National Family Financial Assistance Scheme : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबवण्यात येणारी राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ही कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबास आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. १८ ते ५९ वयोगटातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबाला केंद्र शासनाकडून एकरकमी ₹20,000/- इतके आर्थिक सहाय्य मिळते. हा निधी कुटुंबाच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
👧 लेक लाडकी योजना : या योजनेअंतर्गत मुलगी असेल तर मिळेल 1 लाख 1 रुपये , असा करा अर्ज
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मृत व्यक्ती मागील तीन वर्षे कुटुंबात वास्तव्यास असावा, मृत व्यक्तीचे नाव शासकीय कुटुंब यादीत असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचा सदस्य १५ वर्षांपासून महाराष्ट्रात रहिवासी असावा. मृत्युपत्र, वयाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड व बँक पासबुक या आवश्यक कागदपत्रांसह अर्ज केला जातो.

1️⃣ योजनेचे उद्दिष्ट:
कुटुंबातील कमावणाऱ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे अचानक उद्भवलेल्या संकटात कुटुंब आर्थिकदृष्ट्या सावरण्यास मदत होते.
💰 गरीब कुटुंबांना या योजनेत मिळणार थेट ₹30,000 – संधी गमावू नका, सविस्तर माहिती जाणून घ्या!
2️⃣ पात्रता निकष:
- मृत व्यक्तीचे वय १८ ते ५९ वर्षांदरम्यान असावे.
- अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू असावा.
- मागील ३ वर्षे मृत व्यक्ती कुटुंबात वास्तव्य करत असावा.
- कुटुंबातील नाव समाजकल्याण विभागाच्या कुटुंब यादीत असणे आवश्यक.
- १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्यास असलेला लाभार्थी.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
3️⃣ आवश्यक कागदपत्रे:
- मृत्यू दाखला झेरॉक्स
- वयाचा दाखला (शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र / वैद्यकीय अधिकारीचा दाखला)
- कुटुंबाचे प्रमाणपत्र (ग्रामसेवक / गटविकास अधिकारी यांचे)
- रहिवासी दाखला, शिधापत्रिका झेरॉक्स
- आधार कार्ड झेरॉक्स
- राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
- मृत व्यक्ती वास्तव्य प्रमाणपत्र
कन्यादान योजना : या योजनेअंतर्गत नवविवाहित दांपत्यांना मिळणार ₹25,000 , असा करा अर्ज
4️⃣ योजनेचा लाभ:
- एकरकमी ₹20,000/- केंद्र शासनाकडून आर्थिक सहाय्य.
- निधी थेट बँक खात्यात जमा.
- कुटुंबाच्या तातडीच्या गरजा भागवण्यासाठी उपयोगी.
- सामाजिक सुरक्षेचा भाग म्हणून एक महत्त्वाचा उपक्रम.
