Maharashtra Recruitment 2022 वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची मेगा भरती

Maharashtra Recruitment 2022 वर्षभरात 75 हजार शासकीय रिक्त पदांची मेगा भरती

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी मिळत आहे. सरकारने येत्या वर्षात तब्बल 75 हजार शासकीय रिक्त पदांची भरती करणार आहे.

राज्य शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये दोन लाख 193 जागा रिक्त आहेत. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील शंभर टक्के पदभरती करणार तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता 50 टक्के पदे भरण्यात येणार येणार याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिली. शासनाच्या 29 प्रमुख विभागामध्ये दोन लाख 193 जागा रिक्त असल्याचे लक्षवेधी विधान परिषदेत सादर करण्यात आले.

मंत्री देसाई म्हणाले देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात 75 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे.मागील दोन वर्षात भरती प्रक्रिया काही प्रमाणात मंदावली होती मात्र आता या प्रशासकीय विभागाने सुधारित आकृतीबंध अंतिम रित्या मंजूर केले आहेत अशा सुधारित आकृतिबंध आतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षातील पदे वगळता अन्य पदे 50 टक्के भरण्यात येणार आहेत, तर राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील 100% पदभरती करणार आहोत असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Maharashtra Recruitment 2022

राज्यातील गुह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती (police bharti)करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच विधानसभेत दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्यबळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन
लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एमपीएससीतर्फे(mpsc) आकृतीबंध अनुसार हे पद भरण्यात येतील तसेच जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणारे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के पदे भरण्यात येणार आहेत.भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील अराजपत्रित गट बआणि गट-क आणि गट ड संवर्गातील नामनिर्देशन याच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबत जिल्हा निवड समिती प्रादेशिक निवड समिती आणि राज्यस्तरीय निवड समिती स्थापन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

See also  Maharashtra Cabinet Decision पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हेक्‍टरी 13600 रुपये मदत जाहीर

मोफत शिलाई मशीन मिळवण्याची प्रक्रिया जाणून घेण्यासाठी, येथे क्लिक करा

Leave a Comment