लहानपणापासून आपल्या म्हणी Marathi Mhani ऐकायला येतात मग शाळा असो, घर असो व चित्रपट असो या सर्वच ठिकाणी आपण नेहमी म्हणी वापरतो किंवा आपल्याला दुसऱ्यांच्या तोंडून त्या एकायला येतात म्हणून आपण या लेखात काही चांगल्या म्हणी पाहूयात.
दाम करी काम, बिवी करी सलाम
.
पैसे टाकले की कोणतेही काम सहजरीत्या होते.
दाखविलं सोनं हसे मुल तान्हं.
पैशाचे लालच दाखविताच अवघड कामे ही लगेच होतात.
दात आहेत तर चणे नाहीत, चणे आहेत तर दात नाहीत.
एक गोष्ट असली तरी तिच्या जोडीला पाहिजे ती गोष्ट नसणे.
दिल चंगा तो कथौटी में गंगा.
आपले मन साफ असल्यास पवित्र गंगा ही पवन होते.
दिव्याखाली अंधार
मोठ्या माणसातही दोष असतात .
दिल्ली तो बहुत दूर है.
भरपूर गोष्टी करने बाकी आहे कारन मंजिल खुप लांब आहे.
दिवस बुडाला मजूर उडाला.
रोजाने काम करणारा स्वतःचं समजून कधीच काम करणार नाहीं कामाची वेळ संपते तोच ते निघून जाणार.
देश तसा वेश
देशानुसार बदलणारे जीवन.
देव तारी त्याला कोण मारी
आपल्यावर देवाची कृपा असल्यास कोणीही आपले वाईट करू शकत नाही.
देखल्या देवा दंडवत
सहज दिसला म्हणून विचारणा करणे.
देणे कुसळांचे घेणे मुसळाचे
पैसे कमी आणि काम जास्त.
दैव देते आणि कर्म नेते.
Marathi Mhani
नशिबात असते पण स्वतःच्या कामामुळे तोटा होतो.
दैव नाही लल्लाटी, पाऊस पडतो शेताच्या काठी
जर नशिबात नसेलच तर तोंडासमोरिल घास सुद्धा दूर जातो.
दैव आले द्यायला अन् पदर नाही घ्यायला
नशिबात उसने पण पदरात पैन पाडून न घेता येणे
दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई.
आपल्या नशिबावर अवलंबून असणारे नेहमी उपाशी राहतात तर उद्योगी लोग पोटभर खातात.
दोन मांडवांचा वऱ्हाडी उपाशी
दोन्ही बाजूवर अवलंबून असणारे लोग उपाशी मरतात.
दृष्टीआड सृष्टी
आपल्या पाठीवर जे बोलतात त्याकडे दुर्लक्ष करावे.
धर्म करता कर्म उभे राहते.
एखादी चांगली गोष्ट करताना त्याबरोबर एखादी वाइट गोस्त होते .
धनगराची कुत्रे लेंड्यापाशी ना मेंढ्यापाशी.
हे लक्षण कोणत्याच कामचे नाहीं .
धार्याला बोळा व दरवाजा मोकळा
छोट्या गोष्टीची काळजी घेत असताना मोठी कडे दुर्लक्ष करणे.
धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांड्या
श्रीमंताचे काम लगेच होते तेर गरीबाला खेतरे घालयला लागतात.
नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने.
काम करणाऱ्यांच्या मार्गात अनेक अडचणी येणे.
नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये.
नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ कधीच पाहू नये कारण दोघातही दोष असतोच.
जीव जाणाऱ्या वेदनांपेक्षा भुकेच्या वेदना खुप त्रासदायक असतात.
अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
सोने चांदी खरेदी करण्याकरिता कर्ज करून ठेवायचे आणि जन्मभर फेडित बसायचे.
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
नुसतेच नाव मोठे पण काम लक्षण खोटे
अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था
अशक्यप्राय गोष्टींची परिकल्पना.
अती झाले अन आसू आले.
कही गोष्टींचा अतिलकरेक झाला की त्या त्रासदायक वाटतात.
Mhani in Marathi
अतिपरिचयात अवज्ञा
खुप निकटता झाल्यास अपमान होऊ शकतो.
अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
काम एकाचे आणि त्रास दंड मात्र दुसऱ्याला
अन्नाचा येते वास, कोरीचा घेते घास.
एखादे अन्न खुप आवडते पण त्याच्यात चूका काढ़ने
अपापाचा माल गपापा.
चुकीच्या मार्गाने मिळवलेले संपति लगेच नष्ट होते.
अर्थी दान महापुण्य.
एखाद्या गरजवंत माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते.
आईची माया अन् पोर जाईल वाया
खुप प्रेम लाड केल्याने मुले बिघडतात.
आपलेच दात आपलेच ओठ.
आपल्या जवळच्या माणसाने चूक केल्यावर आपलीच गोची होते.
आयत्या बिळावर नागोबा.
एकाने केले काम मात्र लाभ घेतला दुसऱ्याने.
आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
मागितली एक गोष्ट पण मिळाले भरपूर
मराठी म्हणी
आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला.
एखाद्या दोषाबद्दल दुसर्याला हसने पण तोच दोष आपल्या अंगी असणे.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास.
अगोदरच आळशी असणाऱ्या माणसांच्या बाबतीत अजुन आळशी अवस्था निर्माण होणे.
आंधळं दळतं कुत्रं पिठ खातं.
काम करावे एकाने दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा.
आंधळ्या बहिर्यांची गाठ.
एक काम करण्यासाठी दोन असमर्थ माणसांची भेट होने.
अगं अगं म्हशी, मला कुठे नेशी.
स्वतःच चूक करून ती दुसऱ्याच्या माथी मारून मोकळे होने.
अडली गाय फटके खाय.
अडचणीत सापडलेल्या माणसाला हैरान करने.
आपला हात जगन्नाथ.
आपल्या कर्तृत्वावर आपली प्रगति अवलंबून असते.
असेल त्या दिवशी दिवाळी नसेल त्यादिवशी शिमगा.
असेल तय दिवशी मजा करने नसेल तय दिवशी बोम्बलने.
अंगठा सुजला म्हणून डोंगराएवढा होईल का.
गोष्टींला ठराविक मर्यादा असतात.
अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप
अतिशय उतावळेपणाची लक्षण.
अती खाणे मसणात जाणे.
खुप खाणे नाशवंताचे लक्षण असते.
अठरा नखी खेटरे राखी, वीस नखी घर राखी.
मांजर घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते.
अवचित पडे, नि दंडवत घडे.
स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करणे.
अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे.
दोन विरुद्ध बाजु.
अंथरूण पाहून पाय पसरावे.
आपली ऐपत पाहून वागावे जगावे.
अंगापेक्षा बोंगा मोठा.
मूळ वस्तुपेक्षा इतर गोष्टींचा बडेजाव मोठा असणे.
आपला तो बाब्या दुसर्याचे ते कारटे.
आपले विचार हे दुसऱ्यापेक्षा श्रेष्ट कसे ही वृत्ति अंगी असणे.
आपली पाठ आपणास दिसत नाही.
स्वतःचे दोष स्वतःला दिसत नाहीत.
आजा मेला नातू झाला.
नुकसान झाल्यावेळी फायद्याची गोष्ट घडणे.
आत्याबाईला जर मिशा असत्या तर.
कोणत्याही कामत विचारांची भर टाकने.
आपल्याच पोळीवर तूप ओढणे.
स्वतःचाच स्वार्थ साधून घेणे.
आलिया भोगासी असावे सादर.
नशिबात आले ते स्वीकारणे.
आवळा देऊन कोहळा काढणे.
स्वार्थ साधण्यासाठी लहान वस्तू देऊन मोठी वस्तू मिळविणे.
आपण मेल्यावाचून स्वर्ग दिसत नाही.
अनुभव आल्याशिवाय शहाणपण येत नाही.
आपले नाक कापून दुसऱ्यास अपशकुन.
दुसऱ्याचा तोटा करण्यासाठी प्रथम स्वतःचे नुकसान करून घेणे.
आधीच तारे, त्यात गेले वारे.
विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे.
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती.
काम सोडून भलत्याच चौकशा करणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक.
Marathi Mhani मराठी म्हणी
गोष्टीची परीक्षा घेण्यासाठी वाट पाहणे.
उधारीची पोते, सव्वा हात रिते.
