CLOSE AD

या दीड कोटी लाभार्थ्यांना राशन वरील धान्याचा लाभ मिळणार नाही , यादीत आपले नाव चेक करा

Ration Card Cancelled : मित्रांनो महाराष्ट्रातील रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील जवळपास दीड कोटी शिधापत्रिका धारकांचे रेशनवरील धान्य सध्या थांबवण्यात आले आहे. ही कारवाई थेट पुरवठा विभागाकडून करण्यात आली असून त्यामुळे अनेक कुटुंबांपुढे मोठी अडचण निर्माण झाली आहे.

घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा

ई-केवायसी का गरजेची आहे?

शासनाने रेशनकार्ड धारकांसाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली होती. यासाठी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र मोठ्या संख्येने लोकांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही. शासनाने याआधी सहा ते सात वेळा मुदतवाढ दिली होती, तरीही अनेकांनी ई-केवायसी केली नाही. परिणामी ज्या कुटुंबांनी केवायसी पूर्ण केली नाही, त्यांचे रेशनवरील धान्य आता बंद करण्यात आले आहे.

मोफत धान्य योजनेचा गैरवापर

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून केंद्र व राज्य सरकारकडून गरीब आणि गरजूंना दर महिन्याला मोफत धान्य दिले जाते. यामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना मोठा फायदा मिळतो. मात्र प्रत्यक्षात चांगले उत्पन्न असूनही अनेक लोक या योजनेचा लाभ घेत होते. त्यामुळे अशा अपात्र लोकांना ओळखण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली.

घरखरेदी किंवा घरबांधणी करिता मिळणार २ लाख रुपये अनुदान , असा करा अर्ज

किती लोकांवर परिणाम होणार?

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील सुमारे एक कोटी 44 लाख 89 हजार शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे त्यांना रेशनवरील धान्याचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे. सरकारचा उद्देश फक्त पात्र आणि खरोखर गरजू लोकांनाच या योजनेचा लाभ मिळावा हा आहे.

पुढील निर्णय काय होणार?

सध्या ज्यांचे रेशन बंद झाले आहे, त्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना पुन्हा धान्य मिळणार नाही. सरकारकडून पुढील काळात या संदर्भात काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लाडकी बहीण योजना : १४ व्या हप्त्याची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा आपले नाव

अधिक माहितीसाठी आणि ई-केवायसी प्रक्रियेची माहिती घेण्यासाठी सरकारच्या rcms.mahafood.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment