Aapleabhilekh Mahabhumi 1880 साल पासुन चे जमिनीचे जुने कागदपत्रे पहा मोबाईल वर

Aapleabhilekh Mahabhumi 1880 साल पासुन चे जमिनीचे जुने कागदपत्रे पहा मोबाईल वर

शेतकरी मित्रांनो जर आपल्याला आपल्या जमिनीचे जुने रेकॉर्ड पाहिजे असेल किंवा दुसऱ्याच्या जमिनीचे रेकॉर्ड आपल्याला बघायचे असेल तेही 1880 सालापासून चे तर ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

जमिनीचे जुने रेकॉर्ड(Land Record) किंवा कागदपत्रे(documents) आपल्याला सहजासहजी पाहायला मिळत नाहीत किंवा ते रेकॉर्ड आपल्याला सापडत नाही. अधिकारी ते दाखवत नाहीत आणि त्यामुळे आपले फक्त सरकारी कार्यालयांमध्ये हेलपाटे होतात.

त्यामुळे आता सरकारने ऑनलाईन पद्धतीने 1880 साल पासून चे जमिनीचे रेकॉर्ड आपणास ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहे ते आपल्याला आपल्या मोबाईलवर किंवा कम्प्युटरवर बघता येईल डाउनलोड सुद्धा करता येतील आता तुम्हाला कागदपत्रे बघण्याकरता भूमिअभिलेख कार्यालयात किंवा तहसील मध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही ते ऑनलाइन बघू शकता

प्रथम आपण http://aapleabhilekh.mahabhumi.gov.in/erecords/Login किंवा https://115.124.110.74/records ह्या लिंक ला क्लिक करून डायरेक्ट पेज वर जाऊ शकता आपण जर नवीन असाल तर आपल्याला सर्वप्रथम आपणास युजर आयडी आणि पासवर्ड तसे कॅपचा विचारला जातो परंतु आपण जर या अगोदर रजिस्ट्रेशन ह्या वेबसाईट वर केले नसेल तर आपणास रजिस्ट्रेशन या वर क्लिक करायचे आहे रजिस्ट्रेशन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन चा फॉर्म दिसेल त्या मध्ये आपले स्वतःचे वैयक्तिक माहिती भरायची आहे रजिस्ट्रेशन सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड तयार करायचा आहे तयार केलेले लॉग इन आयडी पासवर्ड वापरून तुम्हाला आपल्या लिंक वर क्लिक करावे लागेल त्यानंतर तुम्ही लॉगीन होऊ शकाल आता तुम्हाला जे पाहिजे असेल ते पेज उघडले जाते. आता तुम्हाला जे पहिले पेज उघडले होते ते पुन्हा उघडावे लागेल आणि लॉग इन आयडी ठिकाणी आपण तयार केले लोगिन आयडी आहे तो त्यानंतर एक कॅपच्या कोड दिसेल पाच अंकी तो खाली टाकायचा आणि लॉगिन वर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला बेसिक सर्च यामध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचे गाव घ्यावा आणि तुम्हाला कोणते डॉक्युमेंट पाहिजे ते भरायचे आहे त्यानंतर गट नंबर असेल सर्वे नंबर असेल किंवा फेरफार नंबर असेल तो टाकायचा आहे search बटणावर क्लिक करायचे आहे सर्व भरल्यानंतर सर्च रिझल्ट तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये कोणत्या वर्षी चे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट पाहिजे आहे ते add to card करायचे आहे म्हणजे डाऊनलोड साठी आपण ते निवडाल त्यानंतर आपल्याला माय कार्डच्या खाली continue ऑप्शन दिसेल त्यानंतर एक मेसेज दिसेल ज्या मध्ये लिहिलेले आहे की जर ऑनलाइन डॉक्यूमेंट असेल तर तुम्हाला ते डाऊनलोड करता येईल अन्यथा तुम्हाला सरकारी कार्यालयामध्ये जाऊन मिळेल त्यानंतर डाउनलोड अवेलेबल फाईल हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे जर फाईल डाउनलोड झाल्यानंतर जी फाईल झिप मध्ये आली असेल तर अनजीप करायचे आहे त्यानंतर तुम्ही पीडीएफ स्वरूपात आपले कागदपत्रे पाहू शकता म्हणजेच जुना फेरफार कशा प्रकारचा होता त्यावर काय नोंदी आहे ते तुम्हाला सहज पाहू शकाल.

See also  Harihar Fort हरिहर किल्ला

Leave a Comment