उधारीचा माल नेहमीच कमी भरतो.
उभारले राजवाडे तेथे आले मनकवडे.
श्रीमंती आली की, तिच्या मागोमाग चमचे ही येतातच.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
ताठ मानेने येणे आणि मान खली घालून जाणे.
उसाच्या पोटी कापूस.
सद्गुणी माणसाच्या पोटी दुर्गुणी लेकरू.
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खाऊ नये.
चांगल्या गोष्टीचा प्रमाणापेक्षा जास्त फायदा घेऊ नये.
एका माळेचे मणी.
सर्व लोक सारख्याच स्वभावाची असणे.
एका हाताने टाळी वाजत नाही.
कोणत्याही भांडणात दोष एकाचा नसतो.
एक ना धड भाराभर चिंध्या.
एकाच वेळी अनेक कामे केल्याने सर्व कामे अर्धवट होतात.
एकावे जनाचे करावे मनाचे.
जगाचे ऐकून घ्यावे पण मनाला जे योग्य वाटेल ते करावे.
एकाची जळते दाढी दुसरा त्यावर पेटवू पाहतो विडी.
एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपला स्वार्थ साधुन घेऊ नए.
एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये.
दुसऱ्याने केलेल्या वाइट गोष्टींचे समर्थन करून आपणही तीच गोष्ट करू नए.
एका पिसाने मोर होत नाही.
थोड्याश्या यशाने जास्त आंनदित हो नका.
एका खांबावर द्वारका.
एकाच मानसावर सर्व जबाबदाऱ्या देने.
एक कोल्हा सतरा ठिकाणी व्याला.
एका व्यक्तीपासून अनेक जगी अपमान होणे.
एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी.
बाहेर बडेजाव पण घरी दारिद्र्य.
एका मान्यात दोन तलवारी राहात नाहीत.
दोन तेजस्वी माणसे गुण्या-गोविंदाने राहू शकत नाहीत.
ऐंशी तेथे पंचाऐंशी.
उधळेपणाची कामे.
ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार
मोठ्या व्यक्तीला तेवढ्याच यातना होतात जेवढ्या की सामान्य व्यक्तीला.
ओळखीचा चोर जीवे न सोडली.
ओळखीचा शत्रू हा अनोळखी शत्रूपेक्षा घातक असतो.
शेंडी तुटो की तारंबी तुटो.
कोणत्याही परिस्थितीत कामाचा शेवट करने.
ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कोठे.
काम सोडून नुसत्या चौकशा करणे.
औटघटकेचे राज्य.
कमी काळ टिकणारी गोष्ट.
करावे तसे भरावे.
कृती असेल त्याप्रमाणे चांगले / वाईट फळ मिळते.
कर नाही त्याला डर कशाला.
ज्याने काही केलेच नाहीं त्याला भीति कशाची.
करीन ते पूर्व.
मी करेन तेच योग्य अशा विचाराने वागणे.
कणगीत दाणा तर भिल उताणा.
आपल्या गरजेपुरते आपल्या जवळ असले, कि लोक कोणाची फिकिर करत नाहीत.
कधी तुपाशी तर कधी उपाशी.
दररोज दिवस सारखा नसतो.
कशात-काय-अन-फाटक्यात-पाय.
वाईटात अजुन वाईट घडणे.
काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
रक्ताचे नाती बोलण्याने तुटत नाहीत.
काडीचोर तो माडीचोर.
एखाद्या छोट्या अपराधाबरोबर मोठ्या अपराधानची जोड लावणे.
काजव्याच्या उजळ त्याच्या अंगाभोवती.
गोष्टींचा प्रभाव स्वत: पुरताच राहने.
का ग बाई रोड तर म्हणे गावाची ओढ.
गरज नसलेल्या गोष्टींची काळजी करणे.
कानात बुगडी, गावात फुगडी.
आपल्या संपतीचे जोरा जोरा प्रदर्शन करने.
काल महिला आणि आज पितर झाला.
अतिशय लगबगीचे लक्षण.
काकडीची चोरी फाशीची शिक्षा
.
गुन्हा खूप लहान पण शिक्षा खूप मोठी असणे.
काडीची सत्ता आणि लाखाची मत्ता बरोबर होत नाही.
