आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येक क्विंटल 350 रुपये एवढ्या प्रमाणात अनुदान देण्याचं ठरवलं आहे मित्रांनो यासाठी अर्ज हे चालू झालेले आहे चला तर पुढे पाहूया अर्ज कधीपासून चालू होत आहे
मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज हे 3 एप्रिल 2023 पासून चालू झालेले आहे.
मित्रांनो यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 एप्रिल 2023 ही राहणार आहे या आधीच आपण अर्ज करून घ्यावे तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे.
जर शेतकऱ्यांनी याआधी कांदा विक्री केली असेल तर अशा शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 350 रुपये अनुदान मिळणार आहे .
चला तर पुढे पाहूया मित्रांनो अर्ज आपण कुठून करू शकतो.
मित्रांनो या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला अर्ज करावा लागेल अर्ज खालील ठिकाणी उपलब्ध असणार आहे.
खाजगी बाजार,
कृषी उत्पन्न बाजार समिती,
नाफेड खरेदी विक्री केंद्र,
थेट पणन परवानाधारक,
जिल्हा उपनिबंधक कार्यालय,
तालुका उप/सहाय्यक निबंध कार्यालय.