटल तपशील देखील ठेवता येऊ शकेल. स्वामित्व योजनेच्या माध्यमातून देशभरातील सगळ्या गावांचं ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या केलेल्या सर्वेक्षणाच्या द्वारे प्रत्येक गावातील घराचा नकाशा, व इतर प्रकारच्या मिळकत पत्रिका उपलब्ध करण्यात येणार आहेत. घराची मालकी आपलीच आहे व त्यावरील कायदेशीर अधिकार हा आपलाच आहे. त्या प्रॉपर्टीविषयी आपण काय करायचं याचा सर्वस्वी निर्णय हा तुमचा स्वतःचा राहणार आहे. यामध्ये सरकारला सुद्धा कुठल्याही प्रकारची दखल घेता येता येणार नाही.

E-Property card : ई प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?

या कार्डमध्ये गावात राहणाऱ्या लोकांची सर्व प्रकारची मालमत्ता, शेती, घर यांचा तपशील असेल.  यामुळे गावकऱ्यांना त्यांच्या निवासी जमिनीच्या मालमत्तेवर हक्क मिळू शकणार आहे.  कोणतीही व्यक्ती आपली मालमत्ता आर्थिक मालमत्ता म्हणून वापरू शकते. या कार्डद्वारे तुम्ही कर्जासाठी अर्ज देखील करू शकता.  यासोबतच याचा वापर अनेक प्रकारच्या आर्थिक फायद्यांसाठीही केला जाऊ शकतो.  जमिनीची कागदपत्रे नसल्यामुळे अनेकदा गावांमध्ये वाद होतात.  त्यामुळे असे वाद मिटण्यास मदत होईल.

See also  Pune Corporation Recruitment पुणे महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण 448 जागा

स्वामित्व योजनेचे फायदे/लाभ :

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील जलद विकासास मदत होईल कारण या योजनेंतर्गत गावातील मालमत्तांचे मॅपिंग आणि सीमांकन केले जात आहे.

या योजनेंतर्गत मालमत्ता कार्ड संबंधित मालकांना वितरित केले जातात, ज्यामुळे ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क मिळतो.

यामुळे ग्रामीण भागातील मालमत्तेचे विवाद कमी होण्यास मदत होईल. यामुळे गावकरी सहजपणे बँक कर्ज घेण्यास सक्षम होतील.

हे खेड्यांमधील पायाभूत सुविधांच्या प्रभावी नियोजनासाठी सरकारला मदत करेल.

ड्रोन तंत्रज्ञान आणि सॅटेलाइट मॅपिंगचा वापर मालमत्तेच्या सीमांकनासाठी केला जात असल्याने, वैयक्तिक मालमत्तेच्या सीमा कोणत्याही त्रुटीशिवाय केल्या जातील.

या योजनेंतर्गत खेड्यांमध्ये जमीन मालकीची नोंदी तयार झाल्याने कर वसूल करण्यास, नवीन इमारतींची योजना तयार करण्यास आणि परवानग्या देण्यास मदत होईल.

प्रॉपर्टी कार्ड कसे मिळवायचे?

प्रॉपर्टी कार्डसाठी ऑनलाइन अर्ज होणार नाही.  राज्य सरकारे ते घरोघरी पोहोचवतील.  या योजनेंतर्गत सुमारे एक लाख जमीन-मालमत्ताधारकांना त्यांच्या मोबाईल फोनवर एसएमएसद्वारे मिळालेल्या लिंकवरून प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड करता येणार आहे.  ज्यांच्याकडे एसएमएसद्वारे लिंक नाही, त्यांना राज्य सरकार प्रॉपर्टी कार्ड घरी पाठवतील.

या अंतर्गत 6 राज्यांतील 763 गावांतील लोकांना लाभ मिळणार आहे.  यामध्ये उत्तर प्रदेशातील 346, हरियाणातील 221, महाराष्ट्रातील 100, मध्य प्रदेशातील 44, उत्तराखंडमधील 50 आणि कर्नाटकातील 2 गावांचा समावेश आहे.

ई प्रॉपर्टी संकेतस्थळ : (swamitva Yojana official website )
https://bhulekh.mahabhumi.gov.in/ या संकेतस्थळावर संबंधित वेबसाईट शोधावी. वरती उल्लेख केलेली वेबसाईट हे महसूल विभागाचे अधिकृत वेबसाईट आहे. या साईटवर गेल्यानंतर उजवीकडे तुम्हाला digitally signed सातबारा पाहण्यासाठी इथे क्लिक करा असा पर्याय दिसेल. या पेजच टायटल DOWNLOAD FACILITY FOR DIGITALLY SIGNED 7/12, 8A AND PROPERTY CARD अशा पद्धतीचं टायटल या पेजवर असेल.

अर्ज कसा करणार :

पंतप्रधान स्वामित्व 2020 या योजनेमध्ये अर्ज करणं खूप सोपं आहे. आपण या प्रक्रियेचे अनुसरणं करून सहजरीत्या अर्ज करू शकतात.

See also  घरकुल यादी 2022-23 | PMAYG Gramin Gharkul List Maharashtra 2022-23

सर्वप्रथम आपण पीएम स्वामित्व योजनेच्या अधिकृत संकेत स्थळांवर क्लिक करा.

संकेत स्थळांवर गेल्यावर त्यांचा होमपेज वर न्यू रजिस्ट्रेशन च्या पर्यायावर क्लिक करा.

या पर्यायावर क्लिक केल्यावर आपल्या समोर एक फॉर्म उघडेल. विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी आणि सबमिट बटण दाबा.

आता आपला फॉर्म यशस्वीरीत्या भरला गेला आहे. नोंदणी किंवा रजिस्ट्रेशन संबंधित माहिती आता आपल्या मोबाईल नंबर वर एसएमएस किंवा ई-मेलने मिळेल.

Maharashtra swamitva Yojana in Marathi language.’महाराष्ट्र स्वामित्व योजना मराठी’ ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा.

Categories Job

Leave a Comment