आधार कार्ड अपडेट 2021 – Aadhar Card Information In Marathi

ओळखपत्र दाखवायचे असेल किंवा पुरावा म्हणून वापरायचा असेल तर जर तुमच्याकडे आधार कार्ड ( Aadhar Card Information In Marathi ) असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुम्ही सहज हि कामे करू शकता. परंतु सर्वात जास्त त्रास लोकांना आधार कार्डच्या डेटा ( Aadhar Card Information In Marathi ) पासूनच होतो. तसे पाहता लोकांना आधीच सरकारी कामात चुका होतील याची अपेक्षा असते आणि त्या नंतर सुधारव्या लागतील.

आधार कार्ड विषयी माहिती – Aadhar Card Information In Marathi

परंतु अनेकदा पत्ता बदलणे, मोबाईल नंबर बदलणे आणि लग्नानंतर नाव बदलताना त्रास होतोच. पण महत्वाची बाब अशी कि अनेक गोष्टी तुम्ही घर बसल्या बदलू शकता. आधार कार्ड मध्ये आधी मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आता काढून टाकण्यात आला आहे. जर तुमच्या आधार कार्ड ( Aadhar Card Information In Marathi ) मध्ये मोबाईल नंबर जोडलेला नसेल किंवा तुम्ही आपला मोबाईल नंबर बदलू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्र वरच जावे लागेल.

ऑनलाइन हि सुविधा उपलब्ध नाही. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.मोबाईल नंबर अपडेट होण्यास 90 दिवसांचा वेळ लागू शकतो. तुमच्या आधार कार्ड मध्ये तुम्ही एड्रेस ऑनलाइन अपडेट करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. पण एड्रेस अपडेट करण्यासाठी तुमच्या आधार नंबर सोबत मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मग अपडेट होऊ शकणर नाही.

आधार कार्ड अपडेट 2021 - Aadhar Card Information In Marathi

एड्रेस अपडेट करण्यासाठी खालील गोष्टी करा

1. सर्वात आधी आधार सेल्फ सर्विस पोर्टल वर जा

2. तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील परंतु पत्ता बदलण्यासाठी अपडेट एड्रेस वर क्लिक करा.

3. असे करताच एक नवीन विंडो उघडेल. तुम्ही https://ssup.uidai.gov.in/web/guest/aadhaar-home ने थेट एड्रेस अपडेट वर जाऊ शकता.

4. तिथे खाली तुम्हाला एड्रेस अपडेटचा पर्याय मिळेल. तो क्लिक करा. तिथून नवीन विंडो उघडेल आणि सर्वात आधी 12 डिजिट वाला आधार नंबर टाकावा लागेल.

नक्की वाचा –विश्वासनीय प्राणी कुत्रा – Dog Information In Marathi 2021

5. त्याखाली कॅपचा येईल तो टाकून सेंट ओटीपी ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोन वर एक ओटीपी येईल.

6. ओटीपी टाकताच तुम्ही एड्रेस सुधार पोर्टल वर पोहचाल. तिथे तुमच्या समोर दोन पर्याय असतील. पहिला एड्रेस अपडेट करण्यासाठी आणि दुसरा एड्रेस वॅलिडेशन लेटर साठी तुम्हाला पहिल्या पर्याय वर क्लिक करायची आहे आणि खाली सबमिट करायचे आहे.

See also  Ukhane उखाणे

7. असे करताच नवीन एड्रेस टाकण्याचा पर्याय तुमच्या समोर येईल. तुमची संपूर्ण माहिती सविस्तर भरा. नंतर पडताळणी करून सबमिट करा.

8. त्यानंतर तुम्हाला कोणता डाक्यूमेंट तुम्ही एड्रेस प्रूफ मध्ये देणार आहात ते निवडावे लागेल. जसे कि- पासपोर्ट, वोटर कार्ड आणि राशन कार्ड इत्यादी. निवड केल्यानंतर तुमचा डॉक्यूमेंट सबमिट करा.

9. सबमिट करताच तुमच्या समोर ऑप्शन येईल कि बीपीओ सर्विस प्रोवाइडर डाक्यूमेंटची तपासणी करेल आणि तिथे पण तुम्हाला सबमिट करायचे आहे. असे करताच प्रक्रिया पूर्ण होईल.

10. आता तुम्हाला एक यूआरएन नंबर दिला जाईल. हा यूआरएन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्याने तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकाल आणि एड्रेस अपडेट बघू शकला.

आधार कार्ड मध्ये तुम्ही फक्त एड्रेस अपडेट करू शकता आणि एड्रेस वॅलिडेशन लेटर अपडेट करू शकता. याव्यतिरिक्त काही नाही.

आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी सहित इतर गोष्टी स्वतःहून अपडेट करू शकत नाही.

