Punyashlok Ahilyadevi Holkar Ropvatika Anudan Yojana – शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या शेतीमधील भाजीपाला पिकांची लागवड करून उत्पन्न मिळवायचे असेल तर शासन आता तुम्हाला शेतीमध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी 2 लाख 30 हजार रुपयांचे अनुदान देणार आहे नवीन शासनाने चालू आर्थिक वर्षामध्ये मंजुरी दिली आहे या योजने करता कसा अर्धा करायचा किती अनुदान मिळेल ही सर्व माहिती या लेखामध्ये बघूया.
मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प 2021- 22 2022-23 मधील प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा दिनांक 27 ऑक्टोबर 2021 रोजी चा शासन निर्णय आहे.
योजनेचा उद्देश
या योजनेचा हास उद्देश आहे की भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड व रोगमुक्त रोपे निर्मित करून उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे, रोपवाटिकेमध्ये स्थानिक शेतकऱ्यांची शेती पूरक व्यवसायाची संधी उपलब्ध करून देणे, पीक रचनेत बदल घडून आणणे व नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे इत्यादी.
भाजीपाला रोपवाटिका स्थापन करण्यासाठी खालील मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे त्यामध्ये शेडनेट पोलीटनेल, पावर स्प्रेयर व प्लास्टिक क्रेट्स हे घटक आहेत यापैकी स्थानिक परिस्थितीनुसार पोलीटनेलची उभारणी करणे ठीक राहील. साधारणतः एक हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.
अर्ज कसा व कुठे करायचा?
प्रकल्पांतर्गत महाडीबीटी प्रणालीवर लाभार्थ्याच्या अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात यावी.
अर्जदाराकडे स्वतःच्या मालकीची किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे.
रोपवाटिका उभारणीसाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
लाभार्थी निवडीचे निकष
महिला कृषी पदवी/ पदविका धारक
शेतकरी महिला गट
भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट
सर्वसाधारण शेतकरी
याप्रमाणे प्राधान्यक्रम राहील.