Maharashtra Cabinet Decision पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हेक्‍टरी 13600 रुपये मदत जाहीर

Maharashtra Cabinet Decision पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय हेक्‍टरी 13600 रुपये मदत जाहीर

राज्यातील पूरग्रस्तांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत(Cabinet Decision) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत जाहीर करण्यात आली आहे.

त्यानुसार पूरग्रस्तांना आता हेक्‍टरी 13600 रुपये मदत मिळणार आहे. तसेच दोन हेक्टर हुन आता तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झालं होतं. ह्यामध्ये पंधरा लाख हेक्‍टर किंवा त्यापेक्षा जास्त नुसकान होऊ शकत किंबहुना आतापर्यंत आलेल्या पंधरा लाख हेक्‍टर शेतीच्या नुकसान च्या पार्श्वभुमीवर शिवसेना-भाजपा युतीने विशेष म्हणजे आतापर्यंत कधीही नुसकान भरपाई मिळाली नव्हती एवढी म्हणजे एनडीआरएफचे नियमाप्रमाणे जेवढे मदत दिली जाते त्यापेक्षा दुप्पट मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

त्याचबरोबर 2 हेक्टर मर्यादा वाढवून ती तीन हेक्टर करण्यात आले आहे त्यामुळे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे एन डी आर फ नियमानुसार 6800 रुपये होते त्यामध्ये दुप्पट म्हणजे 13 हजार 600 रुपये प्रति हेक्‍टर इतके मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.

See also  India Post भारतीय डाक विभागाचा 396 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा

Leave a Comment

x