Marathi Jokes मराठी जोक्स
दुकानदार: आमच्या टूथपेस्ट मध्ये तुलसी, कापूर, निलगिरी, लवंग आहे..
बंड्या: नक्की काय करायचं आहे ब्रश करायचं का तोंडात यज्ञ करायचांय….
गरेट, मुलीचे नंबर निघाले…
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे
सगळे?
बंडू रडत रडत
पप्पा हि प्यांट
माझी नाही तुमची आ
दोन जिवलग मैत्रिणी
गप्पा मारत होत्या…..
पहिली: अग तुला सांगू , काल भलतीच गडबड होता होता वाचली
दुसरी: का ग काय झालं ?
पहिली: अग मी देवळात गेले होते.
दुसरी: बरं मग
पहिली: मी देवापाशी मागणार होते कि यांचे सगळे त्रास कष्ट काढून घे म्हणून..
दुसरी: मग त्यात काय
पहिली: पटकन लक्षात आलं आणि थांबले
म्हटलं देव मलाच उचलायचा..
बायको तिच्या मैत्रिणीला : काल दिवसभर नेट चालत नव्हते….
मैत्रिण : मग काय केले?
बायको : काही नाही , नवर्याबरोबर गप्पा मारत होते,
बरा वाटला गं स्वभावाने
चिंटू : अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?
गंपू: ब्रेक फेल झालाय. काही अपघात व्हायच्या आत घरी पोहोचूया एकदाचं!
आई: कोणाचा फोन होता रे?
मी: मित्राचा होता आई
आई: लाज वाटते का जरा तरी,
इतकं वय झालं तरी अजुन एक मुलगी पटली नाही तुला
लयच कि बेक्कार वाटलं राव
2019 मधील सर्वात मोठा प्रश्न..
सोनु पोरग आहे की पोरगी?
संतूर साबणाच्या ऍडमध्ये लहान मुलीची मम्मी दाखवतात
पण पप्पा कधी नाही दाखवत?
का? ते निरमा लावतात का?
जोपर्यंत आयुष्य आहे, तोपर्यंत रोज डी पी बदला….
नंतर तर एकाच फोटोमध्ये लटकुन रहायचे आहे…
लक्षात ठेवा, चार-चौघात
जेव्हा इतरांच्या माना खाली असताना तुम्ही एकटेच मान वर करून बसला असाल तर याचा अर्थ असा होत नाही कि तुम्ही निर्भय, निडर
आणि आत्मविश्वासू आहात. याचा अर्थ एवढाच होतो की, तुमचा नेट पँक संपलाय..
गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या
डब्यात चपाती बुडवून खात होते…
मराठीचे शिक्षक म्हणाले सर डब्यात
तर काहीच नाही…
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला ‘एक्स’
मानल आहे..!
गुरूजी : एक बाई एका तासांत 50 पोळ्या बनवत असेल, तर
तीन बायका एका तासांत
किती पोळ्या बनवतील ?
बंड्या : एकही नाही.
कारण, ती एकटी आहे म्हणूनच तर काम करते.
तिघीजणी मिळून फक्त गप्पा मारतील.
लेटेस्ट पुणेरी किस्सा
जोशी : मी इथले टाॅयलेट वापरु का ?
नेने : हो, पण पैसे पडतील…
जोशी : नाही पडणार…. बसताना काळजी घेईन….
500 व 100 च्या नोटा बंद झाल्यानंतर …
ज्या बायकांनी आपल्या नवर्याचे पैसे लपून चोरले होते (घरखर्चासाठी)
ब्लॅक मनी वाल्या पेक्षा त्यांनाच जास्त काळजी लागलीये
पप्पूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरु झाला. एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो. तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस ?
पप्पूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं.
बायको: माझी एकअट आहे!
नवरा : काय?
बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आले तरच्च मी माहेरी जाणार.
नवरा: माझी पण एक अट आहे?
बायको: काय?
नवरा: मी घ्यायला आलो तरच परत यायचे?
पुणेकर आपल्या मुलाला खुप मारत होता.
शेजारी : का मारता आहात मुलाला ?
पुणेकर : अहो ह्याला जीना एक पायरी सोडून चढ़ म्हणजे चप्पल कमी झिजते असे सांगितले होते,
हा गाढव दोन पाय-या सोडून चढला…..
शेजारी : अहो मग मारता कश्यासाठी ? चप्पल आजून कमी झिजेल ना…
पुणेकर: अहो पण चड्डी फाटली ना त्या नादात….
चिंगी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?
झंप्या : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी : कितीजण होते धावायला. ?
झंप्या : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी….
