गणपतीपुळे – Ganpatipule In Marathi 2021
गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीचे मूर्ती स्वतः विराजित झालेली आहे, अशी मान्यता आहे. सह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्र ह्यामुळे हे देऊळ आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालने क्रमप्राप्त असते. 1किमी.
लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय आकर्षक दिसतो. या ठिकाणी समुद्र आणि वाळूचा किनारा असल्याने तेथे पर्यटकांची अतिशय गर्दी पहावयास मिळते. पर्यटक सुट्ट्यांमध्ये पुढच्या समुद्राला अवश्य भेट देतात. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ एसटी मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, आदी शहरांपासून गणपतीपुळे(Ganpatipule In Marathi) येथे जाण्यासाठी ते थेट बससेवा उपलब्ध आहे.
गणपतीपुळे (Ganpatipule In Marathi)मुख्यता भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते. हे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतीपुळेमध्ये(Ganpatipule In Marathi) मंदिर व्यतिरिक्त गणपतीपुळेमध्ये अनेक पर्यटनस्थळ आपल्याला दिसतात. गणपतीपुळेमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. गणपतीपुळे पासून सुमारे दोन किमी मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतांचे जन्मस्थान असून गावांमध्ये त्यांचे स्मारक आहे. जयगड किल्ला, प्राचीन कोकण संग्रहालय, आरे वारे समुद्र किनारा हे गणपतीपुळे (Ganpatipule In Marathi)जवळील इतर आकर्षणे आहेत.
गणपतीपुळे(Ganpatipule In Marathi) मध्ये राहण्यासाठी मोठ्या संख्येने रिसोर्स आणि हॉटेल आहेत. तसेच राज्य शासनाचे MTDC निवासस्थान सुद्धा जवळ उपलब्ध आहे.
मुंबईपासून 350 किमी अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळेचे (Ganpatipule In Marathi)गणेशस्थान पेशवेकालीन अतिप्राचीन आहे. या नंतर राजस्थानचा इतिहासात मुद्गल पुरानादी प्राचीन वांग्मयांत पश्चिम द्वार देवता या नावाने आहे. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत. हिंदुस्थानच्या आठ दिवसात आठ द्वारा देवता आहे. त्यापैकी गणपती पुण्यातील देवता ही पश्चिम द्वारदेवता आहे. मोगलाईच्या काळात सोळाशेच्या पूर्वी आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे.
नक्की वाचा – मालवण बीच विषयी माहिती – Malvan Beach 2021
त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवढ्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण राहत होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेवर संकट कोसळले. ते दृढनिश्चयी होते. आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन असा निश्चय करून त्यांनी आराध्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला. अन्नपाणी वर्ज्य करणाऱ्या भिडे यांना एके दिवशी दृष्टांत झाला की, मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी सागर येथून दोन गंडस्थळे वदंता युक्त स्वरूप धारण करून प्रगट झालो आहे.
माझे निराकार स्वरूप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजा, अर्चा करून तुझे संकट दूर होईल असा दृष्टांत झाला. याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती, म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसली की सध्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गाईच्या स्तनातून सतत दुधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला त्यांनी तात्काळ सर्व परिसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आणली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदीर उभारले. व सारी धार्मिक वृत्ती भिडे भटजींनी सुरू केली .
गणपतीपुळ्याला गणपती पुळे हे नाव कसे पडले याची ही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली की ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला गाव पश्चिम दिशेने उतरण बसून बराच सहभाग पूणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम विभागाचे मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे. त्या लगतचे गाव वस्तूं सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्रीमंत मंगलमूर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रात पुढे पुढे नेण्याचे भव्य मंदिरात मैदान आहे. त्यामुळे या गावाला गणपती पुढे असे म्हटले जाऊ लागले.
कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षण असलेले गणपतीपुळे(Ganpatipule In Marathi) हे छोटेसे सुंदर गांव महाराष्ट्राच्या रत्नागिरी जिल्ह्यात आहे. सुंदर समुद्र, चंदेरी वाळुच्या लांबच लांब किनारा, नारळी पोफळीची बने आणि सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चारशे वर्षांचे जुने स्वयंभू गणेश मंदिर ह्या गावची काही वैशिष्ट्ये आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या या छोट्याशा गावी मुंबई पुणे कोल्हापूर येथून जाण्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. समुद्राची शांत गाज मंद मंद वारा डोंगर उशाशी घेऊन बसलेले गणेश मंदिर चारही बाजूंनी हिरवाई असलेले हे गाव खास कोकणी खेडे आहे.
पर्यटकांच्या वर्दळीमुळे आता अनेक हॉटेल्स दुकाने झाली आणि कोकणी सौंदर्य अजून तरी कमी झालेले नाही. अरुंद रस्ते लाल माती वैशिष्टपूर्ण कौलारू घरे, स्वच्छ परिसर, नारळी, पोफळी, कोकम, केळी, आंबे फणस, जायफळाचे अशी विविध वृक्षसंपदा अंगावर लिहून गणपतीपुळे(Ganpatipule In Marathi) सजलेल आहे. हे भाविकांचे श्रद्धास्थान असलेले चारशे वर्षे जुने गणपती मंदिर प्रथम पाहायला हवे. स्वयंभू म्हणजे आपोआप गणपतीचा आकार घेतलेली येथील मूर्ती अशा प्रकारची एकमेव मूर्ती आहे गणपती म्हणजे गणांचा लष्कराचा देव आणि पुढे म्हणजे वाळूचा किनारा यावरून या गावाला असे नाव पडले आहे.
