E-Hakk Pranali E-Ferfar फुकटात करा आता ई-फेरफार

E-Hakk Pranali E-Ferfar फुकटात करा आता ई-फेरफार

महसूल प्रशासनातील कामाला गती यावी त्याचबरोबर काम अधिक पारदर्शक व्हावे यासाठी शासनाने “ई हक्क प्रणाली”E-Hakk Pranali विकसित केली आहे या प्रणाली अंतर्गत शासनाने आता शेतकऱ्यांना तलाठ्याकडे विविध नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाइन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना अनेक शेतीविषयक महसूल ची कामे करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो सातबारा काढण्यासाठी त्याला त्यांचे शहरातील कार्यालय गाठून वेळ व पैसा खर्च करावा लागतो.त्यामुळे शेतकऱ्यांचे या सर्व समस्यांमधून मुक्तता व्हावी यासाठी ई-हक्क प्रणाली E-Hakk Pranali विकसित करण्यात आली आहे.

या प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना आता घरबसल्या ई करार नोंदी,आपल्या सातबारावर बोजा चढविणे कमी करणे, वारस नोंद घेणे, मृताचे नाव कमी करणे, एकत्र कुटुंबाकरता नोंद कमी करणे, संगणीकृत सातबारा मधील चूक दुरुस्त करणे याबरोबरच फेरफार ची कामे आता घरबसल्या फुटात करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशांची बचत होणार आहे.

डिजिटल इंडिया Digital India अभियानाअंतर्गत महसूल विभागाच्या अनेक सेवा ऑनलाईन झाले आहे त्यामुळे कुठलेही शुल्क न आकारता शेतकऱ्यांना ई-हक्क E-Hakk प्रणाली अंतर्गत अर्ज करून तलाठ्यांना फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचा तलाठ्याची कामे सोपे झाले आहे.त्याचबरोबर शेतकऱ्यांचा वेळ व पैशाची बचत होणार आहे.

ई-फेरफार E_Ferfar कसा करणार?

राज्य सरकारच्या डिजिटल सातबारा या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे या माध्यमातून आपल्याला सुविधा मिळेल. आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलवर अर्ज क्रमांक व पोच मिळणार आहे. पडताळणी झाल्यावर फेरफार चे काम ऑनलाईन online होईल. संबंधिताने आपला ऑनलाइन भरलेला अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी त्या-त्या विभागातील तलाठी करतील त्यानंतर फेरफार मंजूर करण्याची कारवाई पंधरा दिवसात करणे अपेक्षित आहे. त्रुटी असल्यस अर्ज परत पाठविला जाणार आहे ई फेरफारसाठी आता शेतकऱ्यांना कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण ऑनलाईन अर्ज स्वीकारून ऑनलाईन काम करण्याच्या सूचना तलाठ्यांना दिले आहेत.

See also  Best Tree Essay In Marathi - झाडाची आत्मकथा निबंध 2021

Leave a Comment