CLOSE AD

घरकुल योजना : आपल्या गावची घरकुल यादी पहा मोबाईलवर , येथे चेक करा

Gharkul Yojana : मंडळी तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही घरबसल्या, मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने घरकुल यादी 2025 मध्ये तुमचं नाव तपासू शकता. याचबरोबर तुमच्या गावातील इतर लाभार्थ्यांची नावेसुद्धा पाहता येणार आहेत.

घरखरेदी किंवा घरबांधणी करिता मिळणार २ लाख रुपये अनुदान , असा करा अर्ज

घरकुल यादीतून काय माहिती मिळते?

घरकुल यादीमध्ये लाभार्थ्यांचे अर्ज क्रमांक, नाव, प्रवर्गानुसार प्राधान्य, आणि घर मंजूर झाल्याची माहिती दिलेली असते. याशिवाय लाभार्थ्याला मिळालेले हप्ते आणि गावातील इतर लाभार्थ्यांची स्थितीही या यादीतून समजते.

घरकुल यादीत खालील माहिती पाहायला मिळते.

  • अर्जदारांचे संपूर्ण नाव
  • अर्जाचा क्रमांक (Application Number)
  • लाभार्थ्याचा प्राधान्य क्रम (Priority)
  • मंजूर घर व मिळालेल्या हप्त्यांची माहिती
  • गावातील इतर लाभार्थ्यांची यादी आणि त्यांना मिळालेल्या हप्त्यांचे तपशील

लाडकी बहीण योजना : १४ व्या हप्त्याची नवीन यादी जाहीर , लगेच चेक करा आपले नाव

घरकुल यादी 2025 मध्ये नाव कसे तपासायचे?

1) प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (PMAY-G) ची अधिकृत वेबसाइट https://pmayg.nic.in या पत्त्यावर भेट द्या.

2) मुख्यपृष्ठावर AwaasSoft या विभागाखाली Reports या पर्यायावर क्लिक करा.

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५४० महिलांना मिळणार मोफत गॅस सिलिंडर, तुमचंही नाव आहे का?

3) Reports मध्ये Beneficiary Details for Verification हा पर्याय निवडा.

4) फॉर्ममध्ये पुढील माहिती निवडा — जिल्हा (District), तालुका (Block), गावाचे नाव (Village), आर्थिक वर्ष: 2024-2025, योजना: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण

5)दाखवलेला कॅप्चा कोड नीट भरून Submit या बटणावर क्लिक करा.

नियमितपणे यादी तपासा

या ऑनलाइन सुविधेमुळे घरकुल योजनेचा लाभ घेत असलेल्या अर्जदारांना त्यांच्या अर्जाची स्थिती तपासणे अधिक सुलभ झाले आहे. त्यामुळे तुम्ही नियमितपणे यादी तपासत राहा, आणि लाभापासून वंचित राहू नका.

Leave a Comment