जे काम पैसाने होत नाही, ते अधिकाराने होते, संपत्तीपेक्षा सत्ता असणे महत्त्वाचे ठरते.
कावीळ झालेल्यास सर्व पिवळे दिसते.
एकाच नजरेच्या दृष्टीने सर्व जगाला बघणे.
काना मागुन आली आणि तिखट झाली.
एखाद्या गोष्टीत मागून येणे आणि श्रेष्ट होने.
कामापुरता मामा.
एखादे काम घेईपर्यंत गोड बोलणे.
कावळा बसला आणि फांदी तुटली.
योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे.
काखेत कळसा गावाला वळसा.
जवळची वास्तु शोधण्यासाठी दूर जाणे.
काप गेले नी भोके राहिली.
संपत्ति गेली अन फक्त आठवणी उरल्या.
कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.
शूद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.
काळ आला, पण वेळ आली नव्हती.
मरण समोर उभे असताना थोडक्यात बचावणे.
कांदा पडला पेवात, पिसा हिंडे गावात
एखादी गोष्टीचा चुकीच्या मार्गाने शोध घेण्याचा प्रयत्न करणे.
कुंभारणीच्या घरातला किडा कुंभारणीचा.
आपल्या वस्तूवर आपलाच हक्क प्रस्थापित करणे.
कुत्र्याची शेपूट नळीत घातले तरी वाकडे.
माणसाचा मूळ स्वभाव कधीच बदलत नाही.
कुडी तशी फोडी.
देहा प्रमाणे आहार, कर्तुत्वा प्रमाणे मिळणे.
कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ.
फक्त स्वार्थासाठी दुष्ट बुद्धीने शत्रूला मदत करून आपल्याच माणसाचा तोटा करणे.
केळीला नारळी अन घर चंद्रमौळी.
खुप दारिद्र्याची बिकट अवस्था येणे.
केस उपटल्याने का मढे हलके होते.
मोठ्या उपायांची जेथे गरज असते तेथे छोट्या उपायांनी काहीही फरक पडत नाही.
केळी खाता हरखले, हिशेब देता चरकले.
गोष्टीचा उपभोग घेताना मजा वाटते पण पैसे देताना जीव घालमेल होतो.
कोळसा उगळावा तितका काळाच.
वाईट गोष्टीबाबत जितकी जास्त चर्चा करावी तितकीच ती अधिक वाईट होते.
कोल्हा काकडीला राजी.
लहान लहान गोष्टींनी खुश होतात.
कोणाच्या गाई म्हशी आणि कोणाला उठा बशी.
गुन्हा एकाचा शिक्षा दुसऱ्याला
कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे श्यामभट्टाची तट्टाणी.
महान गोष्टींची तुलना शुल्लक गोष्टींबरोबर करणे.
रिकामा माळी ढेकळ फोडी.
घरोघरी मॉडर्न पोरी
ओठापेक्षा लिपस्टीक जड
नाकापेक्षा चष्मा जड
अपुर्या कपडयाला फॅशनचा आधार
बायकोची धाव माहेरापर्यंत
गोष्ट एक चित्रपट अनेक
काम कमी फाईली फार
लाच घे पण जाच आवर
मंत्र्याच पोर गावाला घोर
मरावे परी मूर्तिरुपे उरावे
नटीच्या लग्नाला सतरा नवरे
मिळवत्या मुलीला मागणी फार
रिकामी मुलगी शृंगार करी
प्रेमात पडला हुंडयास मुकला
दुरुन पाहुणे साजरे
ऑफीसात प्यून शहाणा
सत्ता नको पण खैरनार आवर
एक ना धड भाराभर पक्ष
हरावे परी डिपॉझिटरुपी उरावे.
थेंबे थेंबे लोकसंख्या वाढे
तोंडाला पदर गावाला गजर
कष्टानं कमावलं बाटलीनं गमावलं
रात्र थोडी डास फार
शिर सलामत तो रोज हजामत
नेता छोठा कटआऊट मोठा
चिल्लरपुरता सत्यनारायण
डीग्री लहान वशिला महान
वरील म्हणी कशा वाटल्या ते आम्हाला नक्की comment करून सांगा व आपल्या जवळच्यांना नक्की
मग मित्रांनो कशा वाटल्या marathi mhani आम्हाला नक्की comment करून सांगा