सध्या काही बँकांमध्ये आधार लिंक करणे हा ऐच्छिक आहे. परंतू बँकेत गेल्यावर आधार कार्ड मागितले जाते. यामुळे हे लिंक केल्यास व्यवहार करणे काहीसे सोपे जाणार आहे. केवायसीच्या समस्येत पैशांविना तुमचे महत्वाचे काम अडून राहणार नाही.

जर तुमच्या खात्याला नेट बँकिंगची सुविधा असेल तर काही स्टेप्समध्ये आधार लिंक करता येणार आहे. यासाठी नेट बँकिंग लॉगईन करावे लागेल. यानंतर आधार नंबर टाकून पुढे आलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल. यानंतर व्हेरिफाय झाले की तुमची आधार लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल.

बँक शाखेत जाऊन तुम्ही आधार कार्ड ( Aadhar Card Information In Marathi ) खात्याला लिंक करू शकता. येथे तुम्हाला एक अर्ज भरावा लागणार आहे. यामध्ये नाव, वय आणि जन्म तारीख, रजिस्टर मोबाईल नंबर, बँक अकाऊंट नंबर आणि आधार नंबरची माहिती द्यावी लागेल. मोबाईल अॅपद्वारे बँकेच्या मोबाईल अॅपवरून तुम्ही बँक अकाऊंट लिंक करू शकता. सध्या प्रत्येक बँकेचे अॅप उपलब्ध आहे.

steps 

  • स्टेप 1. यूआयडीएआयच्या वेबसाइटवर www.uidai.gov.in जावे लागेल.
  • स्टेप 2. यानंतर ‘Check Aadhaar/Bank Linking Status’ वर क्लिक करावे.
  • स्टेप 3. आता स्क्रीनवर एक पेज ओपन होईल. ज्यावर 12 आकडी आधार नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • स्टेप 4. आता तुम्हाला ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करावे लागेल. हा ओटीपी 10 मिनिटांसाठी वैध असेल.
  • स्टेप 5. रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाकून सबमिट क्लिक करावे. यानंतर तुम्हाला स्क्रीनवर लिंकिंग स्टेटस दिसणार आहे.
See also  पोस्ट ऑफिस च्या योजनेत दररोज 50 रुपयांची बचत करा आणि मिळवा 35 लाख रुपये Post Office Yojana

राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी सध्या आधार कार्ड गरजेचे आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे आता आधार कार्ड काढण्याची तात्पुरती केंद्रे मोठ्या प्रमाणात आढळून येत नाहीत. त्याऐवजी कायमस्वरुपी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. नवीन आधार कार्ड कसे काढायचे, आधार कार्डमध्ये बदल कसे करायचे त्याबद्दल जाणून घेऊया हेल्पलाइनद्वारे…

नक्की वाचा –सुंदर मराठी सुविचार 2021 – Sundar Marathi Suvichar

आधार कार्डसाठी ( Aadhar Card Information In Marathi ) नोंदणी पूर्ण मोफत आहे. अर्ज घेण्यापासून हातांचे ठसे, आयरिस नोंदविणे, फोटो काढणे यासारख्या कुठल्याही गोष्टीसाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही.

आधार कार्ड अपडेट 2021 - Aadhar Card Information In Marathi

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड काढण्यासाठी १८ प्रकारचे ओळखपत्राचे पुरावे व ३३ प्रकारचे पत्त्याचे पुरावे ग्राह्य धरले जातात. त्यात पॅन कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, गेल्या तीन महिन्यांचे वीज-पाणी-दूरध्वनी बिल यांचा समावेश आहे. ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील, तर गॅझेटेड ऑफिसर किंवा तहसीलदारांनी त्यांच्या लेटरहेडवर तुमचा फोटो लावून दिलेले प्रमाणपत्र ओळखपत्राचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाते.

खासदार/आमदार/गॅझेटेड अधिकारी/सरपंच/तहसीलदार किंवा तत्सम अधिकाऱ्याच्या लेटरहेडवरील नाव, पत्ता व फोटो लावलेले पत्र पत्त्याचा पुरावा म्हणून वैध आहे. कुटुंबातील प्रत्येकाला अशाप्रकारे स्वतंत्र कागदपत्रे मिळू शकली नाही, तर कुटुंबप्रमुखाने स्वतःच्या नावे अशी कागदपत्रे घ्यावी, स्वतःची नोंदणी करावी आणि नंतर कुटुंबातील इतर सदस्यांची नोंदणी करावी. कुठल्याही प्रकारचे कागदपत्र नसलेल्या व्यक्तीही नोंदणी केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीने आधार कार्डसाठी अर्ज सादर करू शकतात