तुम्हाला जेवढे वाटेल तेवढे Online shopping करा…
पण, एक दिवशी तुम्ही स्वतः माझ्या दूकानात चालत याल..
कारण, इंटरनेट वर ऑनलाईन केस कुणीच कापत नाही…
परिक्षेतील एक प्रश्न :
कोण कोणास म्हणाले?
तुम्हाला भेटुन आनंद झाला !
उत्तर :
आनंदची आई, आनंदच्या वडिलांना…
बंड्या: बाबा, मला गाडी घेऊन द्या.
वडील : देवानं दोन पाय कशाला
दिलेत..!
बंड्या : एक किक् मारायला,
न् एक गिअर बदलायला.
लय हानला….
शिक्षक : उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन
गण्या : ओके सर……पण जरा झणझणीत बनवा
बायकांची प्रार्थना….
हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा, धन, दौलत, यश सारं दे| माझ्यासाठी काही नको।
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते…
गुरूजी : पराकोटीच्या
विरोधाभासासाचं उदाहरण
सांगा बघू.
बंड्या: सर,पाकिस्तानच्या नेत्याचं
नाव शरीफ आहे.
परदेशी नवरे बायकोने केलेला स्वैपाक काट्याने खातात,
भारतीय….
मुकाट्याने.
शब्दाने शब्द वाढतो
व शाब्दिक वाद निर्माण होतात
शब्द मनावर खुप वाईट परिणाम करतात,
म्हणून शक्यतो
मारामारी करूनच प्रकरण मिटवावे..
मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले.”व्हाय आर यू लेट?”
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, “सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला.”
सर पुन्हा ओरडले, “टॉक इन इंग्लिश!”
हजरजबाबी मन्याने म्हटले,”सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट….
मुलगी रडत असते
मुलगा : काय झाल ? का रडतेस ?
मुलगी : मला परीक्षेत कमी मार्क्स मिळाले
मुलगा : हात्तीच्या एवढंच न! होत अस कधी कधी. किती मार्क्स मिळाले तुला?
मुलगी : 88
मुलगा : आयला…. या मार्कात दोन पोर पास झाली असती.
एकदा एक खोडकर मुलगा एका माणसाला फोन करतो…
माणूस : हेलो !!
मुलगा : उल्लो पुल्लो कुल्लो…
माणूस : कोण आहे बे ?
मुलगा : एक व्यक्ती..
माणूस : ते माहित आहे..नाव सांग..
मुलगा : मी एक खोडकर मुलगा आहे..
माणूस : तुझ्या तर……कुठे राहतोस तू ?
मुलगा : पृथ्वी वर..
माणूस : ते माहित आहे…फोन का केलास ?
मुलगा : तुला परेशान करायला..
माणूस : थांब साल्या..तुझ्या बापाला बोलाव..छक्क्याची औलाद !!
मुलगा : बाबा !! मी आहे, चम्प्या…
बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस
संता: याचे तीन फायदे आहेत.
1: सोबतच रिव्हिजन होऊन जाते
2: आपल्यावर नजर राहते..
3: आपल्याला अभ्यास करायला एक जन सोबती मिळतो ..
एकदा चम्प्या वर्तमानपत्रात अर्थविषयक बातम्या वाचत होता…
बातमी – Microsoft ने Yahoo Massenger ला $8.5 Billion ला विकत घेतले…
चम्प्या : ओ तेरी…….. एवढा खर्च का केला ??? Yahoo
Massenger फुकटात डाउनलोड करता येतं….!
पत्नीने नव-याला न सांगता नवीन सीम घेतले.
नव-याला सरप्राईज’ द्यावे, या हेतूने ती किचन मध्ये गेली.
तेथून नवीन नंबर वरून नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या स्वरात बोलली,
हाय डिअर, कसा आहेस..?
नवरा दबक्या आवाजात नंतर बोलतो, आमच येडं किचन मधे आहे…
बायकोने लाटण तुटेपर्यंत मारला
एका बाईला 10 मुलं असतात.
पत्रकार : अहो, या पहिल्या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, या दुस-या मुलाचं नाव काय?
बाई : मुन्नू.
पत्रकार : बरं, आणि या बाकिच्या मुलाचीं नाव काय आहेत?
बाई : सगळ्यांची नावं मुन्नू.
पत्रकार : अहो, मग तुम्ही त्यांना ओळखता कसं?
बाई : अहो, प्रत्येकाची आडनावं वेगवेगळी आहेत ना…
एकदा एक मुलगी खुप घाई घाई ने कुठेतरी चाललेली असते.