नक्की वाचा – Mahabaleshwar Information In Marathi महाबळेश्वर पर्यंटन स्थळ 2021
टेकडीच्या पायथ्याशी हे मंदिर असून मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. पश्चिम घाटाचा रक्षण करता म्हणून ही मूर्ती पश्चिमाभिमुख असल्याचे सांगितले जाते. या गणपतीला प्रदक्षिणा घालायचे म्हणजे संपूर्ण 1 किमी प्रदक्षिणा घालावी लागते आणि भाविक ती मोठ्या श्रद्धेने घालतातही. कोकणात असल्याने येथे हवा उष्ण आहे. तसाच पाऊसही खूप असतो. त्यामुळे येथे जाण्यासाही हिवाळा चांगला असतो.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सुंदर रेस्टहाऊस येथे आहे. अतिरिक्त अन्य काही हॉटेल्स आहेत. काही घरातूनही राहण्या जेवण्याची सोय होऊ पण शकते. मोदक, बिरड्याची उसळ, पोपटी, अमसुलाचे सार असा खास कोकणी मेनू एकदा तरी चाखायला हवाच. जेवणाची ऑर्डर देऊन गणपती दर्शन, समुद्रात खेळून येईपर्यंत जेवण तयार मिळते. सकाळी ब्रेकफास्टसाठीही खास कोळाचे पोहे, दडपे पोहे असा कोकणी मेनू असतो. मन अगदी तृप्त होऊन जातो.
कोकणात खरेदीला काही फारसा वाव नसतो. पण फणसाचे गरे, आंबा पोळी, काजू, जायफळे, वाल, पोहा, पापड,
मिरगुंडे ,अमसुले अशी खादडीची खरेदी मात्र मनसोक्त करता येते. तेव्हा ती करावी. खरेदी आटोपली की सायंकाळी समुद्रावर जाऊन शांतपणे सूर्यास्त पहावा. साऱ्या चिंता, मनात साठलेली कोळीष्टके मावळत्या सूर्याच्या साक्षीने समुद्रला अर्पण करावी आणि नव्या उमेदीने, नव्या आकांक्षांनी पुन्हा आपल्या कामाला लागावे. यासाठी अशा एकदोन दिवसांत करता येणाऱ्यांना सहली फार उपयुक्त ठरतात.
गणपतीपुळे येथे(Ganpatipule In Marathi) विजयादशमीच्या दिवशी सकाळी श्री भिडे खोत यांच्या समाधीची पूजा करुन भक्तजनांना 2100 बूंदी लाडूचा प्रसाद वाटला जातो. सर्व नगारे, सुर, सनई याची पूजा केली जाते. सायंकाळी सीमोल्लंघनासाठी पालखी बाहेर पाते. प्रदक्षिणा मार्गावर क्षमीच्या वृक्षाखाली पालखी थांबते. त्या ठिकाणी पूजा होवून सोने म्हणून क्षमीच्या झाडाची पाने लुटली जातात. मंदिरात येवून ती पाने गणपतीला अर्पण केली जातात व पालखी सोहळा पूर्ण होतो. तसेच कोजागिरी पोर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा अशुद्ध पंधरा ते कार्तिक शुद्ध पंधरा दररोज सकाळी आरतीच्या वेळी पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो.
येथे वसंत पूजा ही साजरी केली जाते. चैत्रशुद्ध एक ते वैशाख शुद्ध तीन म्हणजेच गुढीपाडव्याचे अक्षय तृतीया प्रत्येक संकष्टीला एका अशी वर्षातून 12 वेळा तसेच गुढीपाडवा दसरा दीपावली गणेश चतुर्थी माघ चतुर्थी या पाच दिवशी अशी वर्षातून सतरा वेळा गणपतींच्या पालखीची मिरवणूक काढली जाते.
ही पालखी मोठ्या उत्साहाने व आनंदाने टाळ-मृदुंगाच्या गजरात निघते.
अशाप्रकारे गणपतीपुळे हे (Ganpatipule In Marathi)एक आकर्षक पर्यटनस्थळ आहे. गणपतीपुळे येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ मध्ये एमटीडीसीचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय देवळातील भटजींच्या घरीसुद्धा राहण्याची सोय होऊ शकते. पर्यटनामुळे गणपतीपुळे हे पर्यटनाचे स्थळ झालेले आहे. दरवर्षी असंख्य पर्यटक येथे भेट देण्यासाठी व गणपती दर्शनासाठी येत असतात. तुम्हीही या स्थळाला नक्की भेट द्या व आनंद घ्या.
“तुम्हाला आमची माहिती गणपतीपुळे(Ganpatipule In Marathi) विषयी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.”