India Post भारतीय डाक विभागा चा 396 रुपयांमध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा
भारतीय डाक विभागाच्या(India Post) इंडिया पोस्ट पेमेंट बँक(India Post Payment Bank) मार्फत बजाज अलियांज(Bajaj Allianz)कॅशलेस दहा लाख रुपयाचा अपघाती विमा वार्षिक प्रीमियम 396 रुपये मध्ये काढण्यात येत आहे.
योजनेचा लाभ खालील प्रमाणे घेता येईल India Post Payment Bank
1 अपघातामध्ये मृत्यू झाल्यास वारसाला 10 लाख रुपये मिळतील.
2 तसेच अपघातामध्ये कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व आल्यास सुध्दा 10 लाख रुपये.
3 अपघातामुळे अंतर्गत रुग्ण दवाखाना खर्च रुपये 60 हजार रुपये.
4 अपघातामुळे बाहय रुग्ण दवाखाना खर्च कॅशलेस 30 हजार रुपये.
5 मुलांचा शिक्षण खर्च म्हणून एक लाख रुपयांची तरतूद करण्यात येत आहे हा लाभ जास्तीत जास्त दोन मुलांना प्रतिवर्ष घेता येईल.
6 आपण ऍडमिट असल्यास कुटुंबाला दवाखाना प्रवास खर्च रुपये 25 हजार रुपये देण्यात येतो.
7 अंत्यसंस्कारासाठी 5000 रुपये देण्यात येतील.
वयोमर्यादा आणि वार्षिक प्रीमियम (Age&Premium)
यामध्ये वयोगट 18 ते 65 वर्षापर्यंत देण्यात आलेला आहे वार्षिक प्रीमियम(premium) म्हणून 396 रुपये आपल्याला दहा लाख रुपयाचा अपघाती विमा मिळेल.
संपर्क
पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत(IPPB) खाते अनिवार्य आहे.अधिक माहितीसाठी आपले पोस्टमन पोस्ट मास्तर किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसची संपर्क करावा.