नोंदणी प्रक्रिया

आधार कार्ड नोंदणीसाठी आवश्यक अर्ज पूर्ण भरून नोंदणी केंद्रावर पूर्वनिश्चित वेळी किंवा इतर वेळी जाऊन जमा करावा. हा अर्ज http://uidai.gov.in/ या वेबसाइटवर किंवा नोंदणी केंद्रावर मोफत उपलब्ध आहे. याचठिकाणी नोंदणी केंद्रांची यादीही मिळेल. सर्वसाधारणपणे ई-सेवा केंद्रात आधारची नोंदणी होऊ शकते. नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो, हाताचे ठसे, आयरिस यांची नोंद कम्प्युटरमध्ये करेल. तसेच तुमची माहितीही कम्प्युटरमध्ये नोंदविली जाईल. माहिती भरताना ती तपासून घ्या व आवश्यक दुरुस्त्या लगेच करून घ्या. सर्व अर्ज भरून झाल्यावर ही माहिती केंद्रीय सर्व्हरकडे पाठविली जाईल व त्याची पावती दिली जाईल. ही पावती सांभाळून ठेवणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण आयुष्यात आधार कार्डसाठी एकदाच नोंदणी करावी. वारंवार नोंदणी केली म्हणून नवीन कार्ड मिळणार नाही.

See also  Happy Diwali Wishes in Marathi-Diwali Wishes in Marathi 2021

नोंदणीस्थिती जाणून घेणे

तुमचा आधार क्रमांक तयार करण्यापूर्वी तुमचा डेटा देशभरातील नोंदणी केलेल्या नागरिकांच्या डेटासोबत तपासून पाहिला जातो. त्यात पुनरावृत्ती नसल्याची खात्री केली जाते. संपूर्ण तपासणी झाल्यावरच तुमचा आधार क्रमांक तयार होतो व आधारसाठी नोंदणी केल्यावर तुम्ही नोंदविलेल्या पत्त्यावर आधार कार्ड मोफत घरपोच पाठविले जाते. नाही आले तर साधारणतः महिनाभराने https://resident.uidai.net.in/check-aadhaar-status या वेबसाइटवर किंवा नोंदणी केंद्रावर जाऊन तुमचा नोंदणी क्रमांक, नोंदणीची वेळ व तारीख ही माहिती भरून तुम्हाला कार्डची सद्यस्थिती कळू शकेल. तसेच कार्ड तयार झाले असल्यास तुम्हाला आधार क्रमांक व ई-आधार कार्ड मिळते. समजा तुम्ही आधार कार्डसाठी दिलेल्या माहितीमध्ये काही त्रुटी असल्यास तुमचा अर्ज फेटाळला जाऊन तुम्हाला पुन्हा नोंदणी करण्याचे पत्र पाठविले जाते. त्यानंतर पुन्हा नोंदणी करावी.

माहिती अपडेट कशी कराल?

आधार कार्ड मिळाल्यानंतर काहींचे पत्ते बदलतात, मोबाइल क्रमांक बदलतात, लग्नानंतर नाव बदलते. अशा वेळी नव्याने आधार कार्ड काढण्याची गरज नाही. किंबहुना नव्याने काढण्याचा प्रयत्न केला तरी आधार कार्ड मिळणार नाही. त्याऐवजी जुन्या आधार कार्डमधील माहितीमध्ये सुधारणा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी https://resident.uidai.net.in/update-data या वेबसाइटला भेट द्या. त्याठिकाणी तुमचा आधार क्रमांक नमूद करा. त्यानंतर आधार नोंदणीच्या वेळी तुम्ही नोंदविलेल्या मोबाइलवर एक पासवर्ड पाठविला जाईल. तो पासवर्ड वेबसाइटवर नमूद करा. त्यानंतर कोणती माहिती बदलायची आहे ती निवडा.

नव्याने तुमची माहिती भरा व सोबत पुराव्यासाठी कागदपत्रे वेबसाइटवर अपलोड करा. वर दिलेल्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमच्या माहितीतील बदलाची स्थिती तपासून पाहू शकतात. वेबसाइटद्वारे अपडेट करायची इच्छा नसणाऱ्या व्यक्ती पोस्टाद्वारे अर्ज पाठवूनही माहितीमध्ये बदल करू शकतात. त्यासाठीचा अर्ज वर नमूद केलेल्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. हा अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह आधारच्या बेंगळुरू येथील पत्त्यावर पाठवून दिला तरी तुमच्या माहितीमध्ये बदल करता येतो.

आधार कार्ड अपडेट 2021 - Aadhar Card Information In Marathi

अधार कार्ड चा वापर बँक मध्ये होतो, शाळे मध्ये होतो, वहान विकत घेण्या साठी, मोबाईल विकत घेण्या साठी, सिम कार्ड विकत घेण्यासाठी, ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी, ड्रायव्हिंग लायसन साठी, जमिनी खरेदी विक्री करण्यासाठी, विवाह नोंदणीसाठी, गॅस कनेक्शन साठी, कोर्टकचेरीच्या कामासाठी, छोट्या-मोठ्या सर्व व्यवहारांसाठी आधार कार्डचा ( Aadhar Card Information In Marathi ) उपयोग होतो.

तुम्हाला जर Blogging In Marathi बद्दल अजून जाणून घायचे असेल तर Marathi Jeevan वेबसाईटला नक्की भेट द्या .

Categories Job

Leave a Comment