एक माणूस तीला विचारतो, “ए पोरि तुझं नाव काय? आणि तू कुठे चालली आहेस इतक्या घाईने? ” त्या मुलीला इतकी घाई असते की, ती या दोन्ही प्रश्नांची उत्तर एक शब्दात देते. तो शब्द कोणता?
उत्तर: शीला…
एक मुलगा असतो त्याचं नाव असतं ‘चड्ड्या’.
एके दिवशी तो शाळेत जातो आणि फक्त त्यानेच होमवर्क केलेला असतो.
मग टिचर म्हणते “चड्ड्या सोडून सगळ्यांनी उभे रहा”…..
बंडया रडत रडत घरी आला.
बाबांनी विचारले, “काय झाले बंडया?”
बंडया: मास्तरांनी मला मारलं.
बाबा: काहितरी आगावूगिरी केली असशील.
बंडया: नाही बाबा. मास्तरांनी प्रश्न विचारला की 3 लिंगे कोणती?
बाबा : मग तू काय म्हणालास?
बंडया : पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुसलिंग.
बाबा : बरोबर आहे. मग का मारलं?
बंडया : मास्तरांनी उदाहरण विचारले
बाबा : तु काय म्हणालास?
बंडया : तो फळा, ती शाळा आणि ते मास्तर…
एक गर्भारशी (प्रेगनंट) बाई पुरुष डॉक्टर कडे जाते.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
बाई (लाजून) : इश्य…!!, आठवा.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू? तुम्हीच आठवा….
गृहस्थ : काय रे, तुझी आई कशी आहे?
मुलगा : बरी आहे.
गृहस्थ : बहिण कशी आहे?
मुलगा : बरी आहे.
गृहस्थ : अच्छा, मग बाबा तर बरेच असतील?
मुलगा : नाही. बाबा एकच.
ब्रेकअप नंतर मुलाने केलेले ह्रुदयस्पर्शी वाक्य
“तु मला सोडुन गेलीस याच मला दुःख नाही…..
फक्त परत येउन माझी दुसरी सेट्टींग बिघडवालीस तर लय मार खाशील.”
एकदा टीना आणि काव्या बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
काव्या : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
रामभाऊ बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या… चला…
ऑफर फक्त मिक्सरची आहे….”
वडील : काय रे ! काल रात्री तू शेजार च्या
संगीताला काय म्हणाला ?
पक्या : कुठं काय म्हटलं ?
वडील : मग ती सकाळी सकाळी भांडायला का
आली ?
पकया : मला काय माहीत !
वडील: हे बघ . . खरं काय ते सांग , नाहीतर…
तुला…लय. . मारीन…..
पकया : आता बघा बाबा…
आपण सकाळी चहा पीत असताना
आपल्या घरी कोणी आले तर आपण काय
म्हणतो…
वडील : या चहा प्यायला….
पकया : दुपारी आपण जेवत असताना
आपल्या घरी कोणी आले तर आपण काय
म्हणतो….
वडील : या जेवायला…
पक्या : आता रात्री संगी आपल्या घरी आली
तेंव्हा मी झोपत होतो म्हणून मी तिला म्हटलं ये
झोपायला …
चम्प्या : तू उपाशीपोटी किती सफरचंदखाउ शकतेस..?
चिंगी : 6..
चम्प्या : चुक…फक्त 1
कारण 1 सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते..
चिंगी : मस्त सूपर जोक आहे हा..
मग ती चिंगी आपल्या मैत्रिणी ला हा जोक सांगायला जाते..
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाउ शकतेस..??
मयुरी : 9
चिंगी : तू 6 बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते…
बाबा: काल रात्री कुठे होतास?
मुलगा: मीत्रा च्या रुम वर ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा: रात्रीची ऊतरली नाही तुझी बेटा.
मुलगा: काय???
बाबा: तुला नौकरी लागुन चार वर्ष झाली बेवड्या….
जगामध्ये फक्त 2 फास्ट नेटवर्क आहेत..
एक इमेल आणि दुसरा फिमेल ..
एका मिनीटात ईकडची गोष्ट तीकडं
एक मुलगा हरवला ….
म्हणून घरच्यांनी WhatsApp वर त्याचा फोटो आणि मेसेज बनवून टाकला.
तो मुलगा लवकरच सापडला, WhatsApp चे त्यांनी शतश: आभार मानले.
पण आता तो मुलगा 6 महिने झाले शाळेत जाऊ शकत नाहीये कारण
रस्त्यात ज्याला तो मुलगा दिसतो तो त्याला घरी आणून सोडतो…
” तुम्हाला मराठी जोक्स marathi joks कसे वाटले, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”